Join us

डाएट करूनही वजन थोडंसुद्धा कमी होत नाही? बघा काय चुकतं- डाएटिंगचा उपयोग होण्यासाठी.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2024 09:20 IST

Weight Loss Tips: काही लोक नेहमीच डाएटिंगवर असतात. पण त्याचं वजन मात्र अजिबातच कमी झालेलं जाणवत नाही. असं का होतं? (why diet plan does not work?)

ठळक मुद्देडाएटिंग करताना नेमकं असं काय चुकतं की ज्यामुळे वजनाचा काटा अजिबातच खाली येत नाही?

वाढत्या वजनामुळे सध्या अनेक लोक हैराण आहेत. आपली बदललेली जीवनशैली हेच त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. काही मोजके अपवाद सोडले तर हल्ली जवळपास प्रत्येक घरातच डाएट करणारी, वजन कमी होण्यासाठी काही प्रयत्न करणारी एक तरी व्यक्ती असतेच. आपल्या पाहण्यात तर असे कित्येक लोक असतात जे मागच्या कित्येक महिन्यांपासून डाएट करत असतात. मोजकंच अन्न खातात. पण तरीही त्यांचं वजन मात्र कणभरही कमी झालेलं नसतं (Not losing even a little weight after strict dieting?). असं का हाेतं बरं? डाएटिंग करताना नेमकं असं काय चुकतं की ज्यामुळे वजनाचा काटा अजिबातच खाली येत नाही? बघा याविषयी आहारतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(why diet plan does not work?)

 

डाएट करूनही वजन कमी का होत नाही?

आहारतज्ज्ञ रुपाली दत्ता यांनी याविषयी जी काही कारणं सांगितली आहेत ती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहेत. बघा तुमच्या बाबतीत वजन कमी न होण्यासाठी नेमकं कोणतं कारण आहे...

डासांनी कडाकड चावून हैराण केलं? २ सोपे उपाय- डास तुमच्या घराच्या आसपासही फिरकणार नाहीत 

१. खूप घाई करणे

काही लोकांना वजन कमी होण्याची खूपच घाई असते. ते लोक असा एखादा डाएट प्लॅन घेऊन येतात जो अजिबातच त्यांच्या तब्येतीला सहन होणारा नसतो. किंवा तो प्लॅन ते जास्त दिवस फॉलो करू शकत नाहीत. त्यामुळे मग काही दिवसांनी ते तो डाएट प्लॅन जशासतसा फॉलो न करता त्यांच्या सोयीनुसार वापरू लागतात. यामुळेही अपेक्षेनुसार वजन कमी होत नाही.

 

२. ठराविक उद्दिष्ट नसणे

काही लोकांचा फोकस हा केवळ वजन कमी करण्याकडे असतो. पण त्यावेळी ते हे बघत नाहीत की त्यांना तब्येतीची इतर कोणती समस्या आहे ज्यावर त्यांनी सगळ्यात आधी काम करायला हवं,

AI-Mom देणार पालकत्वाचेही सल्ले, सोशल मीडियातली व्हायरल चर्चा-आईच्या मायेनं मशिन काम करेल?

किंवा त्यांना महिनाभरात नेमकं किती वजन कमी होणं अपेक्षित आहे. असं कोणतंही एक टार्गेट त्यांच्यापुढे नसतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर स्वत:च्या समोर नेहमी जे शक्य होईल असं टार्गेट ठेवावं आणि त्यानुसारच प्रयत्न करावा, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजना