सतत वाढत जाणारे वजन कमी करणे अनेकदा आपल्याला अवघडच वाटते. सध्याच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळच मिळत नाही, परिणामी वजन वाढत जाते. आजकाल वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण डाएट करतात, पण उपासमार किंवा डाएटसाठी अवघड नियम पाळणं सगळ्यांनाच जमतच असं नाही. अशावेळी मखाणा हा एक असा हलका, पौष्टिक आणि पचायला सोपा पदार्थ आहे, जो वजन कमी करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो(how to eat makhana for weight loss).
वेटलॉस करण्यासाठी आपण अनेकदा मखाणे खातो, पण त्यांमुळे आपल्यला अपेक्षित परिणाम मिळत नाही. याचे कारण काय? कारण, मखाणा खाणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य पद्धतीने खाणे देखील तितकेच आवश्यक असते. मखाण्यामध्ये असलेले पौष्टिक घटक तेव्हाच पूर्णपणे शरीराला मिळतात आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होते, जेव्हा मखाणा योग्यवेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ला जातो. फक्त मखाणा खाल्ला म्हणजे वजन आपोआप कमी होईल असं नाही; तो कसा, किती आणि केव्हा खाल्ला जातो यावरच त्याचा परिणाम ठरतो. चुकीच्या पद्धतीने जसे की जास्त तुपात तळलेले किंवा मीठ - मसाले जास्त घातलेले मखाणे (makhana fat burning benefits) वजन वाढवूही शकतात. त्यामुळे वजन घटवायचं असेल तर मखाणा खाण्याची योग्य पद्धत माहिती असणं खूप गरजेचं आहे.
वेटलॉस करण्यासाठी मखाणा कसा आहे फायदेशीर...
आयुर्वेदातही मखाण्याला 'त्रिदोष नाशक' असे सांगितले आहे, म्हणजेच हे वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार, मखाणा पौष्टिक असतो. मखाणा शरीराला इन्स्टंट एनर्जी देतो. यासोबतच, यामध्ये असलेले गुणधर्म पचन संतुलित ठेवतात, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होण्याची शक्यता कमी होते. मखाणा शरीराला पोषण देतो, पोट हलके ठेवतो आणि फायबर असल्यामुळे भूकेवरही नियंत्रण ठेवतो.
मखाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. मखाण्यातील या पोषक घटकांमुळे ते फक्त हलके आणि पचायला फायदेशीर असण्यासोबतच, चयापचय प्रक्रिया देखील सुरळीत करतात. मखाणा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रकारे मदत करतो. यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरल्यासारखे ठेवते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि कॅलरी इनटेक आपोआप कमी होतो.
वेटलॉससाठी मखाणे खाण्याची योग्य पद्धत...
१. भाजून आणि मसाले लावून :- मखाण्याला भाजून त्यात मीठ आणि मसाले (उदा. काळी मिरी, चाट मसाला) मिसळून खाऊ शकता.
२. दुधासोबत :- तुम्ही मखाण्याला दुधासोबत उकळवून देखील खाऊ शकता.
३. सॅलॅडमध्ये: सॅलॅडमध्ये (Salad) मिसळून कुरकुरीत स्नॅक म्हणून देखील खाऊ शकता.
मखाण्याला स्नॅक्सच्या (Snacks) रूपात खाल्ल्यास, तुम्हाला अनहेल्दी गोष्टी खाण्याची इच्छा (Craving) होणार नाही. मखाणे करताना कमीत कमी तेल किंवा तूप वापरावे आणि पॅकेज्ड, जास्त साखर/मीठ असलेले मखाणे खाणे टाळावेत.
Web Summary : Makhana, a nutritious snack, aids weight loss by providing sustained energy and controlling appetite. Incorporate it into your diet by roasting with spices, adding to milk, or including in salads. Avoid excessive oil, salt, or sugar for best results.
Web Summary : मखाना, एक पौष्टिक नाश्ता, ऊर्जा प्रदान करके और भूख को नियंत्रित करके वजन घटाने में मदद करता है। इसे मसाले के साथ भूनकर, दूध में मिलाकर या सलाद में शामिल करके अपने आहार में शामिल करें। सर्वोत्तम परिणामों के लिए अत्यधिक तेल, नमक या चीनी से बचें।