नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वीच आपल्या डोक्यात काही संकल्प घोळ घालतात असतात. यावर्षी नक्की वजन कमी करायचं, जीमला जायचं आणि जंक फूड बंदही करायचं. पण सतत बाहेरच खाणं, गोडाचे पदार्थ, ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे वजन काही लवकर कमी होत नाही.(weight loss 2026) वाढत्या वजनामुळे आपल्या दिसण्यावरच नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्वावर फरक पडतो. वजन वाढल्यामुळे थकवा, आळस, आत्मविश्वास कमी होतो. श्वास घेण्यास अडचणी, पाय दुखणे यांसारख्या समस्या देखील जाणवतात.(belly fat reduction) वजन कमी करण्यासाठी आपण जीमची महागडी मेंबरशीप घेतो खरं पण ती देखील वाया जाते. महागडे डाएट प्लान, सप्लिमेंट्स किंवा उपवास करतो.(fat loss drink) पण याचा देखील काही उपयोग होत नाही. वजन कमी करण्यासाठी शरीराचा मेटाबॉलिझम योग्य पद्धतीने काम करणं खरं तर खूप महत्त्वाचा आहे. सकाळची सुरुवात योग्य पेयाने केली तर दिवसभर फॅट बर्निंग प्रक्रिया चांगली राहते. आपण आपल्या आहारात सुपर ड्रिंक प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
न्यूट्रिशनिस्ट, वेट लॉस कोच नेहा परिहार यांनी इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला. जर आपल्यालाही फॅट लॉस किंवा पोटावर वाढलेली चरबी कमी करायची असेल तर एक सुपर ड्रिंक सांगितलं आहे. पाहूया या ड्रिंकविषयी
हे सुपर ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला १ चमचा ओवा, २ मोठे चमचे बडीशेप, १ मोठा चमचा मेथीचे दाणे, १ मोठा चमचा किसलेले आले आणि अडीच लीटर पाणी लागेल. या सर्व साहित्याला एकत्र करुन त्याचे पाणी तयार करा. हे पाणी पिण्यापूर्वी त्यात अर्धा लिंबाचा रस मिसळा. नियमितपणे हे पाणी प्यायाल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होईल.
या सुपर ड्रिंकमुळे पचनसंस्था सुरळीत होते. आणि ब्लोटिंगपासून आराम मिळतो. हे ड्रिंक आपल्या वाढलेल्या इंसुलिनला सपोर्ट करते. ज्यामुळे ब्ल़ड शुगर कंट्रोलमध्ये राहते. नवीन वर्षात वजन कमी करण्याची तयारी करताना फक्त ड्रिंकवर अवलंबून राहणं पुरेसं नाही. त्यासोबत संतुलित आहार, योग्य झोप आणि थोडीफार हालचाल करणं देखील गरजेचे आहे. सतत बसून काम करणाऱ्यांनी दर तासाला थोडं चालायला हवं, शिड्यांचा वापर करणं किंवा हलका स्ट्रेचिंग करायला हवे. रात्री उशिरा जेवण, गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेये टाळली तर वजन घटवणं अधिक सोपं होईल.
Web Summary : Start the New Year strong! Drink this special concoction to boost metabolism and burn fat. Combine carom seeds, fennel, fenugreek, ginger, and lemon for a slimmer you. Pair it with a balanced diet and exercise.
Web Summary : नए साल की शुरुआत स्वस्थ तरीके से करें! मेटाबॉलिज्म बढ़ाने और चर्बी कम करने के लिए यह खास ड्रिंक पिएं। पतला होने के लिए कैरम के बीज, सौंफ, मेथी, अदरक और नींबू मिलाएं। इसे संतुलित आहार और व्यायाम के साथ लें।