नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी अनेकजण ठरवतात, यंदा तरी वजन कमी करायचं. पण काही दिवसांतच डाएटचा कंटाळा, वेळेची कमतरता आणि चुकीच्या सवयी यामुळे हा ठराव मागे पडतो.(Weight loss diet plan) वजन कमी करायचं म्हटलं की लगेच उपाशी राहणं, एकाच प्रकारचं अन्न खाणं किंवा तासन्तास जिममध्ये घाम गाळणं असे गैरसमज आपल्या मनात येतात.(Lose 6 kg in one month) प्रत्यक्षात मात्र योग्य पद्धतीने, शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि शरीराच्या गरजेनुसार डाएट केल्यास वजन कमी करणं इतकं कठीण नसतं.( New year weight loss plan)जर आपल्यालाही महिन्याभरात सहा किलो वजन कमी करायचं असेल तर योग्य डाएट, व्यायाम केल्यास हे शक्य होऊ शकतं. हा डाएट प्लान फक्त वजन कमी करण्यापुरता मर्यादित नसून शरीराला देखील आतून मजबूत करतो. जर महिनाभर आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर वजन नक्कीच कमी होण्यास मदत होईल. पाहूया वजन कमी करण्यासाठी काय करायला हवं.
सकाळी आपले शरीर अधिक सक्रिय असते. योग्य दिनचर्येचा पाळल्यास पचनक्रिया सक्रिय होते, पोटफुगी कमी होणे आणि दिवसभराची भूक नियंत्रित करण्यास मदत होते. तसेच आपल्या शरीरातील चरबी देखील जाळली जाते. त्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी ओव्या-जिऱ्याचे पाणी प्या. ज्यामुळे चयापचय क्रिया वाढते. दुसऱ्या दिवशी मेथीच्या बियांचे पाणमी प्या. हे पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. आले आणि लिंबू पाणी प्याल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. तसेच सकाळी आपण भिजवलेले ५ बदाम, १ अक्रोड किंवा अर्धा कप दही देखील खाऊ शकतात.
पोषणतज्ज्ञ म्हणतात रात्री काही पेय घेतल्याने शरीरातील जळजळ कमी होण्यास, तणाव आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. आपल्या रात्रीच्या वेळी हळद आणि काळी मिरी घालून कोमट पाणी प्यायला हवे. यामुळे जळजळ कमी होते. दालचिनीचे पाणी प्या, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. जेवणानंतर बडीशेप खा, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होईल.
जेवणात आपण प्रथिनांसाठी डाळ, चीज, टोफू, दही किंवा अंडी खाऊ शकतो. फायबरसाठी आपल्याला आहारात दुधी भोपळा, भेंडी, गाजर, काकडी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा लागेल. कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात घ्या. जर आपले पोट फुगले असेल किंवा गॅस झाला असेल तर चिया सीड्सचे पाणी प्या. गॅस आणि अॅसिडीटीसाठी आले-बडीशेप पाणी प्या. नारळ पाणी आणि पपई आणि पेर सारखी हंगामी फळे देखील आतड्यांचे आरोग्य सुधारतात. आपण या सगळ्या गोष्टी नियमितपणे फॉलो केल्यास महिन्याभरात सहा किलो वजन कमी होण्यास नक्की मदत होईल.
Web Summary : Want to lose weight? A nutritionist suggests a diet including cumin-fennel water, protein, fiber, and limited carbs. This plan boosts metabolism, aids digestion, and promotes overall health for effective weight loss.
Web Summary : वजन कम करना चाहते हैं? एक पोषण विशेषज्ञ जीरा-सौंफ का पानी, प्रोटीन, फाइबर और सीमित कार्ब्स सहित आहार का सुझाव देते हैं। यह योजना चयापचय को बढ़ावा देती है, पाचन में सहायता करती है और प्रभावी वजन घटाने के लिए समग्र स्वास्थ्य को बढ़ावा देती है।