lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थुलथुलीत पोट वाढतच चाललं आहे? जिऱ्याचे पाणी 'या' पद्धतीने प्या; पोट होईल सपाट-दिसाल सुडौल

थुलथुलीत पोट वाढतच चाललं आहे? जिऱ्याचे पाणी 'या' पद्धतीने प्या; पोट होईल सपाट-दिसाल सुडौल

How to have jeera water (cumin water) to lose weight : वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी कसे तयार करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 05:25 PM2024-04-24T17:25:02+5:302024-04-24T17:26:41+5:30

How to have jeera water (cumin water) to lose weight : वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी कसे तयार करायचे?

How to have jeera water (cumin water) to lose weight | थुलथुलीत पोट वाढतच चाललं आहे? जिऱ्याचे पाणी 'या' पद्धतीने प्या; पोट होईल सपाट-दिसाल सुडौल

थुलथुलीत पोट वाढतच चाललं आहे? जिऱ्याचे पाणी 'या' पद्धतीने प्या; पोट होईल सपाट-दिसाल सुडौल

आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला अनेकांना जमेलच असे नाही (Weight Loss). ८ तासांची ड्युटी, अयोग्य आहार, अपुरी झोप याचा थेट फटका आरोग्याला सहन करावा लागतो (Fitness). ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. शिवाय वजनही वाढत राहते. वजन वाढले की, बऱ्याचदा ते कमी करतानाही नाकीनऊ येतात (Jeera Water). वजन वाढलं की आपण, व्यायाम किंवा योगभ्यास करतो. यासह डाएटवर अधिक भर देतो.

जर आपलं वजन डाएट आणि व्यायाम करूनही कमी होत नसेल तर, नैसर्गिक पद्धतीने कमी करून पाहा. यामुळे नक्कीच वजन कमी होण्यास मदत होईल. यासाठी आपण सकाळी जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. पण प्रश्न असा निर्माण होतो की, जिऱ्याचे पाणी कधी प्यावे? वेट लॉससाठी जिऱ्याचे पाणी कशापद्धतीने तयार करावे?(How to have jeera water (cumin water) to lose weight).

वेट लॉससाठी जिऱ्याचे पाणी कसे बनवावे ?

- शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी जिऱ्याचे पाणी उपयुक्त ठरते. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात एक चमचा जिरे घाला.

- नंतर ५ मिनिटांसाठी जिरे पाण्यात उकळवून घ्या. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. ग्लासवर चहाची गाळणी ठेवा, त्यात पाणी गाळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर प्या. आपण त्यात मध किंवा दालचिनी पावडर देखील मिक्स करू शकता. 

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त

जिऱ्याच्या पाण्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात. याच्या नियमित सेवनाने पोटाची चरबी कमी होते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

मनी प्लांटवर बुरशी -पानंही पिवळी पडतात? कुंडीतल्या मातीत मिसळा फुकट मिळणारी १ गोष्ट; दिसेल जादू

पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त

अपचन, गॅसेस, अॅसिडिटीचा त्रास होऊ नये म्हणून आपण जिऱ्याचे पाणी पिऊ शकता. जिऱ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर असतात. जे पोटाचे विकार दूर ठेवण्यास मदत करतात. नियमित जिऱ्याचे पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते.

ब्लड शुगर नियंत्रण

सकाळी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये असलेले हाय फायबर घटक आणि पोषक घटक, नैसर्गिकरीत्या इन्शुलिन पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

त्वचा निरोगी राहते

जिऱ्याच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे एक अँटिमायक्रोबायल असून, ते शरीराला डिटॉक्स करतात. ज्यामुळे त्वचा देखील निरोगी राहते.

विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

जिरे खाण्याचे फायदे

फोडणीमध्ये आपण जिरे घालतोच. छोट्याश्या बियांमध्ये अनेक गुणधर्म असतात. त्यात आयर्न, कॉपर, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्ससारखे घटक आढळतात. ज्याचा फायदा अर्थात आरोग्याला होतो.

Web Title: How to have jeera water (cumin water) to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.