वाढते वजन ही सध्याची खूप मोठी आणि अगदी कॉमन समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी बहुतेकजण डाएट आणि एक्सरसाइजचा आधार घेतात. या दोन मुख्य गोष्टी व्यवस्थित फॉलो केले तर नक्कीच (Weight Loss Tips Health Chapati Flour Instead Of Wheat Flour To Lose Weight) आपल्याला वाढलेले वजन अगदी सहजरित्या कमी करता येऊ शकते. या दोन ठोस उपायांसोबतच इतरही छोटे - मोठे उपाय देखील आजमावून (Best Alternatives To Wheat Chapatis For Quick Weight Loss) पाहिले जातात. यात काहीजण भात, चपाती किंवा अमुक एखादा (Which flour roti is best for weight loss) पदार्थ खाणें सोडून देतात. वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठापासून तयार केली जाणारी चपाती खाणे अनेकजण बंद करतात(Chapati Diet For Quick Weight Loss).
गव्हाचे पीठ हे कर्बोदकांनीयुक्त असे असते. गव्हाच्या पिठामध्ये रिफाईंड कार्ब असतात, ज्यामुळे वजन वाढते. वजन कमी करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाऐवजी इतर पिठांपासून तयार केलेली चपाती आपल्या डाएटमध्ये समावेश करु शकतो. पोळी-भाजी हा आपल्याकडील आहारातला मुख्य घटक आहे. पण मग वजन कमी करण्यासाठी पोळी ही उपयुक्त नाही म्हणून पोळी खाण्याचं टाळलं तर त्याचे आरोग्यावर विपरित परिणाम होतात. यासाठीच, जर गव्हाच्या पिठाची चपाती खाऊन वजन वाढत असेल तर आपण, गव्हाऐवजी इतर पिठाच्या चपात्या आपल्या आहारात समाविष्ट करु शकतो. नुकतेच, डॉ. रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या इंस्ट्राग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत, वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या पिठाच्या चपात्या खाण्याऐवजी पर्यायी पिठाचा एक उत्तम प्रकार सांगितला आहे. हे पीठ नेमकं कोणतं ते पाहूयात.
वेटलॉससाठी गव्हाऐवजी खा 'या' पिठाच्या चपात्या...
डॉ. रॉबिन शर्मा यांच्यामते, वेटलॉस करण्यासाठी गव्हाऐवजी 'बार्ली' म्हणजेच 'जव' पिठाच्या चपात्या खाणे अधिक फायदेशीर ठरेल. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, बार्लीचे पीठ गव्हाच्या पिठापेक्षा २० पट वेगाने चरबी जाळण्यास मदत करते.
फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...
वजन कमी करण्यासाठी डॉक्टर बार्लीच्या पिठाची चपाती खाण्याचा सल्ला देतात. डॉ. रॉबिन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, 'गव्हाच्या पिठाच्या तुलनेत, बार्लीमध्ये ३ पट जास्त प्रथिने, ४ पट जास्त फायबर आणि २० पट जास्त चरबी जाळण्याची शक्ती असते.'
एक चूक आणि वजन वाढेल भराभर, तज्ज्ञ सांगतात वेटलॉससाठी खाण्याची योग्य पद्धत - वजनात दिसेल फरक...
याचबरोबर, गव्हामध्ये ग्लूटेन असते, जे वजन वाढवण्याचे काम करते. तर बार्लीमध्ये बीटा ग्लुकन असते, जे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगाने वाढवते. याशिवाय, बीटा ग्लुकन चयापचय क्रियेचे वेग देखील वाढवते. चयापचय वाढवून, शरीर अधिक कॅलरीज बर्न करण्यास सक्षम होते, ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते.
सुटलेली ढेरी-जाडजूड मांड्या कमी करायच्या आहेत? दिवसभरात प्या ५ प्रकारचं पाणी, वजनही उतरेल चटकन...
डॉक्टर सांगतात बार्ली खाण्याची योग्य पद्धत...
वजन कमी करण्यासाठी, डॉक्टर बार्लीच्या पिठाची चपाती खाण्याची तसेच बार्लीचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. यासाठी २ ग्लास पाण्यात मूठभर बार्ली टाकून उकळवा. जेव्हा अर्धे पाणी शिल्लक राहते तेव्हा ते गाळून दिवसभर प्या. असे केल्याने तुम्हाला थोड्याच दिवसांत तुमच्या वजनात फरक दिसून येईल.