वाढते वजन कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जाते. वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच अनेक उपाय करतो. वेटलॉससाठी कुणी डाएट करत तर कुणी एक्सरसाइज. वेटलॉस करताना आहाराकडे (best dals for weight loss and muscle gain) विशेष लक्ष देण्यासोबतच, शरीरातील प्रोटीन्सच्या पूर्तता भरुन काढणे देखील तितकेच गरजेचे असते. आपल्या आहारातील प्रोटीन्सची कमतरता भरुन काढण्यासाठी डाळी हा उत्तम स्रोत आहे(how to eat high protein dals for weight loss).
आपल्या आहारात आपण डाळीचा सामावेश करतोच, या डाळी आपण (high protein dal recipes for weight loss) चपाती किंवा भातासोबत खातो. परंतु वेटलॉस करण्यासाठी आपण ३ वेगवेगळ्या प्रकारे डाळी खाऊ शकतो. रोजच्या आहारातील डाळी जर आपण ३ वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ल्या तर आपल्या शरीराला गरजे इतके प्रोटीन मिळते, यामुळे वेटलॉस होण्यास मदत मिळते.
वेटलॉस करण्यासाठी ३ पद्धतीने रोज खावी डाळ...
१. डाळीचे सूप करा (Make Soup) :- वजन कमी करण्याचा एक सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमच्या आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवणे. अशावेळी तुम्ही तुमच्या आवडीची डाळ पातळ करून तिला सूप म्हणून पिऊ शकता. डाळीचे सूप बनवणे खूप सोपे आहे. तुम्ही फक्त डाळ घ्या आणि ती उकळून त्यात थोडे आले, लसूण आणि हिरवी मिरची घालून शिजवा. शिजवलेली डाळ हलकीशी मॅश (Mash) करा आणि थोडे पाणी मिसळून डाळीला पातळ करा. वरुन लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला आणि पौष्टिक सूप म्हणून पिण्याचा आस्वाद घ्या. डाळीचे सूप प्यायल्याने पोट लवकर भरते आणि शरीराला आवश्यक प्रथिने व फायबर देखील मिळतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. डाळीतील फायबर तुमचे पचन सुधारते. तुम्ही हे सूप दुपारच्या जेवणाऐवजी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी घेऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहील आणि काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा रोखण्यास मदत करेल.
२. मोड आलेल्या डाळींचे सॅलॅड (Sprouted Dal Salad) :- आपण मोड आलेल्या डाळींचे सॅलॅड नक्कीच खाल्ले असेल. या मोड आलेल्या डाळी पोषक तत्वांचा खजिना असतात. मोड येण्याच्या प्रक्रियेमुळे डाळींमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते. वजन कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्ये / डाळी सॅलॅडमध्ये मिसळून खाणे हा एक वेटलॉससाठी उत्तम पर्याय आहे. यासाठी आपण मूग डाळ, चणा डाळ किंवा काळे चणे अंकुरित करू शकता. हे सॅलॅड फक्त चविष्टच नाही, तर ते तुम्हाला प्रथिने आणि फायबर देखील चांगल्या प्रमाणात देते. यामुळे चयापचय जलद गतीने होते आणि दीर्घकाळ एनर्जी टिकून रहाते.
गॅस-ॲसिडीटी सतावते झोपेचं होत खोबरं? 'या' पोझिशनमध्ये झोपा, गॅसचा त्रास होईल मिनिटांत कमी...
३. भाकरी किंवा भाताऐवजी डाळ खा (Replace Roti or Rice with Dal) :- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करणे फायदेशीर ठरु शकते. तुम्ही तुमच्या दिवसातील एका वेळेच्या जेवणामध्ये भाकरी, चपाती किंवा भाताऐवजी फक्त डाळ पिऊ शकता. फक्त डाळ खाल्ल्याने तुम्ही अतिरिक्त कॅलरीज खाण्यापासून वाचता. तसेच, डाळीमध्ये असलेले प्रोटीन आणि फायबर तुम्हाला लवकर भूक लागू देत नाहीत. यामुळे तुमच्या खाण्याच्या क्रेविंग्सवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
Web Summary : Incorporate lentils into your weight loss journey by having them as soup, sprouted salad, or a meal replacement. These protein-rich options aid weight management and boost metabolism.
Web Summary : दाल को सूप, स्प्राउटेड सलाद या भोजन के विकल्प के रूप में शामिल करके वजन घटाने की यात्रा में शामिल करें। ये प्रोटीन युक्त विकल्प वजन प्रबंधन में सहायता करते हैं और चयापचय को बढ़ावा देते हैं।