Join us

आषाढी एकादशीचा उपवास केला, पण आता ॲसिडीटी वाढली- पोट बिघडलं? ४ उपाय, लवकर वाटेल बरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2025 16:43 IST

How To Get Relief From Acidity And Indigestion: आषाढी एकादशीचा उपवास केल्यानंतर अनेकांना दुसऱ्या दिवशी खूप त्रास होतो. असं होऊ नये म्हणून काय करावं? (4 simple home remedies to reduce acidity and indigestion)

ठळक मुद्देॲसिडीटी वाढली असेल तर शतावरी, तुळशीचे बी, सब्जा, थंड दूध, काकडी, केळी असे थंड पदार्थ खाणंही फायद्याचं ठरतं.  

आषाढी एकादशीचा उपवास अनेक जण उत्साहात करतात. जे एरवी कोणताच उपवास करत नाहीत ते देखील मोठ्या श्रद्धेने आषाढी एकादशी करतात. त्यात असं होतं की घरात सगळ्यांनाच उपवास असल्याने फराळाचे कित्येक वेगवेगळे पदार्थ केले जातात. हे पदार्थ एक तर खूप आवडीचे असतात आणि दुसरं म्हणजे घरातले सगळे सोबत असतात. त्यामुळे एकमेकांच्या नादाने मग जरा गरजेपेक्षा जास्तच खाल्ले जातात. खाताना लक्षात येत नाही. पण नंतर मात्र त्याचा खूप त्रास होऊ लागतो. उपवासाची सवय असेल तर जास्त जड जात नाही. पण कधीतरीच उपवास करणाऱ्यांची मात्र ॲसिडीटी वाढते. पोट बिघडतं (How To Get Relief From Acidity And Indigestion?). असं तुम्हालाही होत असेल तर लवकर बरं वाटण्यासाठी काय करावं ते पाहूया..(4 simple home remedies to reduce acidity and indigestion)

 

आषाढी एकादशीचा उपवास केल्यानंतर ॲसिडीटी वाढली असेल तर..

१. उपवासामुळे ॲसिडीटी वाढली असेल, डोकं जड पडलं असेल किंवा पोट बिघडलं असेल तर दुसऱ्यादिवशीचा आहार अगदी हलका घ्यावा. गरम वरण भात किंवा तूप मीठ भात खाल्ल्यास जास्त चांगलं.

करिना कपूरने कुणाला दाखवली थेट चप्पल? ठणकावून म्हणाली Prada नाही, ही माझी कोल्हापूरीच..

मसालेदार, तेलकट, तिखट पदार्थ खाणं पुर्णपणे टाळा. यामुळे ॲसिडीटी आणखी जास्त वाढते. तुमचा रोजचा जो आहार आहे, त्यापेक्षा थोडं कमी खाल्लं तर अधिक चांगलं.

२. ॲसिडीटी वाढली असेल तर शतावरी, तुळशीचे बी, सब्जा, थंड दूध, काकडी, केळी असे थंड पदार्थ खाणंही फायद्याचं ठरतं.  

 

३. उपवासामुळे जर तुमचं पोट बिघडलेलं असेल तर दुसऱ्यादिवशी कच्च्या भाज्या, सॅलाड, आंबट फळं, कडधान्यं खाणं टाळा. यामुळे कदाचित पोटाचा त्रास जास्त वाढू शकतो. जेवणानंतर धने, जिरे, बडिशेप यांचा काढा प्यायल्यानेही पोटदुखी कमी होऊ शकते.

World Chocolate Day 2025: डाएट म्हणूनच बिंधास्त चॉकलेट खाणारे सेलिब्रिटी, काहींचा तर अजबच चॉकलेट फंडा

४. ॲसिडीटी कमी करण्यासाठी डाळिंब, ओले अंजीर, सफरचंद ही फळं खा आणि चहा, काॅफी कमीतकमी प्रमाणात प्या. जेवणाच्या वेळा शक्यतो टाळू नका. त्याने तुमची ॲसिडीटी जास्त वाढू शकते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआषाढी एकादशी २०२५नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४होम रेमेडी