Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही

शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही

Diet Tips By Sara Ali Khan: कामाच्या ठिकाणी असताना जेव्हा थोडीशी भूक लागते, तेव्हा ती भागविण्यासाठी काय खावं असा प्रश्न पडला असेल तर सारा अली खान सांगते तो उपाय तुम्ही करू शकता...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2026 17:41 IST2026-01-22T17:15:00+5:302026-01-22T17:41:33+5:30

Diet Tips By Sara Ali Khan: कामाच्या ठिकाणी असताना जेव्हा थोडीशी भूक लागते, तेव्हा ती भागविण्यासाठी काय खावं असा प्रश्न पडला असेल तर सारा अली खान सांगते तो उपाय तुम्ही करू शकता...

Sara Ali Khan eats 'this' food when she feels hungry while shooting -Diet Tips, weight loss tips By Sara Ali Khan | शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही

शुटींग करताना भूक लागल्यावर सारा अली खान खाते 'हा' पदार्थ- वजन वाढण्याचं टेन्शनच नाही

Highlightsकाहीतरी खाल्ल्याचे, पोटात गेल्याचे समाधान मिळते आणि शिवाय त्यातून काही कॅलरी मिळत नसल्याने वजनही  नियंत्रित राहाते.

बऱ्याचदा असं होतं की संध्याकाळच्या वेळी थोडीशी भूक लागते. जे लोक त्यावेळी घरी असतात ते काहीतरी स्नॅक्स चटकन करून खाऊ शकतात. घरात असे कित्येक पदार्थ असतात ज्याने संध्याकाळची भूक भागवता येते. पण जे लोक ऑफिसमध्ये असतात त्यांची मात्र पंचाईत होते. काय खावं ते कळत नाही. मग कसंबसं चहा- कॉफी घेत भूक मारावी लागते. त्यात जे लोक वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी डाएट करतात त्यांची तर मोठीच अडचण होते.  अशा लोकांना सारा अली खान एक मस्त उपाय सुचवते. साराला जेव्हा शुटींगमध्ये असताना थोडीशी भूक लागते, तेव्हा ती नेमकं काय करते पाहा..

 

साराच्या चाहत्यांना माहितीच आहे की बॉलीवूडमध्ये काम सुरू करण्याआधी सारा खूप हेल्दी होती. तिने खाण्यावर खूप नियंत्रण करून आणि व्यायाम करून वजन कमी केलं आहे. आजही तिचा फिटनेस आणि फिगर टिकवून ठेवण्यासाठी ती तेवढेच प्रयत्न करते.

सुपर कम्प्युटरच काय AI पेक्षाही सुपरफास्ट चालेल मुलांचं डोकं, रोज सकाळी खाऊ घाला ‘हे’ पदार्थ

म्हणूनच तर तिने दिलेली ही माहिती वेटलॉस करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. एका चॅनलने नुकतीच साराची मुलाखत घेतली. त्यावेळी सारा म्हणाली की कामाच्या ठिकाणी असताना तिला जेव्हा अवेळी थोडीशी भूक लागते, तेव्हा ती भूक भागविण्यासाठी ती चक्क च्युईंगम चघळत बसते.

 

त्यामुळे काहीतरी खाल्ल्याचे, पोटात गेल्याचे समाधान मिळते आणि शिवाय त्यातून काही कॅलरी मिळत नसल्याने वजनही  नियंत्रित राहाते.

लग्न ठरताच प्रत्येक नवरीने खायला हवे ‘हे’ पदार्थ, ८ दिवसांत येईल चेहऱ्यावर तेज, ब्रायडल फेशियलची गरज नाही

जर च्युईंगम खाऊनही तिची भूक कमी झाली नाही तर मग मात्र ती सुकामेवा खाते. यातही बदाम आणि अक्रोड खाण्यावर तिचा भर असतो. आता तुम्हीही कधी भूक भागविण्यासाठी सारा करते तसा च्युईंगमचा प्रयोग करून पाहा. बघा तुमची भूक कंट्रोलमध्ये राहतेय का
 

Web Title : सारा अली खान का वजन नियंत्रण का राज: शूटिंग के दौरान क्या खाती हैं!

Web Summary : अभिनेत्री सारा अली खान शूटिंग के दौरान च्युइंग गम चबाकर भूख मिटाती हैं। अगर इससे काम नहीं चलता, तो वह बादाम और अखरोट खाती हैं, जिससे वजन नियंत्रित रहता है। क्रेविंग को कंट्रोल करने का आसान तरीका!

Web Title : Sara Ali Khan's surprising snack secret for weight management revealed!

Web Summary : Actress Sara Ali Khan manages hunger during shoots by chewing gum. If that doesn't work, she opts for almonds and walnuts, helping her maintain weight. A simple trick for controlling cravings!