Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > लग्नानंतर वर्षभरात नवराबायको जाडजूड का होतात? सुखी संसाराचे 'साईड इफेक्ट',‘या’ कारणांमुळे बदलतो शरीराचा घेर...

लग्नानंतर वर्षभरात नवराबायको जाडजूड का होतात? सुखी संसाराचे 'साईड इफेक्ट',‘या’ कारणांमुळे बदलतो शरीराचा घेर...

reasons for weight gain after marriage : newly married couple weight gain : weight gain after wedding : why weight increases after marriage : लग्नानंतर नेमकं पहिल्याच वर्षात नवरा - बायकोचं वजन वेगाने वाढतं कारणं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 17:10 IST2026-01-20T16:50:06+5:302026-01-20T17:10:07+5:30

reasons for weight gain after marriage : newly married couple weight gain : weight gain after wedding : why weight increases after marriage : लग्नानंतर नेमकं पहिल्याच वर्षात नवरा - बायकोचं वजन वेगाने वाढतं कारणं...

reasons for weight gain after marriage newly married couple weight gain weight gain after wedding why weight increases after marriage | लग्नानंतर वर्षभरात नवराबायको जाडजूड का होतात? सुखी संसाराचे 'साईड इफेक्ट',‘या’ कारणांमुळे बदलतो शरीराचा घेर...

लग्नानंतर वर्षभरात नवराबायको जाडजूड का होतात? सुखी संसाराचे 'साईड इफेक्ट',‘या’ कारणांमुळे बदलतो शरीराचा घेर...

'लग्न' हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतरचं पहिलं वर्ष म्हणजे नवरा-बायको दोघांसाठी अगदी सुखद काळ असतो. प्रेम, आनंद, एकमेकांसोबत घालवलेला जास्तीत जास्त वेळ आणि नव्या जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे अनेक जोडप्यांच्या बाबतीत लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच दोघांचं वजन वाढलेलं दिसून येतं. पण लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत अनेकांच्या लक्षात येते की, त्यांचे कपडे घट्ट होऊ लागले आहेत आणि वजन काटा पुढे सरकला आहे. मग तो नवरा असो किंवा बायको, दोघांचेही वजन एका वर्षात अचानक वाढल्याचे दिसते. याला केवळ 'सुखी संसाराचे लक्षण' म्हणून सोडून चालणार नाही(why weight increases after marriage).

बदललेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि शरीरातील हार्मोन्समध्ये होणारे बदल यामागे मोठी भूमिका बजावत असतात. तरी यामागे काही ठराविक सवयी आणि लाईफस्टाईलमधील बदल कारणीभूत असतात. नेमकं पहिल्याच वर्षात नवरा - बायकोचं वजन इतकं वेगाने का वाढतं, याची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही लग्नानंतरच्या (newly married couple weight gain) या वाढत्या वजनाची काळजी वाटत असेल, तर त्यामागची ५ प्रमुख कारणे आणि त्यावरचे उपाय नेमके काय आहेत ते पाहूयात... 

लग्नानंतर पहिल्याच वर्षात नवरा - बायको दोघांचं वजन का वाढतं ? 

 लग्न झाल्यानंतर वाढणाऱ्या वजनाला जगभरात 'Happy Weight' किंवा 'Love Fat' असे म्हटले जाते. हे वजन केवळ खाण्यापिण्यामुळे नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बदलांमुळे वाढते.

१. खाण्यापिण्याच्या सवयींमधील बदल :- लग्नानंतर सुरुवातीच्या काळात अनेकदा बाहेर जेवायला जाणे, नातेवाईकांकडील पार्ट्या आणि लग्नातील हेव्ही जेवण यामुळे कॅलरीचे प्रमाण वाढते. तसेच, एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवण्याच्या नादात तेलकट आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणांत खाल्ले जातात. 

२. कम्फर्ट झोन आणि 'हॅपी हार्मोन्स' :- जेव्हा व्यक्ती एका सुरक्षित आणि आनंदी नात्यात असते, तेव्हा शरीरात 'ऑक्सिटोसिन' आणि 'डोपामाइन' सारखी हार्मोन्स वाढतात. यामुळे अनेकदा आपण आरोग्यापेक्षा आनंदाला प्राधान्य देतो आणि व्यायामाकडे दुर्लक्ष होते. यालाच वैज्ञानिक भाषेत 'रिलेशनशिप वेट गेन' म्हणतात.

महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पगार देणारा जगातील एकमेव देश, कामाच्या वेळाही फ्लेक्झिबकल आणि सुविधा भरपूर...

