Join us

उन्हाळ्यात वजन कमी करायचं ? सातूच्या पिठाचे 'हे' ५ पदार्थ करतील जादू - वेटलॉस होऊन दिसाल स्लिमट्रिम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 20:10 IST

These 5 Sattu recipes can help lose weight faster : 5 Sattu recipes for weight loss : उन्हाळ्यात थंडाव्यासोबतच वजन कमी करण्यासाठी सातूच्या पिठाचे ५ पदार्थ नक्की खा...

उन्हाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण आपला आहार, खाण्यापिण्याच्या सवयी यात थोडाफार बदल करतो. वजन कमी (5 Sattu recipes for weight loss) करण्यासाठी एक्सरसाइज सोबतच आपल्या आहाराकडे देखील तितकेच लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या ऋतूत वजन कमी करणार असाल तर तुमच्या डाएट मध्ये काही विशेष पदार्थ असेल पाहिजे, त्या पदार्थांपैकीही एक म्हणजे सातूचे पीठ(These 5 Sattu recipes can help lose weight faster).

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील उष्णता कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील सातूचे पीठ खाणे फायदेशीर ठरते. सातूच्या पीठामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी सातूचे पीठ खाणे उपयुक्त ठरते. जर तुम्हाला देखील उन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर सातूच्या पिठाचे हे ४ प्रमुख पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवेत, ते ४ पदार्थ कोणते ते पाहूयात. 

वजन कमी करण्यासाठी सातूच्या पिठाचा आहारात समावेश करावा... 

१. सातूच्या पिठाची स्मूदी :- सातूच्या पिठाची स्मूदी तयार करण्यासाठी सर्वातआधी केळ, सफरचंद किंवा जांभूळ यासारख्या फळांना दूध किंवा दह्यात भिजवून मग एकत्रित मिक्सरमधून ब्लेंड करून घ्यावे. त्यानंतर, या मिश्रणात १ ते २ टेबलस्पून सातूचे पीठ घालावे. सगळे मिश्रण पुन्हा एकदा ब्लेंड करून घ्यावे. स्मूदी पिण्यासाठी तयार आहे. यात आपण वरून चिया सीड्स किंवा अळशीच्या बिया घालून स्मूदी पिण्यासाठी सर्व्ह करावी. या स्मूदीमध्ये फायबर आणि प्रोटिन्स भरपूर प्रमाणांत असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

विराट कोहलीच्या पोषणतज्ज्ञांनी सांगितली खास युक्ती, ४ सवयी फक्त बदला-फिटनेस मिळवा कोहलीसारखा!

२. सातूच्या पिठाचा पराठा :- आपण कोणत्याही प्रकारचा पराठा करताना त्यात चमचाभर सातूचे पीठ मिक्स करु शकतो. याचबरोबर, आपण  गव्हाच्या पिठात सातूचे पीठ मिक्स करून मग त्यात चवीनुसार हळद, मीठ, लाल तिखट, जिरं, ओवा असे पदार्थ घालून देखील चमचमीत टेस्टी पराठा तयार करु शकतो. हा पराठा आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकता. हा पराठा खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. परिणामी, वजन कमी करण्यास अधिक मदत होते. 

३. सातूच्या पिठाचे सूप :- तुम्ही कोणत्याही प्रकारचे सूप तयार करताना त्यात सातूचे पीठ मिक्स करू शकता. सगळ्यात आधी गरम पाणी घेऊन त्यात चमचाभर सातूचे पीठ घालावे. आता पीठ आणि पाणी यांचे एकत्रित गरम मिश्रण तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही सूपमध्ये मिक्स करून सूप तयार करु शकता. यामुळे तुमचे सूप अधिक घट्ट - दाटसर आणि पौष्टिक बनते. 

खरबूज की कलिंगड? वजन कमी करायचं तर उन्हाळ्यात यापैकी कोणतं फळ खाणं जास्त फायद्याचं...

शिल्पा शिरोडकरने 'हा' खास फॉर्म्युला वापरुन वयाच्या पन्नाशीत केलं वजन कमी, पाहा सिक्रेट...

४. सॅलेड किंवा कोशिंबीर :- वजन कमी करण्यासाठी आपण सॅलेड किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर खातोच. अशा सॅलेड किंवा कोशिंबीरमध्ये आपण हे सातूचे पीठ वरून भुरभुरवून घालू शकता. यासाठी सातूचे पीठ आधी पॅनमध्ये कोरडे भाजून घ्यावे. हे भाजून घेतलेले पीठ तुम्ही सॅलेड किंवा कोशिंबीरमध्ये वरून भुरभुरवून घालू शकता यामुळे तुमचे सॅलेड किंवा कोशिंबीर अधिक पौष्टिक बनेल. 

५. सातूच्या पिठाचे खास ड्रिंक :- सातूच्या पिठाचे खास ड्रिंक तयार करण्यासाठी २ टेबलस्पून पीठ थंड पाणी किंवा ताकामध्ये मिसळून घ्यावे. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, जिरे पावडर, लिंबाचा रस घालावा. हे सातूच्या पिठाचे खास ड्रिंक प्यायल्याने बराच वेळ तुमचे पोट भरलेले राहते. यामुळे तुम्हाला वारंवार फारशी भूक नाही लागत. यामुळे वजन कमी करण्यास अधिक मदत होते. याचबरोबर, उन्हाळ्यात हे ड्रिंक प्यायल्याने आपल्या पोटातील उष्णता कमी होऊन थंडावा मिळतो.

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नपाककृती