Join us

घरीच तयार करा प्रोटीन पावडर, कमीतकमी पैशात मिळेल ताकद आणि साइड इफेक्ट्सही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2025 18:59 IST

Make Protein Powder At Home : घरच्या घरी तयार करा प्रोटीन पावडर.

आजकाल लोकं स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेक पदार्थ खातात. वेगवेगळे ज्यूस पितात. खास करून जीमला जाणारे लोक त्यांचा आहार पौष्टिक ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पावडर वापरतात. प्रोटिन शेक पितात.(Make Protein Powder At Home) तो प्रोटीन शेक तयार करण्यासाठी बाजारातून वेगवेगळ्या कंपनींच्या प्रोटीन पावडर विकत घेतात. या प्रोटीन पावडरची किंमत ऐकून तर गरगरायलाच लागतं. प्रोटीन पावडर फार महाग असते. पण स्वास्थ्यासाठी गरजेची असल्याने कितीही महाग असली तरी लोकं ती विकत घेतात. (Make Protein Powder At Home)

ज्यांना हेवी वर्कआऊट करायचा असतो, असे लोक ही पावडर वापरतात. जर घरीच प्रोटीन पावडर तयार करता आली तर? विकतची प्रोटीन पावडर, कोणी सेवन करावी? कोणी करू नये? अशा झेंगटीही असतात. पण घरी तयार केलेली प्रोटीन पावडर कोणीही वापरू शकते. तिचे काहीही साइडईफेक्ट्स नाहीत. 

साहित्य:(Make Protein Powder At Home)भोपळ्याच्या बिया, जवस, चिया सिड्स, बदाम, कोको पावडर, दालचिनी

प्रमाण: दीड वाटी भोपळ्याच्या बियाअर्धी वाटी जवसपाव वाटी चिया सिड्सएक वाटी बदाम(पावडर)तीन चमचे कोको पावडर एक छोटा चमचा दालचिनी(पावडर)

कृती:१. सर्वप्रथम बदामाची बारीक पावडर करून घ्या. तेल सुटेपर्यत बदाम वाटू नका. २. आता भोपळ्याच्या बिया छान वाटून घ्या. सगळं वेगवेगळं वाटून घ्या. एकत्र वाटल्यास सर्व पदार्थ समान वाटले जात नाहीत.३. आता जवस वाटून घ्या. त्यानंतर चिया सिड्स वाटून घ्या. ४. आता सगळं मिक्सरच्या भांड्यात एकत्रित करून घ्या.  त्यात अगोड कोको पावडर घाला. लक्षात ठेवा कोको पावडर अगोडच वापरा.५. त्यात दालचिनीची पावडर घाला. आता सगळं एकत्र करून अगदी पाच सेकंद मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

तयार केलेली पावडर एका हवा बंद डब्यात साठवून ठेवा. रोज एक ग्लास दुधात एक चमचा पावडर घालून प्रोटीन शेक प्या. प्रोटीन पावडरने पोट भरलेले राहते. चवीलाही ती चांगली असते. त्यामुळे मन मारून प्यावे लागत नाही. शरीराची ताकद वाढवण्यासाठी प्रोटीम शेक फायदेशीर ठरतो.   

टॅग्स :अन्नआहार योजनाहेल्थ टिप्स