Join us  

विकत आणले की खा बकाबका ड्रायफ्रुट्स, हे शरीराला अपायकारक; ही घ्या 'योग्य' रीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 2:41 PM

Winter food: सुकामेवा (dry fruits) नेहमीच आणि खूप खातो, पण अंगीच लागत नाही, असं तुमचंही होतं का? मग बहुतेक खाण्याच्या पद्धतीत (How to eat dry fruits) काहीतरी चुकतं आहे...

ठळक मुद्देसुकामेवा खाण्याचीही एक पद्धत आहे आणि ती जर आपण पाळली तर सुकामेवा आपल्यासाठी अधिक पोषक ठरू शकतो. 

हिवाळा (winter) म्हणजे तब्येत सुधारण्यासाठी अतिशय चांगला ऋतू. कारण या काळात आपली पचनशक्ती (digestion) खूप चांगली झालेली असते. त्यामुळे या दिवसांत एरवी जड वाटणारे पदार्थही आपण चांगल्या पद्धतीने पचवू शकतो. म्हणूनच तर हिवाळ्यात सुकामेवा, मेथ्या, उडीद असं काही काही घालून खास हिवाळी लाडू तयार करण्यात येतात. वेळेअभावी अनेक घरांमध्ये लाडू (winter special laddu) केले जात नाहीत. त्यामुळे मग सुकामेवा तसाच खाल्ला जातो. पण तसाच जरी सुकामेवा खाणार असाल, तरी थोडी पथ्ये पाळलीच पाहिजे. कारण सुकामेवा खाण्याचीही एक पद्धत आहे आणि ती जर आपण पाळली तर सुकामेवा आपल्यासाठी अधिक पोषक ठरू शकतो. 

 

थंडीत सुकामेवा का खावा?Benefits of eating dry fruits in winter- शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी आणि थंडीमध्ये शरीर उबदार ठेवण्यासाठी हिवाळ्यात सुकामेवा आवर्जून खाण्याचा सल्ला दिला जातो.- शरीरातील उर्जा टिकून राहण्यासाठी सुकामेवा उपयुक्त ठरतो.

हा सुकामेवा नेहमी भिजवूनच खाWhy to eat soakes dry fruits?अनेक घरांमध्ये बदाम आणि काळ्या मनुका रात्री पाण्यात भिजत टाकल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्या जातात. असं खाण्याची पद्धत खरोखरंच योग्य आहे. पण बदाम आणि मनुका हे दोनच पदार्थ केवळ भिजवून खावेत असे नाही. या जोडीनेच तुम्ही खाली दिलेले काही पदार्थही भिजवून खाल्ले पाहिजेत. 

 

१. बदाम almondबदाम तुम्ही कच्चेही खाऊ शकता. पण ते जर भिजवून खाल्ले तर त्यामुळे आरोग्याला अधिक चांगला लाभ होतो, शिवाय ते पचायलाही सोपे जातात. सुके बदाम खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता वाढणे, बद्धकोष्ठता असा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे बदाम भिजवून खाणे कधीही चांगले. त्यातही बदाम अधिक पाचक व्हावेत, यासाठी त्याची साले काढा आणि त्यानंतर ते खा. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी, त्वचा तजेलदार ठेवण्यासाठी भिजवलेले बदाम खाणे अधिक चांगले. 

 

२. अक्रोडwallnutअक्रोड भिजवून खाणारे खूप कमी लोक आहेत. बदामाप्रमाणेच अक्रोडही भिजवून खावेत, हे अनेक जणांना माहितीही नसते. पण सुके अक्रोड खाण्यापेक्षा रात्रभर पाण्यात भिजवलेले अक्रोड खाल्ले तर ते शरीरासाठी अधिक चांगले ठरते. सुके अक्रोड खाल्यामुळे शरीरातील चरबी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे अक्रोड नेहमी भिजवूनच खा. भिजवलेले अक्रोड खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

 

३. मनुकाraisinsकाळ्या मनुका भिजत घालूनच खाल्ल्या जातात. पण पिवळसर रंगाच्या मनुका मात्र तशाच सुक्या खाल्ल्या जातात. पण असं खाण्यापेक्षा पिवळ्य मनुकाही काळ्या मनुकांप्रमाणेच भिजत घाला आणि त्यानंतरच खा. कारण भिजवलेल्या मनुका खाल्ल्या तर रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्या खूप जास्त उपयुक्त ठरतात. ज्यांचे हिमोग्लोबीन कमी असते, त्यांनी दररोज ५ ते ८ भिजवलेल्या मनुका खाव्या. 

 

४. अंजीरFig/ Anjeerअंजीर दुधात किंवा पाण्यात भिजत घालावेत. रात्री अंजीर जर दुधात भिजत घालणार असाल, तर अंजीर भिजवलेली वाटी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवा. सकाळी ती फ्रिजमधून बाहेर काढा. टेम्परेचर थोडे नॉर्मलला येऊ द्या आणि त्यानंतर अंजीर खा. कारण अंजीर भिजवलेले दूध रात्रभर फ्रिजच्या बाहेर ठेवले तर ते नासू शकते. त्यामुळे ते फ्रिजमध्ये ठेवा. ज्या पाण्यात किंवा दुधात अंजीर भिजत घातले आहेत, ते पाणी आणि दूध देखील पिऊन् टाका. कारण अंजीराचा अर्क भिजत घातलेल्या पाण्यात, दुधात उतरलेला असतो.   

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नथंडीत त्वचेची काळजीआरोग्यआहार योजना