Join us

दिवाळीत फराळावर ताव मारला तरी वजन वाढणार नाही, फक्त ३ टिप्स लक्षात ठेवा- वजन राहील कंट्रोलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2023 15:43 IST

How To Prevent Weight Gain During Diwali: वजन वाढेल म्हणून घाबरत घाबरत फराळ करू नका... मनसोक्त फराळ करा फक्त या काही गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे मग वजन कंट्रोलमध्ये राहील. (Weight Loss tips for festive season)

ठळक मुद्देफराळ करताना या ३ गोष्टी मात्र लक्षात ठेवा. वजन मुळीच वाढणार नाही...

दिवाळीत फराळावर (Diwali faral) ताव मारायचा नाही तर मग कधी... कारण एरवी आपण कितीही चिवडा, लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळे खात असलो तरी हे सगळे पदार्थ दिवाळीच्या दिवसांत कुटूंब- मित्रमैत्रिणींच्या गराड्यात बसून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे दिवाळीत फराळ मिस करूच शकत नाही. पण आता वजनाबाबत सतर्क झालेल्या अनेक जणांना दिवाळीचा फराळ करताना मनात कायम वजन वाढण्याची भीती वाटत असते. तुम्हालाही अशी भीती वाटत असेल तर ती लगेचच काढून टाका आणि फराळाचा मनसोक्त आनंद घ्या (Weight Loss tips for festive season). फक्त फराळ करताना या ३ गोष्टी मात्र लक्षात ठेवा. वजन मुळीच वाढणार नाही...(3 Effective tips to prevent weight gain during Diwali)

 

दिवाळीत फराळ करून वजन वाढू नये यासाठी टिप्स...

१. व्यायामात खंड नको

दिवाळी आली म्हणून काही जण एकदम रिलॅक्स होऊन जातात आणि मग त्यांचं रोजचं वर्कआऊट करणं विसरून जातात. किंवा सगळे घरात असल्याने वर्कआऊट करण्याचा कंटाळा येतो.

 पदा‌र्थ खा, केस पांढरेच होणार नाहीत

फराळावर ताव मारणार असाल तर मग व्यायामात मात्र खंड होऊ देऊ नका. रोजच्या एवढा व्यायाम नाही केला तरी थोडा फार व्यायाम कराच. कारण फराळ पचावा म्हणून या दिवसांत तुमचं चालणं- फिरणं होणं खूप गरजेचं आहे.

 

२. भरपूर पाणी प्या

फराळाचे पदार्थ हमखास तेलकट- तुपकट असतातच. त्यामुळे ते पचायला जड असतात.

पुदिना विकत आणला की वाया जातो? कुंडीत लावा, ३ सोप्या स्टेप्स- हवा तेव्हा ताजा पुदिना मिळेल

त्यामुळे या जड पदार्थांचं पचन सोपं व्हावं, तसेच डिहायड्रेशन होऊ नये, म्हणून या दिवसांत आठवण ठेवून भरपूर पाणी प्या. पाण्याऐवजी ताक, लिंबू सरबत पण साखर न टाकलेलं असे पदार्थ घेतले तरी चालतील.

 

३. प्रमाणात खा

फराळातलं गोडधोडही खायचंय आणि जेवणही यथेच्छ भरपेट करायचं, असं करू नका. कारण असं केल्याने तुमच्या पोटावर ताण येईल. फराळ करणार असाल तर मग जेवण थोडं कमी करा.

दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

किंवा जेवणात फक्त सलाड, हिरव्या पालेभाज्या, सूप यांचं प्रमाण जास्त राहू द्या. असं केल्याने वजन नक्कीच नियंत्रणात राहू शकतं. 

 

टॅग्स :दिवाळी 2023अन्नवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सव्यायाम