Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सुपरहिट सिंगर सुनिधी चौहानने 'असं' केलं वजन कमी, काय आहे तिच्या वेटलॉसचा अनोखा फंडा...

सुपरहिट सिंगर सुनिधी चौहानने 'असं' केलं वजन कमी, काय आहे तिच्या वेटलॉसचा अनोखा फंडा...

Sunidhi Chauhan's diet secrets for toned body at 41 revealed 'Lost 10 kg in 5 days : Sunidhi Chauhan weight loss diet : Sunidhi Chauhan's Diet Secre​ts That Helped Her Lose Weight : कमी कालावधीत झटपट वजन कमी करण्यासाठी सुनिधी चौहानने फॉलो केलं खास रुटीन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2025 16:13 IST2025-01-01T16:07:19+5:302025-01-01T16:13:08+5:30

Sunidhi Chauhan's diet secrets for toned body at 41 revealed 'Lost 10 kg in 5 days : Sunidhi Chauhan weight loss diet : Sunidhi Chauhan's Diet Secre​ts That Helped Her Lose Weight : कमी कालावधीत झटपट वजन कमी करण्यासाठी सुनिधी चौहानने फॉलो केलं खास रुटीन...

Sunidhi Chauhan weight loss diet Sunidhi Chauhan's Diet Secre​ts That Helped Her Lose Weight Sunidhi Chauhan's diet secrets for toned body at 41 revealed 'Lost 10 kg in 5 days | सुपरहिट सिंगर सुनिधी चौहानने 'असं' केलं वजन कमी, काय आहे तिच्या वेटलॉसचा अनोखा फंडा...

सुपरहिट सिंगर सुनिधी चौहानने 'असं' केलं वजन कमी, काय आहे तिच्या वेटलॉसचा अनोखा फंडा...

वजन कमी करणे म्हणजे काही लोकांसाठी महाकठीण असते. तर याउलट, काहींचे वजन अगदी सहजासहजी लगेच कमी होते. सध्या सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) हिच्या वेटलॉस (Sunidhi Chauhan weight loss diet) ट्रान्सफॉर्मेशनची सर्वत्र चर्चा सुरु आहे. संगीत क्षेत्रात आपल्या दमदार आवाज आणि शानदार स्टेज परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या गायिका सुनिधी चौहान हिने नुकतेच अगदी कमी कालावधीत वजन ( Sunidhi Chauhan's Diet Secre​ts That Helped Her Lose Weight) कमी केलं आहे. वयाची चाळीशी उलटून देखील तिने हे अगदी सहजसोप्या पद्धतीने केल्यामुळे तिचा हा वेटलॉसचा प्रवास सगळ्यांचा चकित करणारा आहे(Sunidhi Chauhan's diet secrets for toned body at 41 revealed 'Lost 10 kg in 5 days).

सुनिधीने नुकतेच तिच्या फिटनेस आणि डाएटशी संबंधित काही सिक्रेट शेअर केली आहेत. सुनिधी चौहानचे फिटनेस ट्रेनर विराज सरमळकर यांनी दिलेल्या मुलाखतीत तिची वेटलॉस जर्नी आणि वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल अनेक सिक्रेट खुलेपणाने सांगितली आहेत. सुनिधीने तिच्या नवीन डान्स नंबर ‘आंख’ या गाण्यासाठी अवघ्या १० दिवसांत ५ किलो वजन कमी केले आहे.  सुनिधीचे वेटलॉस सिक्रेट नेमकं काय आहे, तिने अगदी कमी कालावधीत कसं वजन कमी केल आहे याबाबदल अधिक माहिती पाहूयात. 

सुनिधीने कस केल वजन कमी... 

तिच्या फिटनेस प्रवासाबद्दल बोलताना सुनिधीने सांगितले की, फिटनेससाठी कठोर उपाय, क्रॅश डाएट किंवा अमुकच आहार खाण्याची गरज नाही, तर केवळ सातत्यच तुम्हाला खरे यश देऊ शकते. तिच्या नवीन गाण्यात सुनिधी अभिनेत्री सान्या मल्होत्रासोबत बिकिनी लुकमध्ये डान्स करताना दिसत आहे. या गाण्यासाठी सुनिधीने अवघ्या १० दिवसांत तिचे ५ किलो वजन कमी केले आहे. सुनिधीच्या फिटनेस ट्रेनरने सांगितले की सुनिधी ९० किलोंचे वजन उचलून एक्सरसाइज करते, ७० किलोंचे वजन उचलून स्क्वॅट करू शकते आणि सपोर्टशिवाय पुल-अप देखील करू शकते. याशिवाय तिने ५ किलोमीटरची रन २५ मिनिटांत एकाच वेळी पूर्ण केली आहे.

बाळंतपणात वाढलेलं २३ किलो वजन नेहा धुपियाने चटकन केलं कमी! ते कसं, वाचा...

सुनिधीचे डाएट सिक्रेट... 

सुनिधी चौहान मानते की फिटनेसचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे योग्य आहार. विराजने सांगितले की सुनिधी तिचा कॅलरी कंट्रोल डाएट प्लॅन फॉलो करते. ती दररोज १२०० पेक्षा कमी कॅलरी शरीरात इनटेक करते. याबद्दल बोलताना सुनिधी म्हणाली की ती यासाठी 'इंटरमिटेंट फास्टिंग' करते. ती दररोज १६ तास फास्टिंग करते आणि ८ तासांच्या कालावधीमध्येच ती अन्न खाते ज्यामुळे तिचे वजन लवकर कमी झाले आहे.

'या' ५ व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे महिलांच्या हृदयाचे आरोग्य येते धोक्यात, जीव वाचवायचा तर...

ती डाएटमध्ये काय खाते ?

सुनिधी तिच्या दिवसाची सुरुवात ब्रेकफास्टने करते आणि कधी कधी आंबट सॉरडो ब्रेडही खाते. ती या मुलाखतीत म्हणाली की, “Intermittent Fasting करताना, आपण प्रथम प्रथिने आणि फॅट्सने दिवसाची सुरुवात केली पाहिजे, कारण हे कार्बोहायड्रेट्सपेक्षा ते  वजन कमी करण्यासाठी अधिक महत्वाचे आहेत. मला भूक लागली तर मी जेवते. मला सहसा ५ वाजण्याच्या सुमारास भूक लागते आणि त्या वेळी मी नट्स खाते, यामुळे पुढील तीन तास माझे पोट भरलेले राहते. जेव्हा मी वेट लिफ्टिंग करते, जे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा असते, तेव्हा मी प्रोटीन शेकदेखील पिते. माझा दिवसाचा शेवटचा मील हा संध्याकाळी ७ :३० च्या सुमारास घेते. त्यानंतर मी काहीच खात नाही.”

'तारक मेहता' फेम दीप्ती साधवानीने केलं तब्बल १७ किलो वजन कमी, बघा डाएट प्लॅन- वेटलॉसचे सिक्रेट...


Web Title: Sunidhi Chauhan weight loss diet Sunidhi Chauhan's Diet Secre​ts That Helped Her Lose Weight Sunidhi Chauhan's diet secrets for toned body at 41 revealed 'Lost 10 kg in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.