Join us  

गुड कार्ब्ज म्हणजे नेमकं काय? दिलजीत दोसांझ सांगतो तसे चांगले आणि वाईट कार्ब्ज कसे ओळखायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2022 4:58 PM

Good And Bad Carbhydrates: कोलेस्टरॉलप्रमाणेच कार्बोहायड्रेट्सचही असतं.. ते ही असतात गुड आणि बॅड... पण नेमकं ओळखायचं कसं, गुड कार्ब्ज आणि बॅड कार्ब्ज कोणते ते... त्यासाठीच तर वाचा ही माहिती...

ठळक मुद्देकार्बोहायड्रेट्स हे शरीरासाठी एखाद्या इंधनाप्रमाणे काम करतात. म्हणूनच तर शरीराची गाडी व्यवस्थित चालू द्यायची असेल तर कार्बोहायड्रेट्स टाळून जमणार नाही..

डाएटबाबत जागरूक असणाऱ्या लोकांना काेणत्या पदार्थात किती कार्बाेहायड्रेट्स असतात, हा प्रश्न तर नेहमीच पडतो.. मग त्यातही कोणते कार्ब्ज चांगले, कोणते वाईट अशी त्यांची मनातल्या मनात उजळणी सुरू होते.. कार्ब्जमध्ये येणारा आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे लो कार्ब्ज डाएट.. ज्या पदार्थांतून कमीतकमी कार्ब्ज मिळतील, असे पदार्थ आहारात घेणं म्हणजे लो कार्ब्ज डाएट (low carbs diet).. या डाएटच्या संकल्पनेनुसार बटाटा तर अगदीच वर्ज्य करण्यात आला आहे.. पण इथे तर गायक, अभिनेता तसेच शेफ असणाऱ्या दिलजीत दोसांझने (Diljit Dosanjh) तर कमालच केली आहे..

 

त्याने एक स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केली असून त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. यामध्ये उकडलेल्या बटाट्यापासून तयार करण्यात आलेला एक पदार्थ त्याने शेअर केला आहे. “Good carbs.” असं कॅप्शनही त्याने या फोटोला दिलं आहे. डाएट करणारी अनेक मंडळी शक्यतो बटाट्यापासून जास्तीतजास्त दूर राहण्याचा प्रयत्न करतात. पण दिलजीतने तर चक्क गुड कार्ब्ज असं म्हणत बटाट्याचं कौतूक केलं आहे.. सगळेच कार्बोहायड्रेट्स खरंतर आरोग्यासाठी वाईट नसतात. कार्बोहायड्रेट्स हे शरीरासाठी एखाद्या इंधनाप्रमाणे काम करतात. म्हणूनच तर शरीराची गाडी व्यवस्थित चालू द्यायची असेल तर कार्बोहायड्रेट्स टाळून जमणार नाही..

 

कोणते कार्बोहायड्रेट्स ''Good'' आहेत हे कसं ओळखणार?- सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की कार्बोहायड्रेट्स हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेले असतात. - प्रामुख्याने कार्बोहायड्रेट्सचे ३ प्रकार आहेत. शुगर, स्टार्च आणि फायबर.- शुगर आणि स्टार्च प्रकारातले कार्बोहायड्रेट्स ग्लुकोजमध्ये रुपांतरीत होतात आणि शरीराला उर्जा देतात. काही कार्ब्स फॅट्समध्ये रुपांतरीत होतात आणि stored energy म्हणून उपयुक्त ठरतात.- फायबर प्रकारात मोडणारे कार्ब्ज थेट उर्जा देत नाहीत. पण ते शरीराला असे काही बॅक्टेरिया पुरवतात, जे पचन संस्थेसाठी उत्तम ठरतात.  

 

“simple” आणि “complex” किंवा “whole” आणि “refined.” असेही कार्ब्सचे वर्गीकरण करण्यात येते. यालाच आपण गुड आणि बॅड कार्ब्ज असेही म्हणू शकतो. यापैकी सिंपल किंवा whole कार्ब्स अनेक नैसर्गिक पदार्थांमध्ये आढळून येतात. तर प्रोसेस केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये प्रामुख्याने कॉम्प्लेक्स किंवा रिफाईन कार्ब्स असतात. गुड कार्ब्समध्ये (good carbs diet) येणारे पदार्थभाज्या, बार्ली, डाळी, शेंगा, बटाटे, धान्य, ओट्स, बीन्सबॅड किंवा रिफाईंड कार्ब्समध्ये येणारे पदार्थमैद्यापासून तयार झालेले विविध पदार्थ, पेस्ट्री, केक, Sugar alcohols

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआहार योजनादिलजीत दोसांझ