३. झोपेच्या वेळेत बदल :- लग्नानंतर नवरा - बायको दोघांच्याही डेली रुटीनमध्ये मोठा बदल होतो. रात्री उशिरापर्यंत गप्पा मारणे किंवा चित्रपट पाहणे यामुळे झोपेचे चक्र बिघडते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील 'कोर्टिसोल' (स्ट्रेस हार्मोन) वाढते, ज्यामुळे भूक जास्त लागते आणि वजन वाढते.

४. व्यायामाचा अभाव :- लग्नापूर्वी स्वतःला फिट ठेवण्यासाठी जो वेळ दिला जातो, तो लग्नानंतर कुटुंबाला आणि जोडीदाराला दिला जातो. 'वर्कआउट' पेक्षा जोडीदारासोबत 'क्वालिटी टाइम' घालवण्याला प्राधान्य दिले जाते, ज्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते.

५. सोशल इटिंग :- नवीन लग्न झाल्यावर प्रत्येक नातेवाईक प्रेमाने आग्रह करून खाऊ घालतो. 'नाही' म्हणणे कठीण जाते आणि अशा 'सोशल इटिंग'मुळे नकळत शरीरात अतिरिक्त फॅट्स जमा होतात.

६. 'इटिंग टुगेदर' आणि पोर्शन साईज :- जेव्हा दोन व्यक्ती एकत्र जेवतात, तेव्हा ते एकट्याने जेवण्यापेक्षा जास्त जेवतात. नवरा-बायको अनेकदा एकमेकांच्या आवडीचे पदार्थ ट्राय करतात. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत असे घडते की, नवऱ्याच्या जेवणाच्या प्रमाणाशी जुळवून घेताना त्या नकळत जास्त कॅलरीज घेतात.

१ रुपयाही खर्च न करता त्वचा दिसेल क्लिअर-स्पॉटलेस! चेहऱ्यावरचे पिंपल्स-डाग घालवणारा कडूनिंबाचा उपाय...

स्पेशल मॅजिक ट्रिक! केसांच्या समस्यांनुसार आवळ्याच्या रसात मिसळून ७ पदार्थ लावा, रुक्ष निस्तेज केस चमकू लागतील...

७. रात्रीच्या जेवणाचे स्वरूप :- लग्न झाल्यावर सुरुवातीच्या काळात अनेकदा 'कॅन्डल लाइट डिनर' किंवा रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरणे होते. यामुळे झोपण्यापूर्वी हेव्ही जेवण केले जाते. रात्री उशिरा जेवल्यामुळे शरीराला ते पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि अन्नाचे रूपांतर फॅट्समध्ये होते.

८. चयापचय क्रिया आणि वय :- बहुतेक लग्ने हे वयाच्या अशा टप्प्यावर होत (२५ ते ३० वर्षे), जिथे मानवी शरीराची चयापचय क्रिया नैसर्गिकरित्या मंदावू लागते. अशावेळी लग्नातील मेजवानी आणि व्यायामाचा अभाव यामुळे वजन वेगाने वाढते.

वाढलेलं वजन नेमकं कसं कमी करावं ? 

१. जोडीदारासोबत मॉर्निंग वॉक किंवा जिममध्ये जाणे सुरू करा. यामुळे नातंही घट्ट होईल आणि फिटनेसही टिकेल.
२. घरी स्वयंपाक करताना तेल आणि साखरेचा वापर कमी करा. एकमेकांना हेल्दी खाण्याच्या सवयी लावा. 
३. जेवणापूर्वी अर्धा तास पाणी प्यायल्याने भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते.
४. रोज बाहेरचं किंवा ऑर्डर करुन खाणं टाळा. घरचा, हलका आणि संतुलित आहार योग्य वेळी खा.
५. रोज ७ ते ८ तास झोप झाली नाही तर मेटाबॉलिझम मंदावतो आणि वजन वाढतं, टीव्ही, मोबाईल पाहत खाणं टाळा. नकळत जास्त खाल्लं जातं.

Web Title : शादी के बाद क्यों बढ़ जाता है वजन? कारण और समाधान।

Web Summary : शादी के बाद जीवनशैली, खानपान और हार्मोन में बदलाव से वजन बढ़ता है। बाहर खाना, आरामदायक भोजन, व्यायाम की कमी, देर रात का भोजन और सामाजिक खानपान कैलोरी बढ़ाते हैं। नींद, स्वस्थ भोजन और व्यायाम से वजन नियंत्रित किया जा सकता है।

Web Title : Why do couples gain weight after marriage? Causes and solutions.

Web Summary : Newlyweds often gain weight due to lifestyle changes, eating habits, and hormones. Increased calories from eating out, comfort food, lack of exercise, late-night meals, and social eating contribute. Prioritizing sleep, healthy eating, and exercise can help manage weight.