आजकाल बहुतेकजण आपल्या वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. आपल्यापैकी बरेचजण वजन कमी करण्यासाठी कायम वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतात. बदलती लाईफस्टाइल, चुकीच्या आहार पद्धती (How To Add Lemon In Diet) यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. वजन वाढतं तर लवकर मात्र ते कमी(3 ways to include lemon in your diet) करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. अनेकजण एक्सरसाइज, योगा आणि डाएट, जिम लावून वाढलेलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच काही लोक वजन कमी करण्यासाठी आहारत बदल करतात तर काहीजण आपल्या आहारात काही खास विशिष्ट पदार्थांचा समावेश करतात(Lemon for weight loss 3 ways to include it in your diet).
वजन कमी करण्यासाठी बरेचजण आपल्या रोजच्या आहारात लिंबाचा आवर्जून समावेश करतात. वजन कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरु शकते. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड व्हिटॅमिनस 'सी', व्हिटॅमिन बी-६, पोटॅशियम आणि फायबरसारखे शरीराला आवश्यक असलेले घटक फार मोठ्या प्रमाणांत असतात. लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील आढळतात आणि ते वजन कमी करण्यासाठी मदत करतात. वजन कमी करण्यासाठी लिंबाचा आहारात समावेश करणे फायदेशीर तर असते परंतु लिंबाचा वापर आहारात कसा करावा, जेणेकरुन वजन कमी होण्यास अधिक मदत होईल ते पाहूयात.
वजन कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर...
व्हिटॅमिन सी, बी, अँटिऑक्सिडंट्स, फॉलिक ॲसिड, लोह, कार्ब, फायबर, पोटॅशियम, कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, फ्लेव्होनॉइड्स आणि फॉस्फरस यांसारखे घटक लिंबामध्ये फार मोठ्या प्रमाणात असतात. ज्याचा आपल्या आरोग्याला आणि वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
वजन कमी करण्यासाठी चपाती खाणं सोडू नका, ‘या’ पिठाची करा चपाती-वजनही उतरेल सरसर...
लिंबू केवळ वजन कमी करण्यातच मदत करत नाही , तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात, हृदयविकाराचा धोका कमी करण्यात, त्वचा चमकदार आणि डागरहित करण्यात आणि केस मजबूत करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.
वजन कमी करण्यासाठी आहारात या ३ पद्धतींनी करा लिंबाचा वापर...
१. डिटॉक्स वॉटर :- लिंबाचा वापर करून तयार केलेले डिटॉक्स वॉटर वजन कमी करण्यास अधिक मदत करेल. सकाळी रिकाम्या पोटी हे लिंबाचे डिटॉक्स वॉटर प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते, चयापचय वाढते, त्यामुळे कॅलरीज जलद गतीने बर्न होतात. याशिवाय पोटाशी संबंधित समस्यांपासूनही आराम मिळतो. लिंबाचे डिटॉक्स वॉटर तयार करण्यासाठी, एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. याशिवाय त्यात चिमूटभर काळी मिरी आणि काळे मीठही टाकता येते.
ऑनलाइन रिल्स पाहून झटपट वेटलॉससाठी शॉर्टकट निवडताय? थांबा, तुमचा जीव धोक्यात आहे कारण...
२. लेमन टी :- वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज लेमन टी पिऊ शकता. त्यामुळे वजन कमी करणे आणखीनच सोपे होते. लेमन टी चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे शरीरातील फॅट्स जाळले जाऊन वजन कमी होते. हा चहा शरीरातील विषारी पदार्थही काढून टाकतो.
३. सॅलॅड किंवा कोशिंबीरमध्ये वापरा :- जेवणासोबत आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॅलॅड किंवा कोशिंबीर खातो. तेव्हा या सॅलॅड किंवा कोशिंबीरवर आपण लिंबाचा रस पिळून असे सॅलॅड किंवा कोशिंबीर खाल्ल्यास त्याचा आपल्या आरोग्याला अधिक फायदा होतो. याचबरोबर वजन कमी करण्यासाठी देखील याची मदत होते.