Join us  

डायबिटिस असेल तर नेमकी कोणती भाकरी खावी? ज्वारीची की बाजरीची?- डॉक्टर सांगतात.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 4:25 PM

Which Roti Is Good For Diabetic Patient?: मधुमेह असणाऱ्यांनी ज्वारीची भाकरी खाणं चांगलं की बाजरीची- बघा याविषयी डॉक्टर काय सांगतात...

ठळक मुद्देज्वारीची किंवा बाजरीची जी कोणती भाकरी खाण्याची तुम्हाला सवय आहे ती भाकरी खा. पण एक गोष्ट मात्र काटाक्षाने लक्षात ठेवा...

काही पदार्थ असे आहेत जे मधुमेह असणाऱ्या लोकांनी खावेत की टाळावेत, याबाबत नेहमीच संभ्रम असतो. तसाच एक पदार्थ म्हणजे भाकरी. मधुमेह असणाऱ्यांनी मुळात भाकरी खावी की खाऊ नये, शिवाय भाकरी खायचीच असेल तर बाजरीची खावी की ज्वारीची खावी (Jowar bhakari or Bajra Bhakari?), असा प्रश्न बहुतांश लोकांच्या मनात असतो (Which Roti Is Good For Diabetic Patient?). याच प्रश्नाचं अचूक उत्तर डॉक्टरांकडून जाणून घेऊ. तज्ज्ञ डॉक्टरांनी याविषयीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

मधुमेह असणाऱ्यांनी कोणती भाकरी खावी?

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी बाजरीची भाकरी खावी की ज्वारीची भाकरी खावी, भाकरी खाल्ली तर कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या, याविषयीचा व्हिडिओ डॉक्टरांनी dr.jaydip_revale या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे.

बघा किती हा गचाळपणा! चक्क पायाने दाबून केले पापड- पाहा व्हायरल व्हिडिओ

यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्ही ज्या भागात राहाता, त्या भागात जे पिकतं त्याची भाकरी खाणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. तुम्ही राहात असलेल्या परिसराच्या ६ मैल अंतरावर किंवा आसपासच्या भागात जो पारंपरिक पदार्थ घेतला जातो, तो खावा.

कैरीचं चटकमटक इन्स्टंट लोणचं करा फक्त ५ मिनिटांत, बघा चटपटीत लोणच्याची सोपी रेसिपी

ज्वारीची किंवा बाजरीची जी कोणती भाकरी खाण्याची तुम्हाला सवय आहे ती भाकरी खा. पण एक गोष्ट मात्र काटाक्षाने लक्षात ठेवा, असं डॉक्टर म्हणत आहेत. ती गोष्ट नेमकी कोणती ते पाहा...

 

जेव्हा तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीची अशी कोणतीही भाकरी खाता, तेव्हा त्याच्यासोबत भात मुळीच खाऊ नका. भात आणि भाकरी हे अजिबातच चांगले कॉम्बिनेशन नाही.

ऑफिससाठी फॉर्मल लूक देणारं ब्लाऊज शिवायचंय? ७ सुंदर 'नेक डिझाईन्स'- दिसाल स्टायलिश, आकर्षक

हे दोन्ही पदार्थ जर तुम्ही खात असाल तर तुमची शुगर लेव्हल चटकन वाढेल. त्यामुळे भाकरी खायची असेल तर भात टाळायलाच पाहिजे. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्समधुमेहअन्न