वजन कमी करण्याचा विचार डोक्यात येताच,आपण सर्वातआधी तेल, गोड पदार्थ आणि साजूक तूप खाणच सोडून देतो. विशेषतः साजूक तूप खाल्ल्याने वजन वाढते, असा समज अनेकांच्या मनात पक्का झालेला असतो. त्यामुळे डाएट करताना तूप टाळणे हाच योग्य मार्ग आहे असे बहुतेकांना वाटते. याउलट, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने तूप (ghee health benefits for weight loss) खाल्ल्यास वजन नियंत्रणात ठेवता येते. देशी तूप हे शुद्ध आणि पोषक तत्वयुक्त असते, ते मेटाबॉलिझमचा वेग वाढवते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते. तुपामध्ये 'हेल्दी फॅट्ससोबतच व्हिटॅमिन A, D, E आणि K मुबलक प्रमाणात आढळतात. यामध्ये 'ब्यूटिरिक ॲसिड' असते, जे आपली पचनसंस्था मजबूत करते आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. जेव्हा पचनसंस्था सुधारते, तेव्हा शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने बर्न होते(how to consume ghee for weight loss).
आहारतज्ज्ञांच्या मते, मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाल्ल्यास ते वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला अडथळा ठरत नाही, उलट काही वेळा त्याचा फायदा देखील होऊ शकतो. साजूक तुपामध्ये असलेले हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन्स आणि पोषक घटक पचन सुधारण्यास, भूक नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. त्यामुळे योग्य प्रमाणात (best way to eat ghee for weight loss) आणि योग्य पद्धतीने तूप आहारात समाविष्ट केल्यास वेटलॉस अगदी सहजसोप्या पद्धतीने करता येते. आरोग्य डाएट आणि न्यूट्रिशन क्लिनिक'च्या डाएटिशियन डॉ. सुगीता मुटरेजा यांनी साजूक तूप (desi ghee for weight loss) खाऊन वजन कसे कमी करता येऊ शकते याबद्दल खास टिप्स दिल्या आहेत.
साजूक तूप खाऊनही वजन नियंत्रणात कसं ठेवावं ?
१. कोमट पाण्यासोबत चमचाभर साजूक तूप खा :- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यासोबत शुद्ध साजूक तूप खाऊ शकता. कोमट पाण्यात तूप मिसळून घेतल्याने शरीराला खूप फायदा होतो. यामुळे मेटाबॉलिझमचा वेग वाढतो आणि पचनक्रिया ॲक्टिव्ह राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. या पद्धतीमुळे शरीरातील विषारी घटक (Toxins) सहजपणे बाहेर पडतात. साजूक तूप आतड्यांसाठी एखाद्या वंगणाप्रमाणेच काम करते, ज्यामुळे बद्धकोष्ठाचा त्रास दूर होतो. जेव्हा तुमचे पोट व्यवस्थित साफ राहते, तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
२. वर्कआऊट करण्यापूर्वी साजूक तूप खा :- वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट करण्यापूर्वी तूप खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. जर तुम्ही दररोज व्यायामाच्या २० ते ३० मिनिटे आधी अर्धा ते एक चमचा साजूक तूप खाल्ले, तर त्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते आणि वजन घटवण्यासही मदत होते. विशेषतः जर तुम्ही 'हाय-इंटेन्सिटी वर्कआऊट' किंवा योगासने करत असाल, तर तुमच्या आहारात तुपाचा समावेश नक्की करा.
३. वरण किंवा डाळीमध्ये तूप घालून खा :- डाएटिंगच्या नावाखाली बहुतेक लोक तूप पूर्णपणे बंद करतात, जे खरं तर चुकीचे आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्ही वरण किंवा डाळीमध्ये तूप घालून खाऊ शकता. तुपामध्ये असलेल्या 'हेल्दी फॅट्स'मुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. यामुळे 'ओव्हरईटिंग' टाळता येते आणि भुकेवर नियंत्रण राहते. डाळीमध्ये तूप घालून खाल्ल्याने मेटाबॉलिझम आणि पचनक्रिया दोन्ही सुधारतात.
उठणं - बसणंही झालं होतं कठीण, पण श्वेता तिवारीने 'या' घरगुती उपायाने कमी केलं युरिक अॅसिड...
४. इंटरमिटंट फास्टिंग करताना तूप खा :- आजकल 'इंटरमिटेंट फास्टिंग' (Intermittent Fasting) अत्यंत लोकप्रिय होत आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक जण या पद्धतीचा अवलंब करतात. जर तुम्हीही इंटरमिटेंट फास्टिंग करत असाल, तर सकाळी 'ब्लॅक कॉफी' किंवा कोमट पाण्यामध्ये थोडे साजूक तूप मिसळून घेऊ शकता. यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते आणि उपवासाच्या काळात येणारा अशक्तपणा जाणवत नाही. या पद्धतीमुळे तुमचे वजनही कमी होईल आणि तुम्हाला थकवा देखील जाणवणार नाही.
वजन कमी करण्यासाठी किती तूप खाणं योग्य आहे?
वजन घटवण्यासाठी साजूक तूप मर्यादित प्रमाणात खाणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही दिवसभरात साधारणपणे १ ते २ चमचे साजूक तूप खाऊ शकता. गरजेपेक्षा जास्त तूप खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढू शकतात, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी उलट वाढण्याची शक्यता असते.
तूप खाताना या गोष्टींची काळजी घ्या...
१. वजन कमी करण्यासाठी नेहमी शुद्ध देशी गाईचेचे तूप खाण्याला प्राधान्य द्यावे.
२. जास्त तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाणे टाळा. तुम्ही घरगुती साध्या अन्नपदार्थांसोबतच साजूक तूप खाऊ शकता.
३. केवळ तुपावर अवलंबून न राहता, तुम्ही 'बॅलन्स्ड डाएट' आणि 'एक्सरसाइज' देखील करणे गरजेचे असते.
४. जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपी किंवा हृदयविकाराचा कोणताही त्रास असेल, तर आहारात तुपाचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
