Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > दिवसभरात नेमके कोणत्या वेळी नारळ पाणी पिणे सर्वात फायदेशीर ? तज्ज्ञ सांगतात योग्य वेळ...

दिवसभरात नेमके कोणत्या वेळी नारळ पाणी पिणे सर्वात फायदेशीर ? तज्ज्ञ सांगतात योग्य वेळ...

When is the best time to drink tender coconut water : नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते, परंतु ते पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2024 09:15 AM2024-06-25T09:15:15+5:302024-06-25T09:20:02+5:30

When is the best time to drink tender coconut water : नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते, परंतु ते पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती ते पाहूयात...

What Is The Best Time to Drink Coconut Water Best Time To Drink Coconut Water For Top Results What is the correct time to drink tender coconut water | दिवसभरात नेमके कोणत्या वेळी नारळ पाणी पिणे सर्वात फायदेशीर ? तज्ज्ञ सांगतात योग्य वेळ...

दिवसभरात नेमके कोणत्या वेळी नारळ पाणी पिणे सर्वात फायदेशीर ? तज्ज्ञ सांगतात योग्य वेळ...

शहाळाचे पाणी दररोज पिणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. नारळाचे पाणी हे अनेक महत्वाच्या पोषक तत्वांनी भरपूर असते. नारळाचं पाणी एक खूप चांगले हायड्रेटिंग ड्रिंक आहे, त्यामुळे इतर ऋतूंप्रमाणेच हे उन्हाळ्यांत अधिक प्रमाणांत प्यायले जाते. काही पदार्थ आपण कधीही खाऊ शकतो. काही पदार्थ उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा अशा तिन्हीही ऋतूंमध्ये खाता - पिता येतात. काही पदार्थ त्यातही फळे ही त्या - त्या सिझनमध्ये खाल्ली जातात. तर काही फळांचा विशिष्ट असा सीझन नसतो, ती कधीही उपलब्ध असतात. यामध्ये नारळ हे फळ आपल्याला बारा (best time to drink coconut water for weight loss) महिने केव्हाही उपलब्ध असते. शहाळ्याचे  पाणी आपण कोणत्याही ऋतूमध्ये पिऊ शकतो(Best Time To Drink Coconut Water For Top Results).

शहाळ्याचे पाणी वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असले तरीही ते योग्य वेळी पिणे गरजेचे असते. शहाळ्याचे पाणी दिवसातून आपण कधीही पिऊ शकतो. असे असले तरीच ते दिवसातून योग्य वेळी प्यायल्यास शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. दिवसातून शहाळ्याचे पाणी नेमके कधी प्यावे ? तज्ज्ञ सांगतात शहाळ्याचे पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती ते पाहूयात(What is the correct time to drink tender coconut water).

शहाळ्याचे पाणी पिण्याचे योग्य वेळ कोणती ? 

डाएट मंत्रा क्लिनिक, नोएडाच्या संस्थापक आणि वरिष्ठ आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी सांगितले की, उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून हे संरक्षण करते. नारळाच्या पाण्याने शरीरात ऊर्जा भरून राहण्यास मदत होते. नारळ पाणी पिण्याची अशी कोणतीही योग्य वेळ नाही. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी, दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतरही नारळाचे पाणी पिऊ शकता. आपण दिवसांतील कोणत्याही वेळी नारळ पाणी पिऊ शकता. नारळ पाणी पिण्याने त्याचे आरोग्याला फायदेच होतात, यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

स्टार्स-सेलिब्रिटी पितात ती ‘बुलेटप्रूफ कॉफी’ नेमकी असते काय? ती प्यायल्याने वजन कमी होतं ते कसं..

सकाळी उपाशी पोटी नारळ पाणी पिणे आपल्या शरीरासाठी सर्वात फायदेशीर मानले जाते. नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि वर्कआऊटच्या आधी शरीरामध्ये ऊर्जा वाढवण्यासाठी मदत करत असते. म्हणून सकाळी वर्कआऊटच्या आधी  नारळ पाणी पिणे फायदेशीर ठरते. जेवणाच्या आधी नारळ पाणी प्यायल्यामुळे पोट बऱ्याचकाळासाठी गच्च भरलेले राहते. पोट भरलेले असल्यामुळे आपण कमी प्रमाणामध्ये जेवतो. त्यामुळे खाण्यामध्ये अतिरेक थांबतो, यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच जेवण पचायला देखील फायदेशीर ठरते. म्हणून वर्कआऊट झाल्याच्या नंतर नारळ पाणी पिणे शरीराला लाभदायक मानले जाते.

विद्या बालन करते  'नो रॉ फूड' डाएट, हे डाएट नेमकं आहे तरी काय ?  

नारळाचे पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती ? 

कामिनी सिन्हा सांगतात की, नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण नारळाचे पाणी कधीही थेट पेंढ्याने पिऊ नये. यामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नारळाचे पाणी ग्लासमध्ये काढून गाळून प्यावे. वास्तविक, अनेक वेळा नारळात बुरशी जमा होते आणि ती डायरेक्टर स्ट्रॉसोबत प्यायल्याने ही बुरशी शरीरात पोहोचते. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरीने नारळ पाणी प्यावे. निष्काळजीपणामुळे शरीराची हानी होऊ शकते.

Web Title: What Is The Best Time to Drink Coconut Water Best Time To Drink Coconut Water For Top Results What is the correct time to drink tender coconut water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.