Join us
Daily Top 2Weekly Top 5

शरीरात जाताच फॅट बर्न करते ताक; ताकात 'हे' पदार्थ घालून घ्या; झरझर वजन घटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 20:39 IST

What are the benefits of drinking buttermilk for the body : रोज हे ड्रिंक प्यायल्यानं वजन भराभर कमी होण्यास मदत होते.

उन्हाळ्याच्या दिवसांत बरेच लोक ताक पितात.  ताक पोटाला गारवा देण्यासाठी एक उत्तम ड्रिंक आहे. तब्येतीसाठी ताक सुपरफूड मानलं गेलं आहे. एसिडिटी कमी करणं, पचनक्रिया सुधारणं तसंच शरीराला गारवा मिळण्यासाठी  ताक फायदेशीर ठरते.  गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट डॉ. पलानीअप्पन मणिक्कम यांच्यामते ताक वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. (What are the benefits of drinking buttermilk for the body)

डॉ. पाल सांगतात की आपली गट हेल्दी ब्रेनप्रमाणे काम करते. यात गुड बॅक्टेरियाज असतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म सुधारण्यास मदत होते. ताकात असे काही प्रोबायोटिक्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते तसंच फॅट वेगानं कमी होतं. रोज हे ड्रिंक प्यायल्यानं वजन भराभर कमी होण्यास मदत होते.

पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेलं ताक पिणं तब्येतीसाठी फायदेशरी ठरतं. यात कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस,व्हिटामीन बी-१२ आणि रायबोफ्लेविन अशी महत्वाची तत्व असतात.  याशिवाय १ कप लो फॅट ताकात जवळपास ११०० कॅलरीज असतात. ९ ग्रॅम प्रोटीन आणि ३ ग्रॅम फॅट असतात. म्हणून हे तब्येतीसाठी सुपरफूड मानले जाते. ताक शरीराला एनर्जी देते तसंच हाडांना मजबूत करण्यासाठीही फायदेशीर ठरते. 

ताक लॅक्टोज सेंसिटिव्ह लोकांसाठी फायदेशीर ठरते.  ज्यांना दूधामुळे गॅस किंवा अपनाच्या समस्या उद्भवतात त्यांच्यासाठी ताक फायदेशीर ठरते. ताकात लॅक्टोज कमी असते. ज्यामुळे ते लगेच पचते तसंच ताक प्यायल्यानं पोटाला गारवासुद्धा मिळतो. 

ज्या लोकांच्या पचनाच्या समसा आहेत त्यांच्यासाठी ताक फायदेशीर ठरते. ताकात गुड बॅक्टेरियाज असतात. जे पोटाचे त्रास, एंटीबायोटीक  घेतल्यानंतर उद्भवणारे  पोटाचे त्रास दूर करण्यास मदत करतात. तसंच तुमची गट हेल्थही आतून स्वच्छ राहते. ताक बनवणं खूपच सोपं आहे.

यासाठी तुम्हाला पाण्यात दही, पुदीना, कोथिंबीर, जीरं पावडर, काळी मिरी, मीठ घालावं लागेल हे तयार केल्यास हेल्दी ताक तयार होईल.  दुपारच्या  जेवणानंतर तुम्ही ताकाची निवड करू शकता.  ताक प्यायल्यानं शरीर ताजंतवानं राहण्यासही मदत होते. ताकाची कढी, ताकाचं पिठलं असे पदार्थ तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी घेऊ शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Buttermilk burns fat, aids weight loss: Add these ingredients!

Web Summary : Buttermilk is a superfood for gut health, aiding digestion and weight loss. Rich in nutrients like calcium and vitamin B-12, it provides energy and strengthens bones. It's beneficial for lactose-sensitive people, reducing gas and bloating.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स