सध्याच्या धावपळीच्या जगात आणि वाढत्या जीवनशैलीत फिट राहणं ही केवळ फॅशन नसून काळाची गरज बनली आहे. वजन कमी करण्यासाठी आपण तासनतास जिममध्ये घाम गाळतो, चालतो किंवा व्यायाम करतो. पण फिटनेसच्या या प्रवासात आपण नेमकं काय खातो हे देखील महत्त्वाचा आहे. (Makhana ki shengdane weight loss) संध्याकाळी भूक लागते किंवा ऑफिसमध्ये कामाच्या व्यापात असतो, तेव्हा स्नॅकिंग हा आपला सगळ्यात मोठा शत्रू ठरतो. यावेळी आपण वडापाव, समोसा किंवा इतर तेलकट आणि मैद्याचे पदार्थ खातो. त्यामुळे आपलं वजन वाढते. (Low calorie snacks for weight loss)
पण वजन कमी करण्याच्या प्रवासात आपल्यासमोर हेल्दी पर्याय म्हणून कुरकुरीत, हलके-फुलके मखाने आणि दुसरं म्हणजे शेंगदाणे हा पर्याय आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, जर वजन कमी करायचं असेल तर नेमकं काय खावं. शेंगदाणे की मखाने.(Healthy Indian snacks) शेंगदाणे खाल्ल्याने ताकद मिळते पण त्यातील कॅलरीजचे काय? मखाने पचायला हलके असतात, पण त्यातून पुरेसे प्रोटीन मिळते का? वजन कमी करण्याच्या नादात आपण अनेकदा केवळ 'प्रोटीन' पाहतो आणि त्यातील 'कॅलरीज'कडे दुर्लक्ष करतो, किंवा कॅलरीजच्या नादात शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्वे विसरतो. वेट लॉस करताना नेमकं काय खायला हवं पाहूया. (Healthy evening snacks for weight loss journey)
शांत स्वभाव कमजोरी नाही ताकद, ‘या’ ४ गुणांमुळे इंट्रोवर्ट माणसं होतात यशस्वी-जगतात आनंदात
आपल्याला फक्त वजन कमी करायचं असेल तर मखाना आपल्यासाठी चांगला पर्याय आहे. याचे सगळ्यात मोठं कारण त्यात कमी कॅलरीज असतात. एक वाटी मखाण्यामध्ये १०० ते ११० कॅलरीज असतात. यात भरपूर फायबर असल्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. यामुळे आपल्याला अवेळी भूक लागत नाही. मखाण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जे आपलं वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
तर शेंगदाणे हा प्रोटीनचा खजिना मानला जातो. आपल्या फक्त प्रोटीन हवं असेल तर शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरेल. १०० ग्रॅम शेंगदाण्यात साधारण २५ ते २६ ग्रॅम प्रोटीन असतं. तेवढ्याच मखाण्यात फक्त ९-१० ग्रॅम प्रोटीन असते. शेंगदाण्यात कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाणही जास्त असतं. यामुळे जर आपण जिम किंवा हेवी वर्कआउट करत असू तर स्नायूंच्या मजबुतीसाठी शेंगदाणे खाणं फायदेशीर ठरतं. दिवसाला मुठभर खाणं चांगले आहे. अतिप्रमाणात खाल्ले तर पित्ताचा त्रास होऊ शकतो.
