Join us

काळे की पांढरे? वजन कमी करण्यासाठी कोणते चिया सीड्स आहेत खास - वेटलॉस होईल भरभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 13:25 IST

Chia Seeds Types Which One Is Better For Your Health Black Or White : White Chia Seeds vs Black Chia Seeds : What Is the Nutritional Difference Between White & Black Chia Seeds : Which seed is best for weight loss : Which chia seed is better, white or black : कोणत्या रंगाचे चिया सीड्स खाल्ल्याने होईल वजनात घट, पाहा चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत...

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण डाएट आणि एक्सरसाइज करतोच. यासोबतच, वजन कमी करण्यासाठी आपण इतरही लहान - मोठे उपाय करून पाहतो. वेटलॉससाठी सध्या चिया सीड्स (Chia Seeds Types Which One Is Better For Your Health Black Or White) खाण्याचा ट्रेंड अनेकजण फॉलो करतात. तिळाप्रमाणेच दिसणारे हे लहान - लहान आकाराचे सीड्स वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. चिया सीड्समध्ये (Which seed is best for weight loss) फायबर, प्रोटीन, ओमेगा- ३ सारखे फॅटी अ‍ॅसिड आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात(Which chia seed is better, white or black).

चिया सीड्स आपल्या रोजच्या डाएटमध्ये समाविष्ट केल्याने मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो, पोट दीर्घकाळ भरलेले राहते तसेच सतत होणारे क्रेविंग्सचे प्रमाण देखील कमी केले जाते. यासाठी वजन कमी करताना आपल्यापैकी बरेचजण चिया सीड्स खातात. परंतु वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खाताना आपण फक्त काळया रंगाच्याच चिया सीड्स खाणे पसंत करतो. परंतु चिया सीड्स काळे आणि पांढरे अशा दोन प्रकारचे असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी यातील नेमके कोणत्या प्रकारचे चिया सीड्स खाणे अधिक फायदेशीर ठरेल ते पाहूयात. 

चिया सीड्सचे दोन प्रकार... 

काळे आणि पांढरे अशा दोन्ही प्रकारचे चिया सीड्स पौष्टिक आहेत, परंतु त्यांच्या रंगात आणि काही पोषक तत्वांमध्ये थोडा फरक आहे. काळ्या चिया सीड्समध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण थोडे जास्त असते, तर पांढऱ्या चिया सीड्समध्ये फायबरचे प्रमाण थोडे जास्त असते. चव आणि पोत दोन्ही जवळजवळ सारखेच आहेत, म्हणून ते कोणत्याही पदार्थात वापरता येतात. जर तुम्हाला चिया सीड्स विशिष्ट पोषक तत्वांसाठी खायचे असतील तर त्यातील फरक समजून घेऊन खाणे अधिक फायदेशीर राहील. 

वेटलॉससाठी चपाती खाणं सोडताय ? 'या' पिठाची चपाती खा - कमी वेळात जास्त वजन कमी करण्याचे सिक्रेट...

काळे की पांढरे, नेमके कोणते चिया सीड्स खावेत ? 

जर तुम्हाला जास्त प्रमाणांत अँटीऑक्सिडंट्स हवे असतील तर काळे चिया सीड्स खाणे अधिक फायदेशीर ठरेल. त्याचवेळी, जर तुम्हाला फायबरचे प्रमाण जास्त हवे असेल तर पांढरे चिया सीड्स खाणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. दोन्हीमध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, प्रथिने, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. यासाठीच, जर तुम्हाला हेल्दी म्हणून चिया सीड्स खायचे असतील तर तुम्ही त्यापैकी कोणत्याही प्रकारचे चिया सीड्स खाऊ शकता . परंतु जर तुमचे विशिष्ट ध्येय असेल, किंवा खास वजन कमी करण्यासाठी खात असाल तर तुमची रंगाची निवड देखील महत्त्वाची असते.  

चिया सीड्स खाण्याची योग्य पद्धत... 

आपण आपल्या रोजच्या डाएटमध्ये चिया सीड्सचा समावेश वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. चिया सीड्स आपण पाण्यात भिजवून थेट पिऊ शकता किंवा स्मूदी, ओट्स, दही आणि वेगवेगळ्या प्रकारचे गोड पदार्थ किंवा डेझर्टमध्ये देखील मिसळून खाऊ शकता. चिया सीड्स खाण्यापूर्वी फक्त एक नियम कायम लक्षात ठेवावा की, ते थेट न खाता पाण्यांत भिजवून मगच खावेत. पाण्यांत भिजवल्याने त्यांचे पोषक घटक योग्यरित्या सक्रिय होतात. हेल्दी डाएटमध्ये दररोज एक ते दोन चमचे चिया सीड्स खाणे पुरेसे आहे. 

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

वजन कमी करण्यासाठी कोणते चिया सीड्स खाणे फायदेशीर ठरेल? 

वजन कमी करण्यासाठी खरंतर, काळे आणि पांढरे असे दोन्ही प्रकारचे चिया सीड्स खाणे फायदेशीर ठरेल. परंतु या दोघांपैकी काळ्या रंगाचे चिया सीड्स खाणे अधिक उत्तम पर्याय आहे. कारण यामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि चयापचय क्रियेचा वेग देखील वाढतो. पांढऱ्या चिया सीड्स देखील पौष्टिक असतात, परंतु वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत काळ्या रंगाच्या चिया सीड्सची भूमिका थोडी अधिक सक्रिय मानली जाते. आपण दोन्ही प्रकारचे चिया सीड्स खाऊ शकता, पण जर तुमचे ध्येय वजन कमी करणे असेल तर तुमच्या डाएटमध्ये काळ्या रंगाच्या चिया सीड्स खाण्याला अधिक प्राधान्य द्या.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स