>आहार -विहार > डाएटिंग करताना 'या' चुका कराल तर वजन कमी होणार नाहीच, उलट भरभर वाढेल!

डाएटिंग करताना 'या' चुका कराल तर वजन कमी होणार नाहीच, उलट भरभर वाढेल!

कधीकधी फटाफट वजन कमी करण्याच्या नादात नेमक्या नको त्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे वजन कमी तर काही होत नाहीच, उलट आणखी वेगात वाढू लागते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 02:12 PM2021-09-07T14:12:54+5:302021-09-07T14:14:09+5:30

कधीकधी फटाफट वजन कमी करण्याच्या नादात नेमक्या नको त्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे वजन कमी तर काही होत नाहीच, उलट आणखी वेगात वाढू लागते.

If you make these mistakes while dieting, you will gain a lot! | डाएटिंग करताना 'या' चुका कराल तर वजन कमी होणार नाहीच, उलट भरभर वाढेल!

डाएटिंग करताना 'या' चुका कराल तर वजन कमी होणार नाहीच, उलट भरभर वाढेल!

Next
Highlightsअर्धवट माहितीच्या आधारावर वेटलॉस संदर्भात वेगवेगळे प्रयोग शरीरावर केले जातात. याचा नेमका उलटा परिणाम होतो.

वाढते वजन ही जवळपास तिशीनंतर बहुतांश लोकांना सतावणारी गोष्ट. काहीही केले किंवा कितीही कमी जेवले, तरी वजन कसे काय वाढते, हाच खूप लोकांना समजत नाही. बऱ्याचदा काय होते की, वजन कमी करायचे म्हणून आपण कुणीतरी सांगितलेले काहीतरी लक्षात ठेवतो. त्यातल्या निम्म्या गोष्टी लक्षात ठेवतो आणि काही गोष्टी विसरून जातो. या अशा अर्धवट माहितीच्या आधारावर मग वेटलॉस संदर्भात वेगवेगळे प्रयोग शरीरावर केले जातात. याचा नेमका उलटा परिणाम होतो आणि आपण वजन वाढू नये, म्हणून जेवढी काळजी घेऊ लागतो, तेवढा त्याचा उलटा परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतो. म्हणूनच वेटलॉससाठी प्रयत्न करत असताना काही चूका करणे टाळले पाहिजे.

 

वेटलॉस करताना या गोष्टी टाळा
१. कमी प्रमाणात जेवणे 

वजन कमी करून फिट ॲण्ड फाईन होण्यासाठी आपण अत्यंत आतूर झालेलो असतो. त्यामुळे लवकरात लवकर वजन कमी कसे होईल, यासाठी आपण काही चुकीच्या गोष्टींच्या मागे लागतो. जेवण कमी केले किंवा उपाशीपोटी राहिलो तर लवकर वजन कमी होईल, हा समज खूप जणींमध्ये असतो. पण उपाशी राहिल्यामुळे बऱ्याचदा कॅलरी बर्न होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण वाढत जाते.

 

२. सगळे पदार्थ न खाणे
अमूक पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते, असे आपण अनेक जणांकडून ऐकलेले असते. त्यामुळे बऱ्याचदा वेटलॉस करणारे फक्त कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स खाण्यावर भर देतात. यामुळे शरीराला इतर आवश्यक असणारी खनिजे मिळत नाहीत. याचाही परिणाम वजन वाढीवर होते. 

३. कमी झोप घेणे
जास्त झोपले की खाणे अंगी लागते आणि तब्येत सुधारते असे आपण ऐकलेले असते. त्या नादात अनेक जण कमी झोपतात. पण शरीराला ७ ते ८ तास झोप मिळणे गरजेचे आहे. झोप कमी झाली, तर त्याचा चयापचय क्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होत नाही आणि अनावश्यक चरबी वाढू लागते. 

 

४. व्यायाम करा
वेटलॉससाठी डाएट करतो आहोत, असे वाटून व्यायाम करणे टाळत असाल, तर ते चुकीचे आहे. वेटलॉस करत असतानाही व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यामुळे शरीराच्या सर्व प्रक्रिया सुरळीत होतात आणि पचनक्रिया, चयापचय क्रिया सुधारते. 

