नवीन वर्ष सुरु झालं की अनेकजण संकल्प करतात. यंदा वजन कमी करायचं. जिम जॉइन करणं, डाएट प्लान, साखर-जंक फूड कमी करणं अशा गोष्टी सुरू होतात.(weight loss coffee) पण या सगळ्यात एक छोटा पण महत्त्वाचा प्रश्न अनेकांच्या लक्षात येत नाही. आपण रोज पिणारी कॉफी वजन कमी करण्यास मदत करतेय की वाढवतेय? हॉट कॉफी की कोल्ड कॉफी, यामधला फरक समजून घेतला तर महिनाभरात बदल जाणवू शकतो.
सध्या वजन कमी करण्याच्या प्रवासात कॉफी ही अनेकांची आवडती झाली आहे.(best coffee for fat loss) सकाळची सुरुवात असो किंवा वर्कआउटनंतरचा थकवा, झोप यासाठी कॉफी रिफ्रेश करते. पण डाएट करणाऱ्या अनेकांच्या मनात प्रश्न येतो.(coffee and metabolism) हॉट कॉफी पिणं जास्त फायदेशीर की कोल्ड कॉफी? कारण दोघांचाही आपल्या शरीरावर वेगळा परिणाम होतो. कॉफी हे जगातील सर्वात आवडत्या पैयांपैकी एक आहे. जाणून घेऊया कोणती कॉफी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
हॉट कॉफी प्यायल्याने शरीराचं तापमान वाढतं, यामुळे मेटाबॉलिझम अॅक्टिव्ह होतो आणि कॅलरीज जळण्याची प्रक्रिया वेगाने सुरु होते. ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन असल्यामुळे फॅट बर्निंगला चालना मिळते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा वर्कआउटपूर्वी हॉट कॉफी घेतल्यास ऊर्जा वाढते. व्यायाम चांगल्याप्रकारे करता येतो. तसेच हॉट कॉफी भूक कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्याला ओव्हरइटिंग थांबवता येते.
कोल्ड कॉफी ही तिच्या बनवण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. साधी ब्लॅक कोल्ड कॉफी घेतल्यास शरीर ती पचवण्यासाठी अधिक ऊर्जा वापरते. थंड पेयांना शरीराच्या तापमानाशी जुळवून घ्यावं लागतं. त्यामुळे थोड्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. अनेकदा कोल्ड कॉफीमध्ये दूध, साखर, फ्लेवर सिरप किंवा आईस्क्रीम घातलेलं असतं. अशा कोल्ड कॉफीमुळे आपलं वजन भरपूर वाढू शकतं.
वजन कमी करण्यासाठी आपण कॉफीमध्ये काय घालतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. त्यात साखर, फुल क्रीम दूध, व्हीप्ड क्रीम घातल्यास कॉफी हेल्दी राहत नाही. नव्या वर्षात पहिल्या दिवसापासून वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ब्लॅक हॉट कॉफी हा सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय ठरतो. तसेच योग्य प्रकारे व्यायाम, पुरेसा आहार आणि झोप घेतल्यास आपले वजन महिन्याभरात कमी होईल.
