वजन वाढू नये म्हणून आपण अनेक घरगुती उपाय, जिम, व्यायाम यासारख्या अनेक गोष्टी करतो. मागच्या वर्षभरात वजन कमी करण्याचे ढीगभर सल्ले आपल्या कुणी तरी दिलेच असावे.(Ajwain cumin water) सोशल मीडियावर तर असे सल्ले सहज मिळतात. हे पाणी प्यायल्याने वजन कमी होईल, हे पदार्थ खाल्ल्याने अमुक होईल. त्यातील सगळ्यात ट्रे़डिंग असलेला उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी ओव्या- जिऱ्याचं पाणी पिणं.(Fat burn home remedy) यामुळे फॅट बर्न होते, पोट साफ राहतं, मेटाबॉलिझम वाढतो. अशा अनेक दाव्यांमुळे अनेकजण कोणताही विचार न करता हा उपाय सहज करतात. पण असं केल्याने आपल्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो असं न्यूट्रिशनिस्ट म्हणतात. (Weight loss drinks)
टाळूवर लाल चट्टे-चाई पडल्यासारखे केस गेले-कोंडाही भरमसाठ, करा ५ उपाय-आग न होता त्रास होईल कमी
आपल्या स्वयंपाकघरात आढळणारे ओवा-जिरे हे आयुर्वेदात औषधी गुणधर्म आहेत. पचन सुधारण्यास गॅस-अॅसिडिटी कमी करण्यास आणि सूज उतरवण्यास याचा उपयोग होतो. अनेकजण वजन कमी करण्यासाठी दिवसातून हे पाणी ४ ते ५ वेळा पितात. ज्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर आपण देखील सकाळी रिकाम्या पोटी जिरे, ओवा, बडीशेप, मेथीचे पाणी पित असाल तर वेळीच थांबा. याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.
न्यूट्रिशनिस्ट म्हणतात ओवा, जिरे, मेथी हे जेवणाची चव वाढवतात. त्यामुळे कोणत्याही पदार्थांसोबत ते खाणे चांगले. परंतु याचे पाणी पिणे प्रत्येकासाठी चांगले नाही. ओवा सतत खाल्ल्याने शरीरात खूप उष्णता निर्माण होते. तसेच आम्लता तयार होत असेल तर हे पाणी पिणे टाळावे. यामुळे छातीत जळजळ आणि आम्लता वाढते.
आपल्याला भूक कमी लागत असेल, सतत थंडी वाजत असेल किंवा रक्तदाब कमी-जास्त होत असेल तर बडीशेपचे पाणी पिऊ नका. यात असणारे फायटोएस्ट्रोजेन शरीरातील हार्मोनल असंतुलित करतात. कमी रक्तदाबामुळे विविध समस्या उद्भवतात.
जर आपल्याला पोटात बिघाड असेल, मासिक पाळीत अतिरक्तस्त्राव होत असेल तर मेथीचे पाणी पिणे टाळा. जास्त मेथी खाल्ल्याने पोटात पेटके येणे, पचन समस्या, अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान मेथीचे पाणी देखील टाळावे.
मधुमेह, तोंडाचा अल्सर, उच्च रक्तदाब असलेल्यांनी जिऱ्याचे पाणी पिणे टाळावे. सकाळी उठल्यानंतर सुरुवात कोमट पाण्याने करावी. कोमट पाणी प्यायाल्याने शरीराला हानी पोहोचत नाही.
