बऱ्याच बॉलिवूड अभिनेत्री आपल्या लाईफस्टाईलवर खूप खर्च करतात. तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही देखील फिटनेसवर अधिक फोकस करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तापसी जेवढी मेहेनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढेच लक्ष ती आपल्या फिटनेसकडे देखील देते. बिनधास्त तापसी पन्नू आपल्या फिटनेस रुटीनबाबत फार कॉन्शियस असते. आपल्या एक्सरसाइज रुटीनसोबतच ती आपलं डाएटही कटाक्षाने फॉलो करते. अभिनेत्री तापसी पन्नू प्रचंड कष्टाळू अभिनेत्री आहे. सिनेमातील भूमिका मोठ्या पडद्यावर प्रभावीपणे साकारण्यासाठी ती डाएटपासून ते व्यायामापर्यंतच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करते(Taapsee Pannu shares a home-made recipe to her fat-burner 'exotic sunset drink').
तापसी पन्नूचे सनसेट ड्रिंक नेमके आहे तरी काय...
साहित्य :-
१. ऍपल सायडर व्हिनेगर - १ टेबलस्पून २. मेथी दाणे - १ टेबलस्पून ३. हळद पावडर - १/२ टेबलस्पून ४. किसलेल आलं - १/२ टेबलस्पून ५. कोमट पाणी - १ कप
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
कृती :-
१. सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन ते मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवून द्यावे. २. मग एका ग्लासात हे गरम पाणी घेऊन त्यात ऍपल सायडर व्हिनेगर मिसळून घ्यावे. ३. त्यानंतर या मिश्रणात मेथीचे दाणे घालून ते काहीवेळासाठी तसेच ठेवून द्यावे. ४. आता या मिश्रणात हळद पावडर व किसलेल आलं घालून हे मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे. ५. हे तयार झालेले सनसेट ड्रिंक थोड्यावेळासाठी तसेच ठेवून द्यावे, जेणेकरुन त्यात घातलेल्या पदार्थांतील मुख्य पोषणमूल्य त्या गरम पाण्यांत उतरतील.
मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...
व्यायाम केला तर चेहऱ्यावर चकचकीत ग्लो येतो हे खरं की खोटं ? तज्ज्ञ सांगतात...
१. मेथी दाणे : - मेथीच्या दाण्यांमध्ये फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात असते. यासोबतच मेथीत रक्तातील साखर नियंत्रित करणारे एमिनो अॅसिडदेखील असते. पचनप्रक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो आणि यामुळे शरीरातील विषारी घटक सहजरित्या शरीराबाहेर फेकले जातात.
२. हळद :- हळद रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. यासोबतच इन्सुलिन प्रतिरोधकता रोखते. परिणामी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. हळद शरीरातील अतिरिक्त फॅट बर्न करून चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.
३. ऍपल सायडर व्हिनेगर :- ऍपल सायडर व्हिनेगरमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळते. ऍपल सायडर व्हिनेगर गरम पाण्यांतून रोज घेतल्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत मिळते.
४. आलं :- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकून वजन कमी करण्यासाठी आलं फारच उपयुक्त असते.