Join us  

मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर नक्की खा ४ पदार्थ, वेट लॉस होईल सुपरफास्ट; फिट राहायचं असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2024 4:07 PM

Walking after meals can help you lose weight : काही लोकं सकाळी असे काही पदार्थ खातात, ज्यामुळे व्यायाम करूनही वजन कमी होत नाही

मॉर्निंग वॉकने दिवसाची सुरुवात केल्यानंतर, संपूर्ण दिवस आनंदात आणि चांगला जातो. यामुळे शरीर फिट तर राहते, शिवाय गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. पण मॉर्निंग वॉक करण्याचा खरा फायदा नाश्ता केल्याने मिळतो (Weight Loss Tips). अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अहवालानुसार, 'मॉर्निंग वॉकचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे हृदय सुदृढ, बॅड कोलेस्टेरॉल, लठ्ठपणाची समस्या कमी होते (Fitness).शिवाय ताण देखील कमी होतो. पण हे आरोग्यदायी फायदे तेव्हाच मिळतात, जेव्हा आपण मॉर्निंग वॉक केल्यानंतर हेल्दी नाश्ता खातो (Morning Walk).

काही लोकं सकाळी नाश्त्यामध्ये पराठे, हाय कॅलरीज फूड किंवा तळकट पदार्थ खातात. पण यामुळे मॉर्निंग वॉकची मेहनत व्यर्थ जाते. मॉर्निंग वॉकचा पुरेपूर फायदा शरीराला मिळावा यासाठी आपण सकाळची सुरुवात ४ पदार्थ खाऊन करू शकता(Walking after meals can help you lose weight).

ओट्स

ओट्स खाल्ल्याने उर्जा वाढते आणि शरीर निरोगी राहते. आपण सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खाऊ शकता. ओट्समध्ये जीवनसत्त्वे, फायबर, खनिजे, प्रथिने असतात. शिवाय त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. यामुळे आरोग्याला फायदे आणि त्वचा देखील तुकतुकीत दिसते. मुख्य म्हणजे जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, ओट्स हा उत्तम पर्याय आहे.

किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी रोज किती ग्लास पाणी प्यावे? पाणी प्यायल्याने धोका टळतो?

ड्रायफ्रुट्स

मॉर्निंग वॉक केल्यानंतर सुका मेवा खाणं गरजेचं आहे. ड्रायफ्रुट्समध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर असते. ड्रायफ्रुट्समधील हे पोषक घटक शरीराला उर्जा तर देतेच, यासह रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते. ते योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन कण्ट्रोलमध्ये राखण्यास, पचन सुधारण्यास, हाडांची मजबुती आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.

फळे

काही लोकं सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे खातात. फळे खाल्ल्याने आरोग्य सुदृढ राहते. या फळांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के आणि ई सोबत फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे खनिजे असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मुख्य म्हणजे हंगामी फळे खायला हवी. जे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करतात.

प्रसूतीनंतर वाढलेलं वजन-ओटीपोट कमीच होईना? 'या' फुलांच्या पाण्याने अंग शेका; वेट लॉससाठी उत्तम

स्प्राउट्स

वजन कमी करण्यासाठी आपण स्प्राउट्स भेळ खाऊ शकता. भिजवलेले मूग, मटकी, हरभरे, चणे आणि त्यात मसाले मिक्स करून भेळ तयार करू शकता. चटपटीत स्प्राउट्स भेळमध्ये फायबरसह इतर पौष्टीक घटक असतात. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय वेट लॉससाठीही मदत होते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स