वाढलेले वजन आणि पोटाची वाढलेली चरबी ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. फिट राहण्यासाठी आपण अनेकदा जिम किंवा डाएटचा विचार करतो, पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे चालणे (Walking), जॉगिंग (Jogging) किंवा धावणे (Running). पण प्रश्न असा पडतो की, या तिन्हींपैकी नेमके काय केल्याने वजन लवकर कमी होते?(Weight loss tips for beginners Marathi) अनेकांना वाटते की जेवढे जास्त धावू तेवढ्या लवकर पोटाची चरबी वितळेल, तर काही जण मानतात की लांब अंतरापर्यंत चालणे अधिक फायदेशीर आहे.(Belly fat burning exercises at home)
पण या तिन्ही प्रकारच्या व्यायामांचे शरीरावर होणारे परिणाम वेगवेगळे आहेत. वजन कमी करणे हे आपण एका तासात किती कॅलरीज (Calories) जाळतो आणि आपल्या हृदयाचे ठोके किती वाढतात यावर अवलंबून असते. जर आपल्याला 'मेणासारखी' चरबी वितळवायची असेल, तर या व्यायामांचे गणित नीट समजून घ्यावे लागेल. धावण्याने स्टॅमिना वाढतो, तर चालण्याने सांध्यांवर ताण न येता वजन कमी होते. आपल्या शरीरासाठी आणि झटपट वेट लॉससाठी वॉक, रनिंग आणि जॉगिंगपैकी सर्वात बेस्ट काय आहे.
जेवल्यानंतर पोट डब्ब होतं, फुगल्यासारखं वाटतं? AIIMS डॉक्टरांचा सल्ला, ५ उपाय- पचन सुधारेल लवकर
चालणे, धावणे आणि जॉगिंग: फरक काय?
वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिटमध्ये राहणे गरजेचे असते. तासभर चालल्याने आपल्या साधारणतः २५० ते ३०० कॅलरी जळतात. तर जॉगिंग केल्याने एका तासात साधारणतः ४०० ते ५०० कॅलरीज जळतात. आणि धावल्याने एका तासात साधारणतः ६०० ते ८०० किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरी जळतात.
पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी 'हाय इंटेन्सिटी' व्यायाम जास्त प्रभावी ठरतो. धावण्यामुळे शरीराची चयापचय शक्ती (Metabolism) वाढते, ज्यामुळे व्यायाम थांबवल्यानंतरही शरीरातील कॅलरीज जळण्याची प्रक्रिया सुरू राहते. याला 'आफ्टरबर्न इफेक्ट' म्हणतात. पण आपण सुरुवातीलाच खूप फास्ट धावू लागलो, तर थकव्यामुळे आपण जास्त वेळ व्यायाम करू शकणार नाही. म्हणूनच, 'ब्रिस्क वॉकिंग' (वेगाने चालणे) आणि 'जॉगिंग' केल्याने पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते.
जर आपले वजन खूप जास्त असेल, तर धावणे टाळावे. यामुळे गुडघ्यांवर आणि सांध्यांवर ताण येऊ शकतो. अशा व्यक्तींनी वेगाने चालण्यापासून (Brisk Walking) सुरुवात करावी. ज्यांना झटपट रिझल्ट हवा आहे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले आहे, त्यांनी रनिंगला प्राधान्य द्यावे. हृदयरोग किंवा वयस्कर व्यक्ती अशा लोकांसाठी जॉगिंग किंवा मध्यम गतीने चालणे हा सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे.
