lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मेहनतीनं वजन तर कमी केलं पण चेहेऱ्यावरची चमकच उडाली, त्यावर उपाय भाज्यांचा रस

मेहनतीनं वजन तर कमी केलं पण चेहेऱ्यावरची चमकच उडाली, त्यावर उपाय भाज्यांचा रस

‘वजन कमी करण्याआधी तू किती छान दिसायचीस’ अशा कॉम्प्लिमेण्टस ऐकून वजन कमी झाल्याचा आनंद कुठल्या कुठे हरवून जातो. असं होवू नये म्हणून काय करायला हवं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 01:28 PM2021-07-17T13:28:28+5:302021-07-17T13:35:57+5:30

‘वजन कमी करण्याआधी तू किती छान दिसायचीस’ अशा कॉम्प्लिमेण्टस ऐकून वजन कमी झाल्याचा आनंद कुठल्या कुठे हरवून जातो. असं होवू नये म्हणून काय करायला हवं?

Weight loss will be followed by fatigue and constant tiredness.. what do to avoid this effects? | मेहनतीनं वजन तर कमी केलं पण चेहेऱ्यावरची चमकच उडाली, त्यावर उपाय भाज्यांचा रस

मेहनतीनं वजन तर कमी केलं पण चेहेऱ्यावरची चमकच उडाली, त्यावर उपाय भाज्यांचा रस

Highlightsजर स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या तुलनेत कार्डिओ व्यायाम जास्त झाला तर त्वचा आणि केस खराब होतात.भाज्यांचा रस सेवन केल्यानं त्वचेचं पोषण होतं आणि शरीरालाही ऊर्जा मिळते.काकडी, टमाटा, गाजर. बीट या भाज्या त्वचा आणि केस यांच्यासाठी खूप उपयुक्त मानल्या जातात.छायाचित्रं:- गुगल

वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएटिंग केलं जातं. या दोन गोष्टी मन लावून केल्या तर वजन कमी होतंच. पण वजन कमी झाल्यानंतर अनेकींना आपला चेहेरा निस्तेज झालेला दिसतो. चेहेर्‍याची आणि केसांची चमक हरवल्याचं लक्षात येतं. थकवा जाणवतो आणि तो चेहेर्‍यावर दिसतोही. ‘वजन कमी करण्याआधी तू किती छान दिसायचीस’ अशा कॉम्प्लिमेण्टस ऐकून वजन कमी झाल्याचा आनंद कुठल्या कुठे हरवून जातो. असं होवू नये म्हणून कुठेले क्रीम्स किंवा कॉस्मेटिक्स कामाला येत नाही तर आहाराबाबतचे काही नियम पाळून शरीरावरची अनावश्यक चरबी तर कमी होतेच शिवाय वजन कमी झाल्यावरही त्वचा आणि केस यांच्यावर परिणाम होत नाही.

छायाचित्र:- गुगल

वजन कमी करताना चेहेर्‍याचं तेज का हरवतं?

 * वजन कमी करताना व्यायामावर भर दिला जातो. व्यायामादरम्यान निघणारा घाम आणि त्यामुळे त्वचेखालील ग्रंथीतून स्त्रवणारं जास्त तेल यामुळे चेहेरा तेलकट होतो. यामुळे चेहेरा आणि केसात जास्त घाण जमा होते. त्याचाच परिणाम म्हणजे चेहेर्‍याचा नूर जातो आणि केसांचीही अवस्था वाईट होते.

* अनेक फिटनेस तज्ज्ञ याला चुकीच्या पध्दतीचा व्यायाम जबाबदार असतो असं मानतात. कारण डाएटिंग करताना कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यांच्यात समतोल रहायला हवा. जर स्ट्रेंथ ट्रेनिंगच्या तुलनेत कार्डिओ व्यायाम जास्त झाला तर त्वचा आणि केस खराब होतात. व्यायामामुळे चेहेर्‍यावर चमक यायला हवी. त्यासाठी योग्य पध्दतीचा व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यात जर चुका होत असतील तर त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.

वजन कमी करताना..

