Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Weight Loss : चपाती आणि भात बंद केल्यानं वजन कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी होईल पण...

Weight Loss : चपाती आणि भात बंद केल्यानं वजन कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी होईल पण...

How many rotis and how much rice you should eat to lose weight : How Many Roti & How Much Rice You Should Eat In A Day For Weight Loss : How much rice and chapatis should you have in a day for weight loss : वजन कमी करताना चपात्या नेमक्या किती खाव्या आणि भात किती प्रमाणात खावा, बघा डाएटिशियन सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2025 14:39 IST2025-07-29T14:26:38+5:302025-07-29T14:39:01+5:30

How many rotis and how much rice you should eat to lose weight : How Many Roti & How Much Rice You Should Eat In A Day For Weight Loss : How much rice and chapatis should you have in a day for weight loss : वजन कमी करताना चपात्या नेमक्या किती खाव्या आणि भात किती प्रमाणात खावा, बघा डाएटिशियन सांगतात...

How many rotis and how much rice you should eat to lose weight How Many Roti & How Much Rice You Should Eat In A Day For Weight Loss How much rice and chapatis should you have in a day for weight loss | Weight Loss : चपाती आणि भात बंद केल्यानं वजन कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी होईल पण...

Weight Loss : चपाती आणि भात बंद केल्यानं वजन कमी होतं का? तज्ज्ञ सांगतात, वजन कमी होईल पण...

भात आणि चपात्या हे दोन्ही पदार्थ आपल्या नेहमीच्या आहारातील मुख्य पदार्थ आहेत. आपल्यापैकी बऱ्याच घरांमध्ये भात आणि चपात्या असे दोन्ही पदार्थ जेवणासाठी हमखास केले जातात. आपल्यापैकी काहीजण असे आहेत की ज्यांना भात आणि चपाती हे दोन्ही पदार्थ जेवणात आवर्जून लागतातच. भात चपाती पैकी एखादा (How many rotis and how much rice you should eat to lose weight) पदार्थ जरी नसला तरी जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटतच नाही. परंतु वजन कमी करायचं म्हटलं की, आपल्यापैकी बरेचजण भात किंवा चपाती दोघांपैकी एक पदार्थ खायचा सोडून देतात. काहीजणांच्या मते भात खाल्ल्याने (How Many Roti & How Much Rice You Should Eat In A Day For Weight Loss) वजन वाढते तर काहींच्यामते, चपाती खाल्ल्याने वजन वाढते. त्यामुळे वजन कमी करताना भात खावा की चपाती आणि नेमकं किती प्रमाणात भात किंवा किती चपात्या खाव्यात असा प्रश्न पडतो. वेटलॉससाठी काहीजण (How much rice and chapatis should you have in a day for weight loss) भात पूर्णपणे सोडून देतात, तर काहीजण चपात्यांची संख्या कमी करतात. पण खरंच वजन कमी करण्यासाठी भात आणि चपात्या पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे का?

विशेषतः आपल्या रोजच्या जेवणातील मुख्य घटक असलेल्या भात आणि चपातीचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. अनेक लोकांना हे समजत नाही की वजन कमी करत असताना भात खावा की नाही, आणि चपात्या किती प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत. यासाठीच, वजन कमी करताना चपात्या नेमक्या किती खाव्या आणि भात किती प्रमाणात खावा याबद्दल अधिक माहिती डाएटिशियन मंजिरी यांनी एका संकेतस्थळाला दिली आहे, ते पाहूयात.. 

वेटलॉससाठी चपात्या आणि भात किती प्रमाणांत खावं, याच योग्य प्रमाण पाहूयात ? 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी चपाती आणि भात पूर्णपणे सोडून देण्याची गरज नाही. फक्त योग्य वेळी योग्य प्रमाणांत खाणे आणि पोर्शन कंट्रोल लक्ष देणं गरजेचं आहे.

जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर चपाती आणि भात दोन्ही पदार्थ मर्यादित प्रमाणात खाणं गरजेचं आहे. गव्हाचे पीठ वापरताना त्यात थोडंसं चण्याचं किंवा नाचणीचं पीठ मिसळा. याशिवाय, आपण यात अळशीच्या बिया किंवा मेथीचे दाणे सुद्धा घालू शकता. अशा प्रकारे पोळी अधिक पौष्टिक होते, आरोग्य चांगलं राहतं आणि वजन कमी करण्यातही मदत होते.

स्वयंपाकघरातील ४ मसाले करतील जादूई फॅटलॉस, चरबी गायब होताच सगळे विचारतील सिक्रेट काय...

जर आपण चपातीच्या मल्टीग्रेन पीठात एक मूठ बेसन मिसळून त्याच्या चपात्या केल्या, तर वजन कमी करणं अधिक सोपं होईल. यामागचं कारण असं की, चण्याच्या पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे हे पीठ वजन कमी करण्यास मदत करतं आणि ब्लड शुगर लेव्हल सुद्दा नियंत्रित ठेवतं. अशा चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर आणि पचनासाठीही उपयुक्त ठरतात.

भात आणि चपात्या हे दोन्ही पदार्थ कार्बोहायड्रेट्सचे मुख्य स्रोत आहेत. परंतु, या दोघांमधील पोषणमूल्यं एकमेकांपेक्षा वेगळी असतात. त्यामुळे वजन कमी करताना यांचा योग्य ताळमेळ आणि पोषणमूल्य लक्षात घेऊन खाणं गरजेचं असते. 

 

झरझर वजन कमी करण्यासाठी करा ५ गोष्टी - कमी वेळात होईल कमाल,आयुर्वेदिक सल्ला...

तुम्ही दुपारच्या जेवणात २ चपात्या आणि १ छोटी वाटी भात खाऊ शकता. मात्र, यासोबत सॅलॅड, ताक आणि भाजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून आहारात बॅलन्स राहील आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वही मिळतील.

चपातीमध्ये भाताच्या तुलनेत प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण अधिक असतं, त्यामुळे चपाती खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि लवकर भूक लागत नाही. याउलट, भातामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त असल्यामुळे भात खाल्ल्यानंतर काही वेळातच पुन्हा भूक लागण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वजन कमी करताना भातापेक्षा चपाती तुलनेने अधिक चांगला पर्याय मानला जातो.

जर तुम्ही वजन कमी करत असाल, तर रात्रीच्या वेळी सूप, सॅलॅड, डाळ आणि हलके फुलके अन्नपदार्थ खाणं अधिक योग्य ठरतं. रात्रीच्या जेवणात क्विनोआसारखे पौष्टिक धान्य घेऊ शकता. परंतु, चपाती आणि भात रात्रीच्या वेळी खाणे टाळावे, कारण रात्री पचनक्रिया मंद असते आणि हे पदार्थ रात्री खाल्ल्याने वजन वाढू शकते.

Web Title: How many rotis and how much rice you should eat to lose weight How Many Roti & How Much Rice You Should Eat In A Day For Weight Loss How much rice and chapatis should you have in a day for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.