वाढत्या वजनामुळे कित्येकजण सध्या नेहमीच चिंतेमध्ये असतात. महिला असो किंवा पुरुष असो किंवा प्रौढ मंडळींमधला कोणताही वयोगट असो वजन कसं कमी करायचं यासाठी कित्येक जणांचे वेगवेगळे प्रयत्न नेहमीच सुरु असतात. सध्या तर हिवाळा सुरू आहे. या दिवसांत वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढू न देता आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठीही अनेकांचे प्रयत्न सुरू असतातच. तुम्हीही वाढत्या वजनाच्या समस्येमुळे हैराण झालेले असाल तर रामदेव बाबा सांगत आहेत तो एक सोपा उपाय करून पाहा. त्यांनी सांगितलेले उपाय केल्यामुळे आठवडाभरातच तुम्हाला तुमच्या तब्येतीमध्ये बराच फरक पडलेला जाणवेल.(Weight Loss Tips By Ramdev Baba)
वजन कमी करण्यासाठी रामदेव बाबा यांचा खास उपाय
वजन कमी करण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ रामदेव बाबांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मराठवाडा स्पेशल येसर मसाला रेसिपी! आमटी करून खा किंवा भाजीमध्ये घाला, चव येईल झकास
यामध्ये ते सांगतात की कपालभाती आणि अनुलोम- विलोम हे दोन्ही प्राणायाम तुम्ही योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात केले तर त्याचा वजन कमी करण्यासाठी निश्चितच खूप उपयोग होतो. त्यामुळे योग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच हे प्राणायाम करणे सुरू करा. एकदम त्याचा अतिरेक करू नका. सुरुवातीला अगदी ५ ते ७ मिनिटे करत नंतर हळूहळू वेळ वाढवत न्या.
याशिवाय हिवाळ्यात गाजर, मुळा, बीट, मटार, वेगवेगळ्या शेंगा अशा फायबरयुक्त भाज्या भरपूर प्रमाणात असतात. या भाज्यांचे सेवन वाढवा. शक्य असतील त्या मेथी, करडी अशा पालेभाज्या कच्च्या खा. यामुळेही पचनक्रिया चांगली होते. मेटाबॉलिझम चांगले होते आणि त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होणं कमी होतं.
हिवाळ्यात ऊस मिळतो. तो आवर्जून खाल्ला पाहिजे. कारण लिव्हरचं कार्य सुधारण्यासाठी ऊस अतिशय उपयुक्त ठरतो. मुळा तर लिव्हर आणि किडनी दोन्हींसाठी अतिशय फायदेशीर ठरतो.
हिवाळ्यात डोक्यातला कोंडा खूपच वाढला? स्वयंपाक घरातले ४ पदार्थ लावा, काही दिवसांतच कोंडा गायब
त्यामुळे मुळा, ऊस या दिवसांत आवर्जून खा. त्याचप्रमाणे रोज थोडासा योगाभ्यासही करा. प्राणायाम, आहार यांच्या जोडीला व्यायाम केला तर वाढतं वजन कमी होण्यासाठी निश्चितच मदत होईल.