छायाचित्र:- गुगल

* तज्ज्ञ म्हणतात की वजन कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम करणं, डाएटिंग करणं यात काहीच चूक नाही. पण ते करत असताना आपल्या शरीरातलं पाणी कमी होवू न देण्याची काळजी घ्यायला हवी. पाण्यामुळेच आपली त्वचा ओलसर राहाते. पाणी हात्वचेसाठी सर्वात पोषक घटक आहे. त्यामुळे दिवसभर पुरेसं पाणी प्यायला हवं.

* भाज्यांचा रस हा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत खूप महत्त्वाचा असतो. भाज्यांचा रस सेवन केल्यानं त्वचेचं पोषण होतं आणि शरीरालाही ऊर्जा मिळते. यामुळे चेहेरा आणि केसांवर चमक येते आणि वजनही कमी होतं. काकडी, गाजर, बीट, टमाटा हे घटक भाज्यांचा रस तयार करताना वापरायला हवेत. त्याचा वजन, त्वचा आणि केस यांना चांगला फायदा होतो.

* वजन कमी करताना व्यायाम आणि योग्य आहार याला महत्त्व द्यायला हवं. पण अनेकजणींना झपाट्यानं वजन कमी करायचं असतं. त्यामुळे त्या क्रॅश डाएटच्या मागे जातात. पण यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. त्याचाच परिणाम म्हणजे वजन कमी झाल्यावर काखेच्या बाजूला, पोटावर, गळ्यावर स्ट्रेच मार्क्‍स दिसतात. तसेच चेहेर्‍यावर मुरुम पुटकुळ्या येऊन चेहेरा खराबही होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तज्ज़ क्रॅश डाएट करु नक असं सांगतात.

* वजन कमी करताना सर्व लक्ष केवळ वजनावरच केंद्रित झालेलं असतं. त्यामुळे त्वचेकडे केसांकडे दुर्लक्ष होतं. आणि जेव्हा ते खराब होतात तेव्हाच लक्ष जातं. पण असं न करता वजन कमी करताना त्वचेची काळजीही घ्यायला हवी. त्यासाठी तज्ज्ञ चेहेर्‍यास वाफ घेण्याचा सल्ला देतात. ही वाफ घेताना एक मऊ कपडा घ्यावा. तो गरम पाण्यात भिजवावा आणि त्या कपड्यानं आपला चेहेरा झाकावा. पाच मिनिटं तो कपडा चेहेर्‍यावर तसाच राहू द्यावा. आणि अग चेहेर्‍यावर गार पाण्याचे शिपके मारावे.

* चेहेरा आणि केसांची चमक शाबूत ठेवायची असेल तर वजन कमी करताना मीठ आणि साखर यांचं अतिसेवन टाळावं. कर्बोदकं आणि प्रथिनयुक्त आहार यावर भर द्यायला हवा.

छायाचित्र:- गुगल

* वजन कमी करताना नियमित कोणत्या तरी भाजीचं ज्यूस प्यायला हवं. काकडी, तर टमाटा, गाजर, बीट यांचं थोडं पाणी टाकून ते ब्लेण्डरमधे फिरवून त्याचं ज्यूस आलटून पालटून घ्यावं. मिस्करमधून फिरवल्यानंतर ते मिश्रण आधी गाळून घ्यावं. त्यात लिंबू पिळावं आणि मग ते प्यावं.

* काकडी, टमाटा, गाजर. बीट या भाज्या त्वचा आणि केस यांच्यासाठी खूप उपयुक्त मानल्या जातात. कारण काकडीत त्वचेला थंडावा देणारे घटक असतात. गाजरात बीटा केरोटिन असतं तर  बीटात भरपूर लोह असतं आणि टमाट्यामधे लाइकोपीन आणि क जीवनसत्त्वं भरपूर प्रमाणात असतं. म्हणूनच या कच्च्या भाज्यांचं ज्यूस त्वचा आणि केसांच आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं.

* जितकं शक्य आहे तितकं तेलकट पदार्थ खाण्यापासून स्वत:ला रोखा. तेलकट पदार्थांऐवजी प्रथिनं, तंतुमय घटक आणि क जीवनसत्त्वयुक्त आहार घेण्यास प्राधान्य द्यावं. याचा फायदा म्हणजे वजन कमी होताना चेहेर्‍याची हरवलेली चमक पुन्हा येते.

Web Title: Weight loss will be followed by fatigue and constant tiredness.. what do to avoid this effects?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.