Join us  

चायनीजवर मारताय ताव, पण तब्येतीचा उतरेल भाव! तज्ज्ञ सांगतात, सतत चायनीज खाण्याचे भयंकर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 5:58 PM

तज्ज्ञ सांगतात वारंवार चायनिज खाल्ल्याने शरीरावर होतात घातक परिणाम, जडतात अनेक रोग.

ठळक मुद्देअजिनोमोटो लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे लहान मुलांना अशा पदार्थांपासून दूर ठेवा.

सध्या अनेकांना चायनीज खायला खूप आवडते. लहान मुले असो अथवा मोठी माणसे, सगळ्यांनाच चायनिज पदार्थांनी वेड लावले आहे. त्यामुळेच हल्ली प्रत्येक शहरात चायनीजचे गाडे वाढलेले दिसतात; परंतु, या चायनीज पदार्थ बनिवण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. हा पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्याचे अतिसेवन अनेक आजारांना निमंत्रण देणारे आहे. त्यामुळे चायनीज खाताना आणि लहान मुलांनाही चायनिज देताना या गोष्टींचा विचार अवश्य करावा आणि आपले आरोग्य सांभाळावे. 

 

सर्वसामान्यपणे अजिनोमोटो म्हणून आपण ज्या पदार्थाला ओळखतो, त्याचे शास्त्रीय नाव मोनोसोडियम ग्लुटामेट असे आहे. संशोधनानुसार असे सांगण्यात आले आहे की, चायनीज पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारा हा पदार्थ क्वचितप्रसंगी अगदी कमी प्रमाणात घेतला गेला, तर कदाचित फारसा हानिकारक ठरत नाही; परंतु अधिक प्रमाणात याचे सेवन करणे शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा तसेच मानसिक आरोग्य व झोपेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

 

कसा आहे अजिनोमोटो?अजिनोमोटोचा वापर मुख्यत: चीनमधील खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. हे खाद्यामध्ये वापरतात. हा मसाला नाही. हा एक तुरटीसारखी चव असणारा पदार्थ आहे. आपण जसे आंबट, गोड, तिखट, खारट खातो; तसेच हा एक चवीसाठीचा पदार्थ आहे. जो थोडा तुरट आहे. आपण पॅकिंगचे फूड खातो, ते अधिक दिवस या अजिनोमोटोमुळे स्वादिष्ट राहते.

 

या पदार्थांमध्येही असते अजिनोमोटोबाहेरचे चायनीज कधीतरीच खाणाऱ्या किंवा न खाणाऱ्या लोकांना असे वाटते, की ते चायनिज खात नाहीत, त्यामुळे त्यांच्या पोटात अजिनोमोटो जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. पण केवळ चायनिज पदार्थांमध्येच अजिनोमोटो असते, असे नाही. अनेक पॅक फूड उत्पादनांमध्येही आजकाल अजिनोमोटोचा वापर करण्यात येतो. घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे जेवण देणारे मसाले, दोन मिनिटांत बनणारी सूप, मॅजिक मसाले, चिप्स अशा अनेक गोष्टींमध्ये अजिनोमोटो असते. तसेच फ्लेव्हरसाठीही त्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे चायनिज पदार्थांसोबतच असे पॅक फूड पदार्थही टाळणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरते. 

 

तज्ज्ञ सांगतातअजिनोमोटो आणि असे बाकीचे फ्लेवरचे पदार्थ टाळण्यासाठी सर्वांत उत्तम उपाय म्हणजे घरी घरच्यासारखे जेवा आणि रेस्टॉरंटसारखे जेवण बाहेर जाऊन कधीतरी खाण्यापुरते मर्यादित ठेवा. अती खाल्ले तर त्याचा विपरीत परिणाम होतो.- कस्तुरी भोसले, आहारतज्ज्ञ

अजिनोमोटो खाण्याचे दुष्परिणाम?- अजिनोमोटोची चव मिठासारखी लागते. या कारणामुळेच असे सांगितले जाते की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यांनी अजिनोमोटो असणारे पदार्थ खाऊ नये. 

- अजिनोमोटोचा अतिवापर डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो.- पॅकिंग फूड अधिक प्रमाणात खाल्ल्याने तुमची जाडी वाढू शकते.- अजिनोमोटो लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्यामुळे लहान मुलांना अशा पदार्थांपासून दूर ठेवा.

- हृदयविकार असणाऱ्या लोकांनी अजिनोमोटो खाऊ नये.- ज्यांना डोकेदुखीचा त्रास आहे, सतत डोके दुखत असते, अशा लोकांनी अजिनोमोटो खाल्ल्यास त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो. अशा लोकांना मायग्रेनचा त्रासही होऊ शकतो. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्न