Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > फक्त जिम, डाएटच नाही तर वेटलॉस करण्यासाठी 'इतके' तास झोपणंही आवश्यकच! वजन कमी करण्याचा सोपा उपाय...

फक्त जिम, डाएटच नाही तर वेटलॉस करण्यासाठी 'इतके' तास झोपणंही आवश्यकच! वजन कमी करण्याचा सोपा उपाय...

how many hours of sleep do you need for weight loss : proper sleep for effective weight loss : वेटलॉस करण्यासाठी जिम, डाएट सोबतच पुरेशी झोप घेणं देखील तितकेच महत्वाचे असते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2025 15:49 IST2025-12-23T15:36:49+5:302025-12-23T15:49:41+5:30

how many hours of sleep do you need for weight loss : proper sleep for effective weight loss : वेटलॉस करण्यासाठी जिम, डाएट सोबतच पुरेशी झोप घेणं देखील तितकेच महत्वाचे असते...

how many hours of sleep do you need for weight loss proper sleep for effective weight loss | फक्त जिम, डाएटच नाही तर वेटलॉस करण्यासाठी 'इतके' तास झोपणंही आवश्यकच! वजन कमी करण्याचा सोपा उपाय...

फक्त जिम, डाएटच नाही तर वेटलॉस करण्यासाठी 'इतके' तास झोपणंही आवश्यकच! वजन कमी करण्याचा सोपा उपाय...

वजन कमी करण्यासाठी आपण प्रामुख्याने जिम, व्यायाम आणि डाएट यावरच जास्त लक्ष देतो. मात्र फक्त योग्य आहार आणि नियमित वर्कआऊट असूनही काहीवेळा अपेक्षित परिणाम दिसत नसतील, तर त्यामागे अपुरी झोप हे महत्त्वाचे कारण असू शकते. झोपेचा थेट परिणाम आपल्या मेटाबॉलिझम, हार्मोन्स आणि भुकेच्या नियंत्रणावर होत असतो. दररोज पुरेशी आणि ठराविक तासांची झोप घेतली नाही, तर वजन घटण्याची प्रक्रिया मंदावते आणि शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढते. त्यामुळे फिट आणि सडपातळ दिसण्यासाठी जिम व डाएटसोबतच ठराविक तासांची झोप घेणं देखील तितकेच गरजेचे असते(how many hours of sleep do you need for weight loss).

फिट दिसण्यासाठी आपण महागड्या जिमचे सबस्क्रिप्शन घेतो आणि फॅन्सी डाएट प्लॅन फॉलो करतो. मात्र, या धावपळीत आपण सर्वात स्वस्त आणि नैसर्गिक उपायाकडे दुर्लक्ष करतो, ती म्हणजे 'शांत झोप'. शरीराची रिकव्हरी आणि चयापचय क्रिया सुधारण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक असते. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल, तर जिममध्ये कितीही मेहनत केली तरी शरीरावर हवे तसे परिणाम मिळत नाही. यासाठी,  वेटलॉस करण्यासाठी जिम, डाएट सोबतच पुरेशी झोप घेणं देखील तितकेच महत्वाचे असते. वजन कमी करण्यासाठी (proper sleep for effective weight loss) नेमकी किती तासांची झोप घ्यावी ते पाहूयात. 

अपुऱ्या झोपेमुळे शरीरावर काय परिणाम होतो? 

जेव्हा आपण पुरेशी झोप घेत नाही, तेव्हा शरीरातील कॉर्टिसोल (Cortisol) म्हणजेच 'स्ट्रेस हार्मोन'ची पातळी वाढते. हा हार्मोन शरीरात, विशेषतः पोटाच्या भागात चरबी साठवण्यास मदत करतो. याव्यतिरिक्त, झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, ज्यामुळे तुमची शारीरिक हालचाल मंदावते आणि व्यायामाचा उत्साह राहत नाही. म्हणूनच, वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज यांच्याइतकीच पुरेशी झोप घेणं देखील तितकंच गरजेचं असते. 

छातीत साचलेला कफ, घशाच्या खवखवीपासून होईल सुटका! फक्त १ छोटा तुकडा चघळा - मिळेल झटपट आराम...

अपुऱ्या झोपेचा ब्लड शुगरवर होणारा परिणाम... 

झोप पूर्ण न होण्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलतेवर (Insulin Sensitivity) होतो. जेव्हा आपण कमी झोप घेता, तेव्हा शरीर रक्तातील साखरेचा वापर ऊर्जेसाठी प्रभावीपणे करू शकत नाही. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने वजन वाढण्याचा धोकाही वाढतो. इतकेच नाही तर, सततची अपुरी झोप तुम्हाला डायबिटीस सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढवू शकते. जर आपल्याला आधीच मधुमेह असेल, तर झोपेच्या कमतरतेमुळे शुगर लेव्हल अधिक बिघडून आरोग्याच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या होऊ शकतात.

