पोळी, भाजी, भात, वरण, चटणी, कोशिंबीर, लोणचे हा आपला रोजचा आहार असतो आणि तो सगळ्या ऋतूंमध्ये जवळपास सारखाच असतो. पण तरीही ऋतूमानानुसार आपल्या आहारपद्धतीमध्ये काही बदल करणे आवश्यक असते. कारण प्रत्येक ऋतूनुसार वातावरणात बदल हाेतो आणि त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होत असतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रत्येक ऋतूनुसार मिळणारी वेगवेगळी फळं, भाज्या किंवा स्वयंपाक घरातले काही खास जिन्नस आपल्या आहारात असणे गरजेचे असते (3 Most Healthy Food Items For Winter). तसेच आता हिवाळ्यात कोणते पदार्थ आवर्जून खायला पाहिजेत याविषयी ही खास माहिती पाहा..(superfood for winter)
हिवाळ्यात तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी खायलाच पाहिजेत असे पदार्थ
हिवाळ्यात कोणते पदार्थ आपल्या तब्येतीसाठी खऱ्या अर्थाने सुपरफूड ठरतात याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ डॉक्टरांनी docpriyankasehrawat या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कोणते पदार्थ सांगितले आहेत ते पाहा..
हातापायाची त्वचा थंडीमुळे कोरडी पडली? हा घरगुती लेप लावा- त्वचा होईल मऊ- चमकदार
१. गूळ
गूळ हिवाळ्यात खायलाच हवा. कारण तो उष्ण असल्याने अंगात उब निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतो. गुळामधून चांगल्या प्रमाणात लोह मिळते. त्यामुळे ॲनिमियाचा त्रास कमी होतो. मॅग्नेशियम आणि झिंक हे दोन्हीपण गुळातून चांगल्या प्रमाणात मिळतात. पण त्याचा अतिरेक करू नये, असंही डॉक्टर सांगतात.
२. लिंबूवर्गीय फळं
हिवाळ्यात संत्री, मोसंबी ही लिंबूवर्गीय फळं बाजारात भरपूर प्रमाणात येतात. यापैकी एक फळ दररोज खायलाच हवं असं डॉक्टर सुचवतात.
मंगळसूत्रासाठी घ्या लेटेस्ट फॅशनच्या वाट्या, १० सुंदर डिझाईन्स- पाहूनच सगळे म्हणतील वॉव..
कारण या फळांमधून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते.
३. रताळे
रताळ्यांमधून फायबर आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे रताळे नियमितपणे खा. लहान मुलांनाही रताळे आवर्जून खायला द्यावे, असं डॉक्टर सुचवतात.