 

Web Title: If you make these mistakes while dieting, you will gain a lot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Weight loss Tips : पाठीवर जमा झालेल्या चरबीमुळे अंग बेढब झालंय? रोज नियमित ५ मिनिटं हा व्यायामानं मिळवा परफेक्ट फिगर - Marathi News | Weight loss Tips : 5 minute yoga for back fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाठीवर जमा झालेल्या चरबीमुळे अंग बेढब झालंय? रोज नियमित ५ मिनिटं हा व्यायामानं मिळवा परफेक्ट फिगर

Weight loss Tips :पाठीची चरबी  कमी करण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. पाठीच्या चरबीसाठी काही योगासन केल्याने, आपण सहजपणे शरीरावरचं अतिरिक्त फॅट्स कमी करू शकता. ...

मैदा आणि तांदुळाच्या पिठातली भेसळ ओळखायची कशी? सावध व्हा, विकतच्या पिठातली भेसळ 'अशी' शोधा... - Marathi News | How to identify adulteration in flour and rice flour? Be careful, find the adulterated in the flour... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मैदा आणि तांदुळाच्या पिठातली भेसळ ओळखायची कशी? सावध व्हा, विकतच्या पिठातली भेसळ 'अशी' शोधा...

सणावाराच्या तोंडावर पैसे कमावण्यासाठी अनेक पदार्थांमध्ये भेसळ करण्यात येते. मैदा आणि तांदळाच्या पीठातील भेसळ ओळखण्याची सोपी चाचणी ...

How to make perfect curd : ताज्या, घट्ट दह्यासाठी विरजण लावताना 'या' ३ ट्रिक्स वापरा; चुटकीसरशी मिळेल ३ वेगवेगळ्या प्रकारचं दही - Marathi News | How to make perfect curd : 3 Tips to get 3 types of curd grainy hung and thick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ताज्या, घट्ट दह्यासाठी विरजण लावताना 'या' ३ ट्रिक्स वापरा; चुटकीसरशी मिळेल ३ वेगवेगळ्या प्रकारचं दही

How to make perfect curd : अनेक महिलांची  अशी तक्रार असते की घरी दही लावलं की व्यवस्थित लागत नाही त्यात पाणी खूप राहतं.  कढी, दहीवडे अशा वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं दही हवं असतं. ...

Ways to use overripe fruits : घरातली जास्त पिकलेली फळं फेकून देता? थांबा, 'या' ५ प्रकारे डाग लागलेल्या फळांचा पुरेपूर वापर करा - Marathi News | Ways to use overripe fruits : Uses of overripe fruits for making jam, smoothie | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरातली जास्त पिकलेली फळं फेकून देता? थांबा, या ५ प्रकारे डाग लागलेल्या फळांचा वापर करा

Ways to use overripe fruits : फणस खाण्याचे फायदे अनेक आहेत. लोक ते कच्चे आणि शिजवलेले दोन्ही खातात. पण जेव्हा ते जास्त पिकतं तेव्हा ते खाणं थोडं कठीण होते. ...

डायबिटीस आहे, तो ही ऐन तारुण्यात? या 6 चुका टाळा, कारण.. - Marathi News | Is diabetes in young age? Avoid these 6 mistakes, because .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीस आहे, तो ही ऐन तारुण्यात? या 6 चुका टाळा, कारण..

डायबिटीस असला म्हणून खूप घाबरून जायचे कारण नाही. तसेच खूप आरामात राहणेही योग्य नाही. योग्य ती काळजी घेऊन या समस्येसोबत जगता येऊ शकते ...

Heart diseases : 'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना कमी वयातच उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण - Marathi News | Heart diseases : People of this blood group at high risk of heart diseases | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'हा' ब्लड ग्रुप असलेल्यांना उद्भवतात हृदयाचे जीवघेणे आजार; समोर आलं कारण

Heart diseases : संशोधकांच्या म्हणण्यानुसार  एबी रक्तगट असलेल्यांमध्ये कार्डिओवॅस्क्यूलर डिसीज होण्याचा धोका जास्त असतो. त्यात ए आणि बी रक्तगटात तुलनेने कमी एंटीबॉडी असतात.  ...