अपुऱ्या झोपेमुळे वाढते भूक... 

जेव्हा आपली झोप पूर्ण होत नाही, तेव्हा शरीरातील भूक नियंत्रित करणाऱ्या दोन महत्त्वाच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. 

१. ग्रेलिन (Ghrelin) वाढते :- झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात 'ग्रेलिन' या हार्मोनची पातळी वाढते. हा हार्मोन मेंदूला भुकेचे संकेत देतो. ग्रेलिन वाढल्यामुळे व्यक्तीला वारंवार भूक लागते आणि अन्नपदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते, ज्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते.

२. लेप्टिन (Leptin) कमी होते :- दुसरीकडे, 'लेप्टिन' नावाच्या हार्मोनची पातळी कमी होते. लेप्टिन हा असा हार्मोन आहे जो आपले पोट भरल्याची जाणीव मेंदूला करून देतो. या हार्मोनची पातळी घटल्यामुळे जेवण करूनही पोट भरल्यासारखे वाटत नाही आणि आपण भुकेपेक्षा जास्त खातो. 

झोप आणि व्यायामाचा उत्साह यांचा काय संबंध आहे?

अपुरी झोप केवळ तुमच्या मेंदूलाच नाही, तर तुमच्या शरीरालाही थकवून टाकते. याचा थेट परिणाम तुमच्या फिटनेसवर होतो. जेव्हा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा शरीर दिवसभर थकलेले असते. यामुळे जिममध्ये जाण्याची किंवा व्यायाम करण्याची इच्छा पूर्णपणे मरून जाते. परिणामी, तुमची शारीरिक हालचाल कमी होते आणि कॅलरीज बर्न होण्याचे प्रमाण घटते. उशिरापर्यंत जागे राहिल्यामुळे शरीराला ऊर्जेची गरज भासते. अशा वेळी रात्रीच्या वेळी चिप्स, बिस्किटे किंवा गोड पदार्थ यांसारखे 'अनहेल्दी स्नॅक्स' खाण्याचे प्रमाण वाढते. यामाचा अभाव आणि रात्रीचे अवेळी खाणे या दोन्ही गोष्टींमुळे हळूहळू वजन वाढू लागते. हे चक्र इतके वेगाने फिरते की, कमी झोप हे नकळत लठ्ठपणाचे मुख्य कारण बनते.

दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर इवलासा तुकडा चघळा-शुगरही राहील नियंत्रणात...

मग वेट लॉससाठी रात्रीची किती तास झोप आवश्यक आहे?

बऱ्याच लोकांना असे वाटते की, रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर दिवसा झोपून ती भरून काढता येईल. पण लक्षात ठेवा, दिवसाची झोप रात्रीच्या झोपेची जागा घेऊ शकत नाही. उलट, दिवसा जास्त झोपल्याने तुमचे शरीर अधिक सुस्त होऊ शकते. वजन कमी करण्यासाठी फक्त आणि फक्त रात्रीची शांत झोपच महत्त्वाची ठरते. वजन कमी करण्यासाठी दररोज रात्री ७ ते ८ तास गाढ झोप घेणे गरजेचे असते. इतकी झोप घेतल्यामुळे भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स संतुलित राहतात, तुमची पचनशक्ती सुधारते आणि तुमचे शरीर 'फॅट बर्निंग मोड' मध्ये राहते.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर...

१. झोपेला प्राधान्य द्या :- जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, फिट राहायचे असेल आणि दिवसभर उत्साही राहायचे असेल, तर झोपेला तुमच्या कामांइतकेच महत्त्व देणे आवश्यक आहे.

२. स्वतःला लावा एक खास सवय :- दररोज रात्री किमान ७ तास शांत आणि उत्तम दर्जाची झोप घेण्याची सवय स्वतःला लावून घ्या. ही एक सवय तुमचे आरोग्य पूर्णपणे बदलू शकते.

Web Title : वजन घटाने के लिए जिम और डाइट के साथ नींद भी जरूरी!

Web Summary : वजन घटाने के लिए पर्याप्त नींद जरूरी है। नींद की कमी से तनाव हार्मोन बढ़ता है, ब्लड शुगर बिगड़ता है और भूख बढ़ती है। हार्मोन को संतुलित करने, पाचन में सुधार और वसा को प्रभावी ढंग से जलाने के लिए आहार और व्यायाम के साथ 7-8 घंटे की नींद लें।

Web Title : Weight loss needs sleep as much as gym and diet!

Web Summary : Adequate sleep is crucial for weight loss. Lack of sleep increases stress hormones, disrupts blood sugar, and boosts appetite. Aim for 7-8 hours of sleep to balance hormones, improve digestion, and burn fat effectively, alongside diet and exercise.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.