Join us
Daily Top 2Weekly Top 5

रात्री हळदीचं दूध पिऊन झोपता, १ गुळाचा खडा 'या' दूधात घाला-असा होईल इफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 23:42 IST

Turmeric milk with jaggery : गुळात आयर्न, पोटॅशियम, प्रोटीन, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात.

औषधी गुणांनी परीपूर्ण गुळाचा वापर प्रत्येक घरामध्ये केला जातो. काहीजणांना असाच गूळ खायला आवडतो तर काहीजणांना गुळाचा चहा प्यायला आवडतो. हिवाळ्याच्या दिवसांत गुळाच्या चहाचे सेवन केल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. गुळाचे सेवन वर्षभरही केल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. गुळात आयर्न, पोटॅशियम, प्रोटीन, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात. दुधात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. हे फूड कॉम्बिनेशन तब्येतीसाठी गुणकारी मानले जाते. दूध प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे. दुधासोबत गूळ खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. रात्री हळदीचं दूध बरेचजण पितात. तुम्ही हळदीच्या दुधासोबत गुळही खाऊ शकता. 

इम्युनिटी बुस्टर

गुळात एंटी ऑक्सिडेंट्स, जिंक, सेलेनियम यांसारखे पोषक तत्व असतात जे इम्यूनिटी वाढवतात आणि शरीरातील इन्फेक्शनशी लढण्यास मदत करतात. याचे सेवन दुधासोबत केले जाते. हे ड्रिंक इम्युनिटी वाढवण्यासही मदत करते आणि तब्येतही चांगली ठेवते.

पचनक्रिया चांगली राहते

गुळामुळे पचन एंजाईम्स एक्टिव्ह राहतात. ज्यामुळे अन्न सहज पचतं. गूळ घातलेलं दूध प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाच्या समस्या टाळण्यासही मदत होते. गूळातील पोटॅशियम, शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स आणि मेटाबॉलिझ्म बॅलेंन्स करतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

हाडं मजबूत राहतात

दूध कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. जे हाडांसाठी उत्तम ठरते. दुधासोबत गुळाचे सेवन केल्यानं हाडं मजबूत होतात बोन्स डेंसिटी वाढते. हाडांशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. 

एनिमियापासून बचाव होतो

गुळात आयर्न मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे हिमोग्लोबिन लेव्हल नियंत्रणात राहते. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही रोज गुळाचे सेवन करू शकता. ज्यामुळे एनिमियाचा धोका कमी होतो. 

गूळ आणि दुधाचे सेवन कधी करावे?

दुधासोबत गुळाचे सेवन  केल्यानं झोप चांगली येते ज्यामुळे इम्युनिटी वाढते एनर्जी लेव्हलही वाढते. याशिवाय शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यासही मदत होते. तर तुम्हाला कोणताही आजार किंवा एलर्जी होत असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaggery in turmeric milk: boosts immunity, aids digestion, strengthens bones.

Web Summary : Adding jaggery to turmeric milk boosts immunity, aids digestion, strengthens bones due to calcium and iron. It helps prevent anemia and improves sleep. Consult a doctor if you have allergies.
टॅग्स :हेल्थ टिप्स