Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिम आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...

कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिम आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...

how to get a slim waist fast : easy exercises for flat tummy : waist slimming workout at home : डाएटिंगचं टेन्शन न घेता 'फ्लॅट टमी' हवी असेल तर रोज १५ मिनिटं करा खास ३ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 15:44 IST2026-03-31T15:39:01+5:302026-03-31T15:44:03+5:30

how to get a slim waist fast : easy exercises for flat tummy : waist slimming workout at home : डाएटिंगचं टेन्शन न घेता 'फ्लॅट टमी' हवी असेल तर रोज १५ मिनिटं करा खास ३ उपाय...

how to get a slim waist fast easy exercises for flat tummy waist slimming workout at home | कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिम आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...

कंबरेचे माप २८ व्हावे असे वाटते? पण जिम आणि डाएटिंगही नको, मग रोज १५ मिनिटं करा ३ उपाय...

वाढलेलं पोट आणि सुटलेला कंबरेचा घेर आज अनेकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. आरशासमोर उभं राहिल्यावर 'हे पोट कधी कमी होईल?' हा प्रश्न मनात येताच आपण सरळ डाएटिंग, जिम करण्यावर अधिक भर देतो. मग सुरू होतो तो दिवस - दिवस स्वतःला उपाशी ठेवण्याचा खेळ... दिवसातून फक्त एकदाच  जेवणं किंवा फक्त ज्यूस, फलाहार करणं यामुळे पोट कमी होण्याऐवजी अशक्तपणाच जास्त वाढतो. पण कंबर लवचिक आणि 'स्लिम-फिट' बनवण्यासाठी तुम्हाला तुमचं आवडतं जेवण किंवा आवडीचे पदार्थ सोडण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही फक्त ३ सोपे व्यायाम करूनही तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता(how to get a slim waist fast).

पोटाची वाढती ढेरी किंवा पोटावरची चरबी जाळण्यासाठी स्वतःला उपाशी - तापाशी ठेवून त्रास देण्याची अजिबात गरज नाही. शरीराला उपाशी ठेवल्याने वजन कमी होण्याऐवजी मेटाबॉलिझम बिघडते. त्याऐवजी, फक्त ३ अशा 'स्मार्ट' एक्सरसाइज आहेत, ज्या तुमच्या पोटावरच्या हट्टी चरबीवर थेट परिणाम करतात. फॅन्सी डाएटिंगचे (easy exercises for flat tummy) कोणतेही खूळ नाही, घरच्या घरी 'स्लिम-फिट' कंबर मिळवण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. पोटाचा घेर कमी करण्यासाठी (waist slimming workout at home) डाएटिंगपेक्षा 'टार्गेटेड वर्कआऊट' जास्त महत्त्वाचा असतो. जर तुम्हालाही डाएटिंगचं टेन्शन न घेता 'फ्लॅट टमी' हवी असेल तर एकदा हा उपाय नक्की करुन पाहा... 

वाढलेलं पोट ही फक्त सौंदर्याची समस्या नसून ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी धोक्याची घंटा आहे. पण पोटाचा घेरा कमी करण्याच्या नादात आपण चुकीच्या पद्धतीने डाएटिंग करतो आणि शरीराचं नुकसान करून घेतो. चपाती सोडली, भात बंद केला... तरीही पोटाचा आकार बदलत नाहीये? मग अशावेळी कोणत्याही कडक डाएटशिवाय (best exercises to reduce waist size) पोटाची चरबी कमी करणे आता शक्य आहे. रोज सकाळी फक्त १५ मिनिटे द्या आणि 'या' ३ एक्सरसाइज मॅजिकसारख्या काम करतील.

कोणत्या आहेत त्या ३ एक्सरसाइज... 

