Lokmat Sakhi >Fitness > परफेक्ट फिगरसाठी मलायका अरोरा रोज न चुकता करते एक गोष्ट, सोपा फिटनेस मंत्र- सर्वांना जमण्यासारखा..

परफेक्ट फिगरसाठी मलायका अरोरा रोज न चुकता करते एक गोष्ट, सोपा फिटनेस मंत्र- सर्वांना जमण्यासारखा..

malaika arora fitness secret: malaika arora perfect figure tips: मलायका अरोरा तिच्या फिटनेसची नेहमी योग्य पद्धतीने काळजी घेते. फिट राहण्यासाठी ती एक सोपा उपाय करते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 09:05 IST2025-06-10T09:00:00+5:302025-06-10T09:05:01+5:30

malaika arora fitness secret: malaika arora perfect figure tips: मलायका अरोरा तिच्या फिटनेसची नेहमी योग्य पद्धतीने काळजी घेते. फिट राहण्यासाठी ती एक सोपा उपाय करते.

bollywood actress malaika arora fitness secret for perfect figure drink daily ghee water know the healthy benefits | परफेक्ट फिगरसाठी मलायका अरोरा रोज न चुकता करते एक गोष्ट, सोपा फिटनेस मंत्र- सर्वांना जमण्यासारखा..

परफेक्ट फिगरसाठी मलायका अरोरा रोज न चुकता करते एक गोष्ट, सोपा फिटनेस मंत्र- सर्वांना जमण्यासारखा..

आपल्यापैकी अनेकांना फिट आणि तंदुरुस्त राहावे असे नेहमी वाटते. फिट राहण्यासाठी आपण अनेक नवनवीन गोष्टी ट्राय करत असतो.(malaika arora fitness secret) व्यायाम, जीम किंवा घरगुती उपाय करुन वजन नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न आपले सुरु असतात.(malaika arora health) पण अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या वाढत्या वयात देखील आजही सुंदर आणि फिट दिसतात, त्यातील एक मलायका अरोरा.(health tips for slim body) वयाच्या ५१ व्या वर्षी देखील ती अगदी फिट दिसते. (malaika arora diet and exercise plan)
मलायका अरोरा तिच्या फिटनेसची नेहमी योग्य पद्धतीने काळजी घेते. फिट राहण्यासाठी ती एक सोपा उपाय करते. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप घालून पिते.(Get a Perfect Figure Like Malaika Arora) मलायका अरोरा म्हणते की ती तिच्या दिवसाची सुरुवात चमचाभर तुपाने करते. अनेक सेलिब्रिटी आहेत जे कॉफी किंवा पाण्यात मिसळून तूप पितात. डॉक्टरही सकाळी पाण्यात चमचाभर तूप घालून पिण्याचा सल्ला देतात. याचा फायदा कसा होतो पाहूया. (At 40+, Malaika Arora Follows This Routine to Stay Fit & Youthful)

तमन्ना भाटियाचं ब्यूटी सिक्रेट! त्वचेसाठी करते आईने सांगितलेला घरगुती उपाय, तिच्या देखण्या तारुण्याचे रहस्य

दिवसाची सुरुवात चमचाभर तुपाने केल्याने पचनसंस्था निरोगी राहते. तसेच चयापचय देखील वाढतो. तुपामध्ये असणारे ब्युटीरिक ॲसिड आपल्याला बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यास मदत करते. तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतात. 

आहारतज्ज्ञ सुरभी पारीक म्हणतात तूप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ते आपल्या पोटातील आम्ल स्त्राव वाढवते, ज्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात तुपाने करावी. तूप आपल्या शरीरातील ऊर्जा वाढविण्याचे काम करते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी सेवन केल्याने आपली ऊर्जा पातळी वाढविण्यास मदत होते. जे आपल्या त्वचेसाठी चांगले आहे. तसेच त्वचेला हायड्रेट ठेवण्यास आणि तिची नैसर्गिकता टिकवून ठेवण्यासाठी तूप चांगले मानले जाते. 

तूप खाण्याचे फायदे 

तूप हा शुद्ध पदार्थ आहे. यातून पाणी आणि दुधाचे घन पदार्थ वेगळे करुन बनवले जाते. यामध्ये फॅटी ॲसिड, जीवनसत्त्वे अ, ड, ई, के आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. रिकाम्या पोटी तूप रोज खाल्ल्याने पोटाचे आरोग्य निरोगी राहते. भूक न लागणाऱ्या लोकांसाठी तूप फायदेशीर मानले जाते. तुपात असणारे फॅटी ॲसिड शरीरात लवकर शोषले जातात ज्यामुळे ऊर्जा वाढविण्यास मदत होते. तुपामध्ये असलेले फॅट आपल्या शरीरात ऊर्जेचा प्राथमिक स्त्रोत म्हणून काम करते, ज्याला केटोसिस म्हणतात. यामुळे शरीरात साठवलेली चरबी जाळल्याने वजन कमी करण्यास सोपे होते. 
 

Web Title: bollywood actress malaika arora fitness secret for perfect figure drink daily ghee water know the healthy benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.