Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोज वॉक करता तरी पोट तसंच! 99 टक्के लोकांना माहीत नसते योग्य पद्धत, हृदयाचंही होतं नुकसान

रोज वॉक करता तरी पोट तसंच! 99 टक्के लोकांना माहीत नसते योग्य पद्धत, हृदयाचंही होतं नुकसान

Which IS Best Way To Walk : वॉक करताना नकळतपणे काही चुका केल्यामुळे वॉकिंगचा पुरेपूर फायदा मिळत नाही. अशा चुका वेळीच टाळायला हव्यात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 09:25 IST2025-08-16T09:18:00+5:302025-08-16T09:25:01+5:30

Which IS Best Way To Walk : वॉक करताना नकळतपणे काही चुका केल्यामुळे वॉकिंगचा पुरेपूर फायदा मिळत नाही. अशा चुका वेळीच टाळायला हव्यात.

Which IS Best Way To Walk : Right Way To Walk For Good Heart Health | रोज वॉक करता तरी पोट तसंच! 99 टक्के लोकांना माहीत नसते योग्य पद्धत, हृदयाचंही होतं नुकसान

रोज वॉक करता तरी पोट तसंच! 99 टक्के लोकांना माहीत नसते योग्य पद्धत, हृदयाचंही होतं नुकसान

आपला फिटनेस मेंटेन ठेवण्यासाठी रोज वॉक करणं उत्तम मानलं जातं. हा एक सोपा वर्कआऊट प्लॅन आहे. ज्यामुळे तब्येतीला बरेच फायदे मिळतात. रोज वॉक केल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते याशिवाय मानसिक आरोग्यही चांगले राहते. वॉक करताना नकळतपणे काही चुका केल्यामुळे वॉकिंगचा पुरेपूर फायदा मिळत नाही. अशा चुका वेळीच टाळायला हव्यात. (Right Way To Walk For Good Heart Health)

फिजिओथेरेपीस्ट डॉक्टर इंद्रामनी उपाध्याय यांच्यामते सकाळी चालणं अनेक आजारांचा धोका कमी करते पण नकळतपणे काही चुका केल्यास हॉर्ट डिसिजचा धोका वाढतो. हे समजून घेणं फार महत्वाचे आहे. वॉकिंगचे काही नियम फॉलो करायला हवेत. जर तुम्ही स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज वॉक करत असाल तर हे आर्टिकल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. वॉकींग करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. ज्यामुळे तुमच्या हृदयाचं नुकसान होणार नाही.

वेग महत्वाचा

वॉक करताना गतीकडे लक्ष देणं फार महत्वाचे आहे. जास्त वेगानंसुद्धा चालू नका जास्त हळूसुद्धा चालू नका. यामुळे अचानक तुमची हार्टबीट वाढू शकते. ज्यांना हृदयाचे विकार आहेत त्याच्यापुढे गंभीर समस्या उभी राहू शकते. तर संथपणे चालल्यानं हार्टचे मसल्स मजबूत होणार नाहीत.

वॉर्म अप

वॉक करण्याच्या कमीत कमी १५ मिनिटं आधी तुम्ही हलका फुलका वार्मअप करू शकता. तुम्ही स्ट्रेचिंगसुद्धा करू शकता. संथ गतीनं वॉक करा यामुळे हॉर्ट आणि शरीर दोन्हींना वॉकींगसाठी तयार होण्याचा वेळ मिळेल. अचानक वेगानं वॉक केल्यास हॉर्टवर दबाव पडतो.

वाकून चालू नका

वॉक करताना आपल्या पोश्चरवर लक्ष द्या. चुकीच्या पद्धतीनं चालल्यास हृदयाला नुकसान पोहोचू शकतं. जर चालण्याची पद्धत व्यवस्थित नसेल किंवा तुम्ही वाकून चालत असाल तर श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. फुफ्फुसांवर योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो. नेहमी समोर पाहून चालायला हवं.

नियमित वॉक करा

स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी नियमित वॉक करायला हवं. जे लोक मध्येच वॉक करणं सोडून देतात नंतर पुन्हा सुरू करतात किंवा जास्त चालतात त्यांच्यासाठी हे नुकसानकारक ठरू शकतं. हॉर्ट हेल्दी ठेवण्यासाठी रोज अर्धा ते एक तास वॉक करणं गरजेचं आहे.

जेवल्यानंतर लगेच चालायला जाऊ नका

सकाळी वॉकला जाण्याआधी काहीही खाऊन जाऊ नका. जर तुम्ही हेवी नाश्ता केला असेल तर ४५ मिनिटांनंतर वॉक सुरू करा. खाल्ल्यानंतर आपली एनर्जी अन्न पचवण्यात वाया याते. या वेळेस वॉक करताना हृदयाला बरेच कष्ट पडतात.

वॉक करताना स्वत:ला हायड्रेट ठेवणं फार महत्वाचं आहे. जर तुम्ही ऊन्हाळ्याच्या दिवसांत वॉक करण्यासाठी जात असाल तर योग्य प्रमाणात पाणी प्या. याशिवाय डिहायड्रेशनमुळे ब्लड प्रेशरमध्ये चढ-उतार होऊ शकतो आणि हृदयावर याचा परीणाम होतो.

Web Title: Which IS Best Way To Walk : Right Way To Walk For Good Heart Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.