Join us

वजन कमी करायचं? ५ सोप्या सवयी स्वत:ला लावून घ्या, डाएट न करताही वजन राहील कंट्रोलमध्ये.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2025 16:58 IST

Weight Loss Tips: वजन कमी करायचं आहे, पण डाएट करणं जमत नाही अशी अनेकांची अडचण असते. त्यासाठीच बघा हा खास उपाय (5 tips to loose weight without dieting and doing exercise)

ठळक मुद्देवजन वाढू नये यासाठी नेमके काय उपाय करावे?

वाढतं वजन कमी कसं करायचं हा प्रश्न अनेकांना छळतो. काही जण वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करतात. तर काही जणांचा भर डाएट करण्यावर असतो. पण असेही अनेक जण आहेत ज्यांच्याकडून व्यायाम अजिबातच होत नाही. कारण एकतर व्यायाम करण्यासाठी वेळ नसतो किंवा मग आळस येतो. शिवाय खाण्यापिण्याचीही प्रचंड आवड असते. त्यामुळे तोंडावर ताबा ठेवणंही शक्य होत नाही. अशावेळी मग वाढतं वजन कमी करण्यासाठी काय करावं, असा प्रश्न पडतो (Weight Loss Tips). त्यासाठीच हा एक उपाय आहारतज्ज्ञांनी सुचवला आहे. यामध्ये ते सांगतात की स्वत:ला अशा काही सवयी लावून घ्या ज्यामुळे वजन वाढणारच नाही. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहूया..(5 tips to loose weight without dieting and doing exercise)

 

वजन वाढू नये म्हणून ५ साध्या सोप्या टिप्स.. 

वजन वाढू नये यासाठी नेमके काय उपाय करावे, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी collegenutritionist या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

वय वर्षे ८२- तरीही उत्साह मात्र तरुणांना लाजवणारा!! बघा अमिताभ बच्चन यांचे डाएट, फिटनेस रुटीन 

१. पहिला उपाय म्हणजे नाश्त्याला नेहमीच भरपूर प्रोटीन्स देणारे पदार्थ घ्यावेत. भरपूर प्रोटीन्स शरीरात गेले की आपोआपच गोड खाण्याची तसेच वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होऊन जाते. 

२. गाजर, काकडी, ब्रोकोली, बेबी कॉर्न असे शिजण्यासाठी खूपच कमी वेळ लागणारे किंवा कच्चे खाता येतील असे पदार्थ तुमच्या आहारात असू द्या. या पदार्थांमधून चांगल्या प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. याशिवाय स्टार्च जास्त असणाऱ्या भाज्या खाणं टाळा.

 

३. विकतचे कोणतेही सरबत किंवा पॅक ड्रिंक पिण्याची इच्छा होईल तेव्हा घरी तयार केलेले कमी साखरेचे लिंबूपाणी, ताक, आवळ्याचे सरबत, कोकम सरबत असे काही घेण्यावर भर द्या. कारण विकतच्या पेयातून खूप जास्त प्रमाणात साखर आणि प्रिझर्व्हेटीव्ह पोटात जातात. त्यापेक्षा घरी तयार केलेले सरबत घेणे कधीही चांगले.

मुलांकडून ५ गोष्टी नेमाने करून घ्या; मेंदू होईल तल्लख, एकाग्रता वाढून अभ्यासात होतील हुशार

४. जेव्हा तुमच्या आवडीचे चिप्स, चॉकलेट, मिठाई असे पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होईल तेव्हा ते जरूर खा. पण प्रमाण मात्र कमी असू द्या. तो पदार्थ एकदाच खाऊन संपविण्यापेक्षा थोडा थोडा करून खा.

५. रात्रीच्यावेळी भूक लागलीच तर चिप्स, चॉकलेट किंवा इतर काही जंकफूड खाण्यापेक्षा मखाना, मुरमुरे, फुटाणे, सुकामेवा असं काही खा.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाव्यायाम