Join us  

आदित्य नारायणने 'फुल गोभी चावल' खाऊन कमी केलं ६ किलो वजन! फ्लॉवर भात करतात कसा, फायदे काय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 3:29 PM

Benefits of cauliflower rice: गायक आदित्य नारायणने (Aditya Narayan) दिड महिन्यात तब्बल ६ किलो वजन घटवलं!! एवढ्या वेगात वेटलॉस (weight loss) करण्यासाठी बघा त्याने नेमका कोणता उपाय केला..

ठळक मुद्देफायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया तसेच चयापचय क्रिया या दोन्ही क्रियांचा वेग व्यवस्थित राखण्यासाठी फ्लॉवर उपयुक्त ठरते.

वेटलॉस करण्यासाठी कोण काय करतं आहे, याबद्दल अनेक जणांना खूपच उत्सूकता असते. कारण वाढलेलं वजन कंट्रोल (weight loss with cauliflower rice) करणं हा अनेक जणांना सध्या भेडसावणारा प्रश्न. त्यामुळे कमी वेळात अधिक परिणामकारक पद्धतीने वजन कसं कमी करता येईल, याचा शोध अनेक जण घेतच असतात. तुम्हीही जर वजन कमी करण्याच्या प्राेसेसमध्ये असाल तर गायक आदित्य नारायणने वापरलेला हा वेटलॉस फंडा एकदा माहिती करून घ्यायला हरकत नाही. त्याने म्हणे 'फुल गोभी चावल' (cauliflower rice) खाऊन वजन कमी केलं आहे. पांढरा भात, ब्राऊन राईस आजवर आपण ऐकला आहे, खाल्ला आहे. पण हे फुल गोभी चावल म्हणजे काय, ते बघायलाच पाहिजे. (how to do cauliflower rice)

 

फ्लॉवरचा भात म्हणजे काय?एका हिंदी न्यूज वेबसाईटनुसार आदित्यच्या डाएटिशियनशी त्याला फ्लॉवरचा भात खाण्याचा सल्ला दिला होता. ६ आठवडे त्याने हा प्रयोग केला आणि प्रत्येक आठवड्यात एकेक किलो याप्रमाणे त्याचं वजन दिड महिन्यात तब्बल ६ किलोने कमी झालं. फ्लॉवरचा भात म्हणजे फ्लॉवरचा बारीक चुरा. तो चुरा दिसायला तांदळाप्रमाणेच वाटतो. फ्लॉवरचा हा तांदूळ आपल्याला घरीही बनवता येतो. त्यासाठी सगळ्यात आधी फ्लॉवरचे छोटे छोटे तुकडे करून घ्या. नंतर ते किसनीने किसून घ्या. यासाठी जाड किसनीचा वापर करा. बारीक किसनीने फ्लॉवर अधिकच गाळ होईल. यानंतर भाज्या टाकून हा भात शिजवून घेतला की झाला फ्लॉवरचा भात तयार.. 

 

फ्लॉवरचा भात खाण्याचे फायदे (Benefits of cauliflower rice)१. फ्लॉवरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फ्लॉवरचा उपयोग होतो. २. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही फुलगोभीचा उपयोग होतो. याविषयी आणखी संशोधन सुरू असले तरी सध्या अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, त्यामध्ये असणारा सल्फोराफेन हा घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो. 

३. गर्भातील बाळाची योग्य वाढ होण्यासाठी आईने दररोज कमीतकमी ४०० मायक्रोग्रॅम फोलेट घेणे आवश्यक असते. फोलेट म्हणजे व्हिटॅमिन बी. किंवा त्याला फोलॅसिन असंही म्हणतात. फ्लॉवरमध्ये फोलेट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठीही 'फुल गोभी चावल' अधिक उपयुक्त आहेत. 

वजन कमी करताना 5 गोष्टी टाळा...नाहीतर वजन कमी होण्याऐवजी वाढेल झरझर४. पचनाच्या समस्या कमी करण्यासाठीही फ्लॉवर उपयुक्त आहे. कारण त्यामध्ये सॉल्यूबल आणि इनसॉल्युबल फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जेव्हा अपचन, कॉन्स्टिपेशन असा त्रास जाणवत असेल तेव्हा फुलकोबीचा भात खाणे उपयुक्त ठरते.५. शेवटचा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे फायबरचे प्रमाण अधिक असल्याने पचनक्रिया तसेच चयापचय क्रिया या दोन्ही क्रियांचा वेग व्यवस्थित राखण्यासाठी फ्लॉवर उपयुक्त ठरते. त्यामुळे वेटलॉससाठीही ते अतिशय उपयुक्त आहे. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनाआदित्य नारायण