Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे...

रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे...

Why should we drink lemon water every morning? : नियमित लिंबूपाणी पिणे शरीरासाठी फार फायदेशीर आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2025 18:04 IST2025-01-19T18:03:11+5:302025-01-19T18:04:50+5:30

Why should we drink lemon water every morning? : नियमित लिंबूपाणी पिणे शरीरासाठी फार फायदेशीर आहे.

Why should we drink lemon water every morning? | रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे...

रोज सकाळी लिंबू पाणी का प्यावे?.. जाणून घ्या कारणे...

आपण लोकांना बोलताना ऐकतो, लिंबू पाणी प्या. वजन कमी होईल. पण अनेक जण सांगतात की हे खोटं आहे. लिंबू पाण्याने काही वजन कमी वगैरे होत नाही. कितीतरी महिने झाले लिंबू पाणी पितोय. पण वजन काही कमी होत नाही. नुसतं लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते का?तर नाही. (Why should we drink lemon water every morning?)लिंबू पाणी वजन कमी करण्यात मदत करते. वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी कसे मदत करते ते तुम्हाला माहिती आहे का? रोज लिंबूपाणी प्यायलो आणि वजन कमी झाले असे होत नाही. (Why should we drink lemon water every morning?)त्यासाठी आधी जाणून घ्या की, लिंबू पाणी प्यायल्याने नक्की काय होते.

१.लिंबूपाणी रोज सकाळी उठल्यावर अंश पोटी घ्यावे. संध्याकाळी किंवा जेवणानंतर घेतल्याचा काही फायदा नाही.  सकाळी उठल्या उठल्या  दात घासायच्या आधी ही लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ आहे.(Why should we drink lemon water every morning?)

२.शरीर दिवसभर तरोताजे राहणे गरजेचे असते. सगळ्यांनाच आळस न करता कार्यरत राहवे लागते. त्यासाठी शरीराला सी जीवनसत्त्वाची गरज असते. हे जीवनसत्त्व दिवसभर शरीराला स्फूर्ति पुरवते.दिवसभरासाठी शरीराला लागणारे ४० ते ५० टक्के सी जीवनसत्त्व सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने मिळते.    

लिंबू हा मुळात अॅसिडिक असतो. पण लिंबू व पाण्याचे मिश्रण मात्र शरीरासाठी योग्य तेवढेच अॅसिड पुरवते. लिंबू पाणी एक फार महत्त्वाचे काम करते, जे फार लोकांना माहितीच नाही. ते म्हणजे शरीराचा पीएच नियमित ठेवणं. शरीरातील अल्कली धातूंचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे काम लिंबूपाणी करते.

लिंबू पाणी तोंडातील जीवाणू संपवून टाकते. त्यांना पोटापर्यंत जाऊच देत नाही. तोंडाचे आजार जसे की तोंड येणं, दात दुखणं आदी त्रासही कमी होतात. लिंबू पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ राहते.

वजन कमी करण्यासाठीच नाही तर या फायद्यांसाठी लिंबूपाणी प्यावे. योग्य आहार आणि व्यायामाला जोड म्हणून लिंबूपाणी काम करते. फक्त लिंबूपाणी प्या आणि बारीक व्हा असे होत नाही. सर्वांनीच सकाळी उठल्यावर ताजे लिंबूपाणी प्यावे. शरीरासाठी फार फायदेशीर आहे.  

Web Title: Why should we drink lemon water every morning?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.