Join us

शहनाज गिल रोज सकाळी पिते खास ड्रिंक, सोपा घरगुती उपाय- वजन होईल झर्रकन कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 11:54 IST

Shehnaaz Gill weight loss journey: Shehnaaz Gill fitness secret: Shehnaaz Gill weight loss transformation: शहनाज ने एक खास ड्रिंक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले ज्यामुळे वजन काही प्रमाणात कमी होऊ शकते. असं तिने म्हटलं, हे खास ड्रिंक कोणतं पाहूया.

बिग बॉस १३ या रिऍलिटी शोमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शहनाज गिल.(Shehnaaz Gill weight loss journey) ती एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण सुंदर गायिका देखील आहे.(Shehnaaz Gill fitness secret) बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या शरीराकडे लक्ष दिले. तिच्या वाढत्या वजनामुळे अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. तिचा वजन कमी करण्याचा प्रवास, तिची फिट राहण्याची जर्नी अधिकच लोकप्रिय ठरली. (Shehnaaz Gill weight loss transformation)तिने सहा महिन्यांत ५५ किलो वजन कमी करुन फिट राहण्याचा सल्ला दिला.(Shehnaaz Gill before and after weight loss) व्यायाम, जीम आणि खाण्यापिण्यासह आहारात तिने आणखी एक महत्त्वाची गोष्ट नियमितपणे केली ती म्हणजे हे खास ड्रिंक. हे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने चयापचय चांगले होऊन चरबी वेगाने जळू लागते.

परफेक्ट फिगरसाठी मलायका अरोरा रोज न चुकता करते एक गोष्ट, सोपा फिटनेस मंत्र- सर्वांना जमण्यासारखा.. 

आजच्या धावपळीच्या जगात अनेकांना व्यायाम किंवा जीमला जाण्यासाठी वेळ नसतो. वजन कमी करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स घेतात. परंतु, शहनाज ने एक खास ड्रिंक तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले ज्यामुळे वजन काही प्रमाणात कमी होऊ शकते. असं तिने म्हटलं, हे खास ड्रिंक कोणतं पाहूया. 

तिने क्रॅश डाएट ऐवजी खाण्याच्या सवयी सुधारल्या. हलका व्यायाम सुरु केला, तिने तिचे फिटनेस रुटीन सेट केले. वजन कमी करण्यासाठी तिने रोज सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायली. हे पाणी शरीराच्या आतील स्वच्छतेसाठी आणि चयापचय गतिमान करण्यासाठी चांगले आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, जो आपली चरबी लवकर जाळण्यास मदत करतो. तसेच लिंबू डिटॉक्स म्हणून काम करते आणि काळी मिरी कर्क्यूमिनचा प्रभाव वाढवते. 

वजन कमी करण्यासाठी शहनाजने आहारात देखील बदल केला. तिने जंक फूड, तळलेले पदार्थ आणि साखरेचे पदार्थ खाणे टाळले. दिवसाची सुरुवात हळदीच्या पेयाने, नाश्त्यात ओट्स किंवा फळे खाणं सुरुवात केली. दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, स्प्राऊट्स या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न शहनाजने केला.  

टॅग्स :वेट लॉस टिप्स