Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > अनन्या पांडेसारखं चवळीची शेंग व्हायचं? ती करते तसं 'Gut Cleanse Diet' करा, बघा काय खायचं..

अनन्या पांडेसारखं चवळीची शेंग व्हायचं? ती करते तसं 'Gut Cleanse Diet' करा, बघा काय खायचं..

Secret Of Ananya Pandey's Perfect Slim Figure: अनन्या पांडे मागच्या दोन महिन्यांपासून 'Gut Cleanse Diet' करते आहे. ते नेमकं काय असतं आणि त्याचे काय फायदे होतात ते पाहूया..(what is gut cleanse diet?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 18:42 IST2025-05-13T18:41:03+5:302025-05-13T18:42:53+5:30

Secret Of Ananya Pandey's Perfect Slim Figure: अनन्या पांडे मागच्या दोन महिन्यांपासून 'Gut Cleanse Diet' करते आहे. ते नेमकं काय असतं आणि त्याचे काय फायदे होतात ते पाहूया..(what is gut cleanse diet?)

secret of ananya pandey's perfect slim figure, Ananya Pandey credits gut cleanse diet for her perfect figure, what is gut cleanse diet? | अनन्या पांडेसारखं चवळीची शेंग व्हायचं? ती करते तसं 'Gut Cleanse Diet' करा, बघा काय खायचं..

अनन्या पांडेसारखं चवळीची शेंग व्हायचं? ती करते तसं 'Gut Cleanse Diet' करा, बघा काय खायचं..

Highlightsअनन्याने सांगितले की जेव्हापासून तिचे हे डाएट सुरू झाले आहे तेव्हापासून ती रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ च्या आधी घेते.

अनन्या पांडे सध्या बॉलीवूडमधली एक अतिशय स्लीम ट्रिम अभिनेत्री आहे. तिने स्वत:ची फिगर आणि फिटनेस अशा पद्धतीने मेंटेन ठेवलेलं आहे की ती साडीपासून वेस्टर्नवेअरपर्यंत सगळ्याच कपड्यांमध्ये तसेच सगळ्याच भुमिकांमध्ये शोभून दिसते. तिची फिगर हा तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता याविषयी तिनेच मौन सोडलं असून ती फिगर आणि फिटनेस या दोन्ही गोष्टी सांभाळण्यासाठी नेमकं काय करते याविषयी तिने स्वत:च माहिती दिली आहे (Secret Of Ananya Pandey's Perfect Slim Figure). आता तुम्हालाही तिच्यासारखं अगदी स्लिम ट्रिम व्हायचं असेल तर ती त्यासाठी कोणते पदार्थ खाते आणि कोणते पदार्थ खाणं पुर्णपणे टाळते ते पाहा..(what is gut cleanse diet?) 

 

अनन्या पांडे कसं करतं Gut Cleanse Diet?

गट क्लिन्झ डाएट म्हणजे पोटातले, आतड्यातले विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकून शरीर आतून शुद्ध करणारे डाएट. अनन्या पांडे सध्या अशा पद्धतीचं डाएट करण्याला प्राधान्य देत आहे.

अस्सल मराठवाडी पद्धतीने करा झणझणीत खोबरं- लसूण चटणी, साध्याच जेवणालाही येईल खमंग चव.. 

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनन्याने सांगितले की जेव्हापासून तिचे हे डाएट सुरू झाले आहे तेव्हापासून ती रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ च्या आधी घेते. त्यानंतर ती काहीही खात नाही. या डाएटमुळे तिला खूप सकारात्मक बदल जाणवत आहेत. लवकर जेवण केल्यामुळे दुसऱ्यादिवशी सकाळी खूप हलके वाटते. शिवाय दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते. 


Gut Cleanse Diet म्हणजे काय?

डाएटचा हा कोणता प्रकार आहे, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी दिली आहे. यामध्ये त्या सांगतात की या प्रकारच्या डाएटमध्ये प्रीबायोटिक्स पदार्थ तुमच्या आहारात जास्तीतजास्त दिले जातात. यामध्ये फळ, सलाड, आंबवलेले पदार्थ खाण्यास प्राधान्य दिले जाते.

केसांच्या सगळ्या तक्रारी ८ दिवसांत कमी होतील! 'हा' उपाय करा- केस होतील जाड, लांब, हेल्दी...

या ३ प्रकारातले जेवढे जास्त रंगबेरंगी पदार्थ तुमच्या ताटात असतील तेवढे तुम्हाला जास्त फायबर आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतील. बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होईल. हे पदार्थ खाण्यासोबतच नियमितपणे व्यायाम करणे आणि भरपूर प्रमाणात पातळ पदार्थ घेऊन तसेच पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवले की आपोआपच शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते.  
 

Web Title: secret of ananya pandey's perfect slim figure, Ananya Pandey credits gut cleanse diet for her perfect figure, what is gut cleanse diet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.