रात्रीच्या जेवण आपल्या जेवणाचा एक महत्वाचा भाग आहे. बरेच लोक नेहमीच्या आहारात चपाती खाणं पसंत करतात. बरेच लोक दुपारी किंवा सकाळच्या नाश्त्याला चपाती खातात. बरेच लोक रात्री चपाती यासाठी खातात की चपात्या पचायला हलक्या असतात तर काही लोकांना पोटाशी सबंधित समस्या असतात म्हणून ते साधा आहार म्हणून चपात्या खातात. रोज किती चपात्या खाव्यात असे प्रश्न अनेकांना पडतात. एम्सचे डॉक्टर अमरिंदर सिंह मल्ही यांनी रात्रीच्यावेळेस महिलांनी आणि पुरूषांनी किती चपात्या खाव्यात याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How Many Chapatis Should Eat At Night)
कोणी किती चपात्या खाव्यात याची 3 मुख्य कारणं
तर तुम्हाला दिवसभर डेस्कवर बसायची सवय असेल तर रात्री कमीत कमी कॅलरीज घ्या. जर तुम्हाला जीमला जाऊन मेहनत करायची असेल तर अधिक उर्जा लागू शकते.
पचनक्रिया
रात्रीच्यावेळी आपल्या शरीराचे मेटाबॉलिझ्म संथ झालेले असते. जास्त चपात्या खाल्ल्यामुळे पोट जास्त फुगलेलं वाटतं आणि जड वाटतं.
चपातीचा आकार आणि अन्न
एका मध्यम आकाराच्या गव्हाच्या चपातीत जवळपास 70 ते 100 कॅलरीज असतात. तुम्ही मल्टीग्रेन चपातीही खाऊ शकता.ज्यामुळे तुम्हाला जास्तवेळ तृप्त राहता येतं.
रात्रीच्यावेळी किती चपात्या खाव्यात?
डॉक्टर अमरिंदर सिंह मल्ही यांच्या म्हणण्यानुसार पुरूषांनी रात्री 3 चपात्या खाव्यात तर महिलांनी 2 चपात्या खाव्यात. यापेक्षा जास्त चपात्या खाल्ल्यास तुमचं वजन वाढू शकतं तसंच पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
चपात्या कोणी खाऊ नयेत? ज्यांना ग्लुटेनची एलर्जी आहे. त्यांनी गव्हाची चपाती खाणं पूर्णपणे बंद करावी यामुळे त्यांच्या आतड्यांना सूज येऊ शकते. गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो. त्यामुळे जास्त प्रमाणात चपाती खाल्ल्यानं रक्तातील साखर वेगानं वाढू शकते. त्यांनी गव्हाऐवजी ज्वारी, बाजरीची भाकरी खावी. पीसीओडी, पीसीओस अशा समस्या असतील तर महिलांनी गव्हाचे सेवन कमी करावे कारण यामुळे शरीरात सूज वाढू शकते. ज्यांना वारंवार गॅस, पोट फुगणं अशा समस्या उद्भवतात त्यांनी चपात्या रोज खाणं टाळावं.
Web Summary : AIIMS doctor advises men to eat three chapatis and women two at night. Excess chapati consumption can cause weight gain and stomach issues. Those with gluten allergies should avoid wheat chapatis and opt for jowar or bajra.
Web Summary : AIIMS डॉक्टर की सलाह: पुरुषों को रात में तीन और महिलाओं को दो चपाती खानी चाहिए। ज़्यादा चपाती खाने से वज़न बढ़ सकता है और पेट की समस्याएँ हो सकती हैं। ग्लूटेन एलर्जी वाले लोगों को गेहूं की चपाती से बचना चाहिए और ज्वार या बाजरा का विकल्प चुनना चाहिए।