Join us

पदार्थांचा मनसोक्त सुगंध घ्या आणि वजन कमी करा भरभर! शास्त्रज्ञांनी शोधली वेटलॉसची आगळीच पद्धत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2025 18:40 IST

New Viral Trick For Fast Weight Loss: वजन कमी करण्याची ही एक मस्त आयडिया पाहा.. हा उपाय नुकताच काही शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे..(smelling your food it can trigger a feeling of fullness that may help prevent you from overeating)

ठळक मुद्देएकदा कधी तरी आपलं आपणच घरात हा प्रयोग करून पाहायला हवा.. 

वाढलेलं वजन कमी कसं करावं हा प्रश्न पडून तुम्हीही वैतागला असाल तर आता वजन भराभर कमी करण्याचा हा एक अगदी सोपा उपाय पाहा. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आजवर व्यायाम करणे, डाएटिंग करणे, उपाशी राहाणे असे अनेक उपाय पाहिले असतील. पण सध्या ज्याची सगळीकडे चर्चा आहे तो सुगंध घेऊन वजन कमी करण्याचा उपाय मात्र अनेकांनी पहिल्यांदाच ऐकला आहे. जर्मनीमधल्या काही शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन केलं असून त्यांनी वेटलॉसचा एक वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. बघा हा उपाय कोणासाठी जास्त फायदेशीर ठरणारा आहे..(New Viral Trick For Fast Weight Loss)

 

पदार्थांचा सुगंध घेऊन वेटलॉस करणे शक्य आहे?

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार जर्मनच्या अभ्यासकांनी याविषयी संशोधन केले आहे. यासाठी त्यांनी काही उंदरांचा सलग काही दिवस अभ्यास केला. यामध्ये शास्त्रज्ञ असं सांगतात की उंदरांच्या आणि आपल्याही मेंदूंच्या भागात आपल्या भुकेसंबंधित काही पेशी असतात.

बिनसाखरेच्या चहा, कॉफीमुळे वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात साखरेमुळे नाही 'या' पदार्थामुळे वाढतं वजन 

या पेशींचा संबंध थेट नाकाशी असतो. अभ्यासकांनी काही दिवस एक प्रयोग केला. उंदरांना खाऊ घालण्याआधी त्यांना त्या पदार्थांचा भरपूर सुगंध दिला. यानंतर जेव्हा त्यांना तो पदार्थ प्रत्यक्ष खायला दिला तेव्हा त्या उंदरांनी तो पदार्थ अगदीच कमी खाल्ला. असा प्रयोग मनुष्याच्या बाबतीत अजून त्यांनी केलेला नाही. पण उंदरांच्या बाबतीत जो अनुभव आला तोच अनुभव मनुष्याच्या बाबतीत येईल असा त्यांना विश्वास आहे. 

 

अमेरिकेतही एक संशोधन करण्यात आले. त्यानुसार जर आपण सफरचंद, पुदिना, नाशपती यांचा सुगंध घेत राहिलो तर भूक लागण्याचे प्रमाण कमी होत जाते.

ओपन पोअर्स, पिंपल्स वाढल्याने चेहरा थोराड वाटतो? १ सोपी ट्रिक- त्वचा होईल मऊ, तरुण, सुंदर

आपल्याला मात्र असा अनुभव असतो की एखाद्या पदार्थाचा सुगंध येत असेल तर आपली भूक जास्तच खवळली जाते. कधी एकदा तो पदार्थ समोर येतो आणि आपण त्याच्यावर ताव मारतो, असं होऊन जातं. पण इथे मात्र अभ्यासातून वेगळंच समोर आलं आहे. एकदा कधी तरी आपलं आपणच घरात हा प्रयोग करून पाहायला हवा.. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.