Join us

दलिया म्हणजे सुपरफूड, वजन कमी करतो भरभर! ६ प्रकारे करा दलिया- चविष्ट पदार्थ खा रोज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:35 IST

Weight Loss Breakfast : दलियामध्ये प्रोटीन आणि हेल्दी कार्ब्सही असतात. ज्यानं शरीराची एनर्जी लेव्हलही वाढते. पण तुम्ही म्हणाल की, रोज एकप्रकारचा दलिया खाणंही कंटाळवाणं ठरेल. त्यामुळे इथे आम्ही काही दलिया बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत.

Weight Loss Breakfast : वजन कमी करण्यासाठी तुम्ही केवळ दुपारच्या आणि रात्रीच्या मुख्य जेवणात बदल करून चालत नाही. वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता देखील तेवढाच महत्वाचा ठरतो. वजन कमी करण्यासाठी दलिया एक बेस्ट आणि टेस्ट नाश्ता मानला जातो. दलियामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. अशात तुमचं ओव्हरईटिंग टाळता येतं. सोबतच दलियामध्ये प्रोटीन आणि हेल्दी कार्ब्सही असतात. ज्यानं शरीराची एनर्जी लेव्हलही वाढते. पण तुम्ही म्हणाल की, रोज एकप्रकारचा दलिया खाणंही कंटाळवाणं ठरेल. त्यामुळे इथे आम्ही काही दलिया बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत.

नट्स आणि सीड्ससोबत दलिया

दलिया दूध किंवा पाण्यात शिजवून त्यात बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि फ्लेक्स सीड्स मिक्स करा. यांमध्ये हेल्दी फॅट्स, फायबर आणि ओमेगा-३ भरपूर असतं. ज्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्याची प्रोसेस वेगानं होते.

व्हेजिटेबल मसाला दलिया

दलिया तूपाचं हलका भाजा आणि नंतर कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, गाजर, मटारसारख्या गोष्टीसोबत शिजवा. यातून तुम्हाला भरपूर फायबर आणि पोषक तत्व भरपूर मिळतील. ज्यामुळे जास्त वेळ पोट भरलेलं राहील.

ग्रीन टी दलिया

दलिया शिजवण्यासाठी पाण्याऐवजी ग्रीन टी वापरा. ग्रीन टी मध्ये दलिया शिजवा आणि त्यात मध व दालचीनी टाका. ग्रीन टी मध्ये अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट भरपूर असतात. जे मेटाबॉलिज्म बूस्ट करून फॅट बर्नची प्रोसेस वेगानं करतात.

मूग डाळ दलिया खिचडी

दलिया आणि मूग डाळ मिक्स करून भाज्यांसोबत शिजवा. यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळेल आणि पोटही हलकं राहतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

कोकोनट आणि ड्राय फ्रूट्स दलिया

दलिया नारळाच्या दुधात शिजवा आणि त्यात बारीक केलेल काही ड्राय फ्रूट्स टाका. नारळात माडियम-चेन फॅटी अ‍ॅसिड भरपूर असतं, जे फॅट बर्निंगसाठी मदत करतं.

स्प्राउट्स आणि दलिया उपमा

दलिया हलके मसाले आणि मोड आलेले मूग, चणे किंवा सोयाबीन टाकून शिजवा. यातून तुम्हाला प्रोटीन, फायबर आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट हे तिन्ही तत्व मिळतील. जे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

वरील वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही दलिया बनवू शकता. यानं टेस्ट तर बदलेलंच सोबतच तुम्हाला वजन कमी करण्यासाठी आवश्यक ते सगळे तत्व मिळतील.

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्न