Join us

थुलथुलीत पोट-बेढब शरीर नको वाटतं? नाश्त्याला खा मूग डाळीचा चविष्ट पदार्थ; पोट सपाट-दिसाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2024 13:46 IST

How to make weight loss-friendly Moong Dal Cheela : वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता स्किप करू नका; खाऊनही वजन कमी होऊ शकते

आपले आरोग्य आहारावर असते. आहार योग्य असेल तर, शरीर सुदृढ राहील, शिवाय गंभीर आजारांचा धोकाही टळतो. पण योग्य आहाराचे सेवन नाही केल्यास लठ्ठपणासह इतर गंभीर आजारांचाही धोका वाढतो. बरेच जण वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता किंवा एक वेळचं जेवण स्किप करतात (Weight Loss Tips). पण यामुळे खरंच वजन कमी होते का? जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, नाश्ता स्किप न करता सकाळी हाय प्रोटीन नाश्ता (High Protien Nashta) खाण्याचा सल्ला पोषणतज्ज्ञांनी दिला आहे.

हाय प्रोटीन नाश्त्यामध्ये आपण मुगडाळ चिला तयार करू शकता. मूग डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. प्रोटीन वजन कमी करण्यास मदत करते, शिवाय पचनक्रियाही सुधारते. २ किंवा ३ चिला खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याची रेसिपी न्यूट्रिशनिस्ट रचना मोहन यांनी शेअर केली आहे(How to make weight loss-friendly Moong Dal Cheela).

हाय प्रोटीन ब्रेकफास्ट करण्यासाठी लागणारं साहित्य

हा १ आयुर्वेदिक काढा प्या, सुटलेलं पोट कमी करण्यासाठी रामदेवबाबांचा खास उपाय

हिरवे मूग

उडीद डाळ

तांदूळ

हिरवी मिरची

आलं

मीठ

मूग डाळीचा चिला करण्याची योग्य पद्धत

- सर्वप्रथम, हिरवे मूग, उडीद डाळ, तांदूळ समप्रमाणात घेऊन धुवून घ्या. त्यात पाणी घाला, व त्यावर झाकण ठेवून ४ तासांसाठी भिजत ठेवा.

- ४ ते ६ तासानंतर साहित्य भिजल्यानंतर मिक्समध्ये काढून घ्या, त्यात हिरवी मिरची व चवीनुसार मीठ घालून पेस्ट तयार करा.

- तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या, व पीठ ४ ते ५ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा.

- पीठ व्यवस्थित फुलल्यानंतर त्यात आवडीच्या भाज्या किसून घाला.

वजन कमी करायचं म्हणून ताजा भात बंद करुन शिळा भात खावा, हे खरं की खोटं?

- नॉन-स्टिक पॅनवर बॅटर चमच्याने पसरवून चिला दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. जर आपल्याला पांढरे तीळ आवडत असतील तर, आपण चिला तयार करताना पॅनवर तीळ घालू शकता. अशाप्रकारे वेट लॉस मूग डाळीचा हाय प्रोटीन चिला खाण्यासाठी रेडी.

हिरवे मूग डाळ वजन कमी करण्यास करते मदत

वजन कमी करण्यासाठी आपल्याला फॅन्सी डाएट प्लॅन फॉलो करण्याची गरज नाही. आपण हिरवे मुगाचे पदार्थ खाऊनही वेट लॉस करू शकता. मूग डाळीत प्रथिने मुबलक प्रमाणात असते. जे स्नायूंच्या विकासात मदत करतात. यामध्ये फायबर देखील असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स