Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वेटलॉससाठी सातूचे पीठ खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत पाहा, डाएटिशियन सांगतात वजनात दिसेल फरक...

वेटलॉससाठी सातूचे पीठ खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत पाहा, डाएटिशियन सांगतात वजनात दिसेल फरक...

Sattu for weight loss : Here's Why Sattu Is The Perfect Food For Weight Loss : Sattu Drink For Weight Loss : How much sattu per day for weight loss : उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सातूचे पीठ किती आणि कसे खावे - वजन होईल झरझर कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2025 15:30 IST2025-05-03T14:24:56+5:302025-05-03T15:30:25+5:30

Sattu for weight loss : Here's Why Sattu Is The Perfect Food For Weight Loss : Sattu Drink For Weight Loss : How much sattu per day for weight loss : उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सातूचे पीठ किती आणि कसे खावे - वजन होईल झरझर कमी...

How much sattu per day for weight loss Here's Why Sattu Is The Perfect Food For Weight Loss Sattu for weight loss | वेटलॉससाठी सातूचे पीठ खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत पाहा, डाएटिशियन सांगतात वजनात दिसेल फरक...

वेटलॉससाठी सातूचे पीठ खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत पाहा, डाएटिशियन सांगतात वजनात दिसेल फरक...

उन्हाळा ऋतू वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असा ऋतू मानला जातो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी डेली रुटीन आणि आहारात थोडाफार बदल करणे आवश्यक असते. वजन योग्य पद्धतीने कमी करायचे असेल तर एक्सरसाईज सोबतच आहाराकडे देखील लक्ष देणे फार गरजेचे असते. वजन कमी (Sattu for weight loss) करण्यासाठी आपण आपल्या डाएटमध्ये (Here's Why Sattu Is The Perfect Food For Weight Loss) काही असे पदार्थ समाविष्ट करतो की, ज्याने वजन कमी ( Sattu Drink For Weight Loss) करण्यास मदत होईल. जर तुम्ही उन्हाळ्याच्या ऋतूत वजन कमी करणार असाल तर तुमच्या डाएट मध्ये काही विशेष पदार्थ असेल पाहिजे, त्या पदार्थांपैकीही एक म्हणजे सातूचे पीठ(How much sattu per day for weight loss).

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील उष्णता कमी करण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी देखील सातूचे पीठ खाणे फायदेशीर ठरते. सातूच्या पीठामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. वजन कमी करण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी सातूचे पीठ खाणे उपयुक्त ठरते. परंतु उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सातूचे पीठ खाण्याची पद्धत आणि योग्य प्रमाण माहीत असायला हवं. जर आपण चुकीच्या पद्धतीने सातूचे पीठ खात असाल तर त्याचा, वजन कमी करण्यासाठी काहीच उपयोग होत नाही. यासाठी वजन कमी करण्यासाठी सातूचे पीठ किती आणि कसे खावे ते पाहूयात. 

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सातूचे पीठ खाण्याची योग्य पद्धत...

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सातूचे पीठ कसे आणि किती प्रमाणात खावे, हे माहीत असणे गरजेचे असते. याबाबत अधिक माहिती देणारा व्हिडिओ  न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन सोनिया नारंग यांनी त्यांच्या sonianarangsdietclinics या इंस्टाग्राम अकाउंटवरूनशेअर केला आहे. या व्हिडिओत त्या वजन कमी करण्यासाठी सातूचे पीठ कसे आणि किती प्रमाणात खावे, याबद्दल सांगत आहेत. 

काळे की पांढरे? वजन कमी करण्यासाठी कोणते चिया सीड्स आहेत खास - वेटलॉस होईल भरभर...

उन्हाळ्यात वजन कमी करायचं ? सातूच्या पिठाचे 'हे' ५ पदार्थ करतील जादू - वेटलॉस होऊन दिसाल स्लिमट्रिम...

न्यूट्रिशनिस्ट आणि डाएटिशियन सोनिया नारंग यांच्या मते, सातूच्या पिठात फायबर आणि प्रोटीन्सचे प्रमाण खूप जास्त असते. खरंतर, फायबर आणि प्रोटीन्स वजन कमी करण्यासाठी सर्वाधिक आवश्यक घटक मानले जातात. साधारणतः एक स्कुप व्हे प्रोटीनमधून आपल्याला २५ ग्रॅम प्रोटीन मिळतात. याचप्रमाणे १०० ग्रॅम सातूच्या पिठातून आपल्याला २५ ग्रॅम प्रोटीन मिळते. असे असले तरीही या दोघांमध्ये एक फरक आहे तो म्हणजे, व्हे प्रोटीनमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते त्यामुळे ते अगदी सहजपणे पचते तसेच त्यातील पोषणमूल्य पटकन शोषली जातात. याउलट, सातूच्या पिठात फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते पचायला वेळ लागतो तसेच त्यातील पोषणमूल्य शरीरात पटकन शोषली जात नाहीत. 

फराह खान इतकी कशी काय बारीक झाली? फराह सांगते बिनपैशाचा सोपा उपाय, वजन घटले सरसर...

सोनिया नारंग यांच्या म्हणण्यानुसार, १०० ग्रॅम सातूचे पीठ घेतल्याने आपल्याला त्यातून १५ ग्रॅम फायबर मिळते. आपल्या शरीराला एका दिवसांत फक्त ३० ग्रॅम फायबरची आवश्यकता असते. अशातच जर आपण दिवसभरातून एकाच वेळी एकदम १५ ग्रॅम फायबर घेतले तर आपले शरीर इतके फायबर पटकन पचवू शकत नाही. यामुळेच आपल्याला गॅस, अपचन, अ‍ॅसिडिटी, पोटदुखी, उलटी यांसारख्या पोटाशी संबंधित अनेक त्रास देतात. 


यासाठी, दिवसभरातून एकदम एकाचवेळी भरपूर प्रमाणात सातूचे पदार्थ खाऊ किंवा पिऊ नयेत. संपूर्ण दिवसभरात विभागणी करून थोड्या थोड्या वेळाने खाणे अधिक योग्य राहील. तुम्ही सातूच्या पिठाचे ताक किंवा ड्रिंक एकदम एकाच वेळी तयार करून मग ते दिवसभरात थोडे थोडे करून देखील पिऊ शकता. यामुळे सातूचे पीठ पचण्यास मदत होईल तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या देखील उद्भवणार नाही. सोबतच वेटलॉस करण्यास अधिक मदत होऊ शकते.

Web Title: How much sattu per day for weight loss Here's Why Sattu Is The Perfect Food For Weight Loss Sattu for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.