Join us  

उन्हाळ्यात ताक पिण्याची योग्य वेळ कोणती? ताक कसं-कधी प्यावं? ताकाचे फायदे हवे तर..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 3:28 PM

What is the right time to drink buttermilk in summer : उन्हाळ्यात लोक ताक पितात जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. कारण यात पोषक तत्व असतात डिहायड्रेशनपासून बचाव करण्यास मदत करतात.

बदलत्या वातावरवणात तापमानातही बदल होत आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक वेगवेगळ्या पेयपदार्थांचा आपल्या आहारात समावेश करत आहे. (Right Way To Drink Buttermilk Right Right For Buttermilk) ऊन्हाळ्यात  जास्तीत जास्त पेय पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. कारण वाढत्या गरमीत शरीराला थंड ठेवण्यासाठी पेय पदार्थ जास्तीत जास्त पिण्याची आवश्यकता असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत लोक ताक पितात जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. कारण यात पोषक तत्व असतात  डिहायड्रेशनपासून बचाव करण्यास मदत करतात. (What is the right time to drink buttermilk in summer)

हेल्दीफाय मी च्या रिपोर्टनुसार  ग्लासभर ताकात ४० कॅलरीज, ४.८ ग्रॅम कार्बोहायडेट्स ३.३ ग्रॅम प्रोटीन्स आणि ०.९ ग्रॅम फॅट्स असतात. कोलेस्टेरॉल ४ ग्रॅम असते, डाएटरी फायबर्सही कमी असतात. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं की नियमित ताक प्यायल्याने रक्तातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. ताकातील घटक कोलेस्टेरॉल शोषण्यास मदत करतात.

ताकातील लिपिड्स एंटी व्हायरल गुणवत्ता एचआयव्ही, हर्पस मिम्पलेक्स व्हायरल, रोटाव्हायरल आणि पॉलिओव्हायरस यांसारख्या काही विषाणूंवरील परिणाम करतात. ताकातील लोह बाऊडींग, प्रोटीन लॅक्टोफेरेनमुळे होते. लॅक्टोफेरिन प्रोटीन पेप्टाईड आणि विषाणूंमधील प्रथिनांना प्रतिक्रिया देते.

डॉ. प्रेम शरण यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या दिवसांत तापमाना वाढ होते अशावेळी डिहायड्रेशनचा धोका वाढतो एसिडिटी होते. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते. यामुळे एसिडीटी, छातीत जळजळ अशा समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी ताकाचे सेवन करायला हवे. 

ताकात कॅल्शियम, प्रोटीन्स, व्हिटामीन ए, बी, सी, ई यांसारखे एंटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहते. ऊन्हाळ्याच्या वातावरणात पाण्याची कमरता दूर करण्यासाठी तुम्ही ताकाचे सेवन  करू शकता. जर तुम्हाला एसिडीटी, पोटात जळजळ  अशा समस्या उद्भभवत असतील तर ताक प्यायलाच हवे. 

ताक पिण्याची योग्यवेळ कोणती?

ताक प्यायल्याने शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. उष्णतेपासून बचाव होतो. त्वचा हायड्रेट राहते. ताक दुपारी जेवल्यानंतर किंवा  सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास शरीराला बरेच फायदे मिळतीत. ताकात तुम्ही काळं मीठ घालून याचे सेवन करू शकता. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते याशिवाय इम्यूनिटीसुद्धा चांगली राहते. आयुर्वेदानुसार ताक, दही यांसारख्या पदार्थांचे सेवन रात्रीच्या वेळेस करणं टाळायला हवं. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स