१. रशियन ट्विस्ट (Russian Twist) :- कमी वेळात पोटाची ढेरी आणि कंबरेचा घेर कमी करायचा असेल, तर तुम्ही रोज सकाळी ५ ते १० चे ३ सेट 'रशियन ट्विस्ट' करू शकता. हा व्यायाम पोटाच्या स्नायूंवर थेट परिणाम करतो. जमिनीवर पाय पसरून बसा. तुमचे पाय सरळ ठेवा, पण गुडघे थोडे वरच्या दिशेला उचललेले असावेत. आता तुमची पाठ थोडी मागच्या बाजूला झुकवा (तुमच्या शरीराचा आकार 'V' सारखा दिसेल). दोन्ही हात एकमेकांना जोडून समोर धरा.आता कंबरेतून वळून जोडलेले हात आधी डाव्या बाजूला नेऊन जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर उजव्या बाजूला न्या. याच प्रकारे ही क्रिया पुन्हा पुन्हा करा. जर तुम्हाला हा व्यायाम अधिक फायदेशीर करायचा असेल, तर हातामध्ये पाण्याची बाटली किंवा एखादे वजनदार डंबेल्स (Dumbbell)  'ट्विस्ट' करा. यामुळे पोटावर अधिक दाब पडेल आणि लवकर फरक दिसेल. असे केल्याने तुमच्या पोटाच्या आणि कंबरेच्या बाजूच्या स्नायूंवर ताण पडतो. यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी जाळण्यास मोठी मदत मिळते आणि कंबरेला सुंदर परफेक्ट शेप मिळतो. 

नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट... 

२. माउंटन क्लायंबर (Mountain Climber) :- नावाप्रमाणेच हा व्यायाम म्हणजे जणू 'डोंगर चढणे'! हा एक असा व्यायाम प्रकार आहे जो तुमच्या संपूर्ण शरीराला इन्स्टंट एनर्जी देतो आणि तुम्हाला 'ॲक्टिव्ह' करतो. शरीराची अतिरिक्त कॅलरी जाळण्यासाठी हा सर्वात उत्तम मार्ग आहे. सर्वात आधी जमिनीवर उपडे झोपा आणि संपूर्ण शरीर वर उचला. तुमच्या शरीराचा संपूर्ण भार तळहात आणि पायांच्या पंज्यांवर द्या (जसे आपण पुश-अप्स मारताना करतो). आता तुमचे हात एकाच जागी स्थिर ठेवा आणि पाय हवेत उडी मारल्यासारखे हलवा. जणू काही तुम्ही डोंगर चढत आहात, अशा पद्धतीने एक पाय पुढे आणा आणि मग तो मागे करून दुसरा पाय पुढे आणा. ही क्रिया वेगाने केल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो. हा व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंवर प्रचंड ताण पडतो, ज्यामुळे तिथली चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, जो एक उत्तम कार्डिओ वर्कआउट आहे. हा व्यायाम करताना तुमची पाठ सरळ ठेवा आणि कंबर जास्त वर उचलू नका. सुरुवातीला ३० सेकंदांचे ३ सेट करा आणि हळूहळू वेळ वाढवा.

चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...

तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत... 

३. स्क्वाट्स (Squats) :- स्क्वाट्स हा व्यायाम केवळ तुमच्या पोटाची चरबी कमी करत नाही, तर मांड्यांचा वाढलेला घेर कमी करण्यासही मोठी मदत करतो. तसेच, स्क्वाट्स केल्याने तुमचे पाय अधिक मजबूत आणि सुडौल होतात. सर्वात आधी दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवून सरळ उभे राहा. आता ज्याप्रमाणे आपण खुर्चीवर बसतो, तसं हवेत बसण्याचा प्रयत्न करा. पूर्ण खाली न बसता अर्ध्यापर्यंत खाली झुका (खुर्चीवर बसल्यासारखा आकार झाला पाहिजे) आणि पुन्हा सरळ उभे राहा. ही क्रिया वारंवार करा. यामुळे तुमच्या कंबरेचा आणि मांड्यांचा आकार कमी होण्यास मदत होईल.

हे ३ व्यायाम जर तुम्ही रोज न चुकता केले, तर काही दिवसांतच तुम्हाला स्वतःमध्ये बराच चांगला बदल दिसून येईल. व्यायामासोबतच भरपूर पाणी पिणे आणि सकस आहार घेणे विसरू नका.

Web Title : बिना डाइटिंग स्लिम कमर? ये 3 आसान व्यायाम आजमाएं!

Web Summary : डाइटिंग के बिना स्लिम कमर चाहिए? ये तीन 15 मिनट के व्यायाम - रूसी ट्विस्ट, माउंटेन क्लाइम्बर्स और स्क्वैट्स - पेट की चर्बी को लक्षित करते हैं और आपके कोर को टोन करते हैं। सर्वोत्तम परिणामों के लिए जलयोजन और स्वस्थ आहार के साथ मिलाएं।

Web Title : Slim Waist Without Dieting? Try These 3 Simple Exercises!

Web Summary : Want a slimmer waist without dieting? These three 15-minute exercises – Russian Twists, Mountain Climbers, and Squats – target belly fat and tone your core. Combine with hydration and a healthy diet for best results.